कराड नगरपालिका भाजपा स्वबळावर सर्वच जागा लढविणार – भाजप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमळाच्या चिन्हावर सर्वच्या सर्व 29 जागा स्वबळावर लढविणार असल्याचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख यांचे बूथ संपर्क अभियान घेतले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांना माहीती दिली.यावेळी मुकुंद चरेगांवकर, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे,रूपेश मुळे … Read more

सातार्‍यात दोन्ही राजेंच्याविरोधात महाविकास आघाडी ठोकणार शड्डो; पालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या राजकारणात उतरून दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी शड्डू ठोकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार … Read more

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध, राष्ट्रवादीची भूमिका काय? नवाब मलिक म्हणाले…

Nawab Malik

मुंबई । औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी शिवसेनेकडून पावलं उचलली जात आहेत. अशावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं मात्र नामांतरासाठी ठाम विरोध दर्शविला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनीही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शहरांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. … Read more

अमर, अकबर,अँथनी’ने ‘रॉबर्ट सेठ’चा पराभव केला’ ; काँग्रेसचा भाजपला उपरोधिक टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा उडाला आहे. भाजपच्या या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. “अमर, अकबर, अँथनीने ‘रॉबर्ट सेठ’चा आज पराभव केला”, असा उपरोधिक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. तसेच एकोप्याचं फळ महाविकास आघाडीला मिळालं आहे असेही ते म्हणाले. सचिन … Read more

भाजपच्या पराभवानंतर निलेश राणेंचा जळफळाट ; महाविकास आघाडीवर टीका करताना ‘शिवीगाळ’चा केला वापर

Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा उडाला आहे. पुणे आणि नागपूर हे हक्काच्या मतदारसंघात देखील भाजपला पराभव पहावा लागला आहे. महाविकास आघाडीच्या या विजयामुळे आता पुन्हा एकदा राज्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. याच वादात आता भाजपाचे नेते निलेश राणेंनीही उडी घेतली आहे. … Read more

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसाठी मृत्यूचा सापळा रचलाय ; नितेश राणेंचा प्रहार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून भाजपचा धुव्वा उडाला आहे. पुणे आणि नागपूर हे हक्काच्या मतदारसंघात देखील भाजपला पराभव पहावा लागला आहे. हा पराभव भाजप नेत्यांच्या खूपच जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच भाजपकडून आता शिवसेनेवर टीका केली जात आहे. या निवडणुकीत केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच फायदा झाला आहे. शिवसेनेच्या हाती … Read more

चंद्रकांत पाटलांनी बिनकामाचा सल्ला देण्याचं काही कारण नाही ; अजित पवारांचा टोला

Ajit dada chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास काय फायदा होतो हे या निवडणुकीमधून दिसून आल्याचं म्हटलं. तसेच अजित पवारांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आम्ही एकटं यायचं की आघाडी … Read more

शरद पवारांचं धोरण आणि महाविकास आघाडीचं विजयाचं तोरण – श्रीनिवास पाटलांची जबरदस्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे धोरण आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे तोरण, यामुळेच पदवीधर शिक्षक निवडणुकीत दणदणीत विजय मिळाला”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा निभाव लागला नाही. पुणे आणि नागपूर हे आपले हक्काचे मतदारसंघ देखील भाजपला गमवावे लागले. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बहुजन … Read more

जनतेने भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली ; रोहित पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला एकजुटीचं फळ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या मतदारसंघात देखील महाविकास आघाडीला जबरदस्त … Read more

ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा नाही – देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली असून त्यात महाविकास आघाडीने जबरदस्त यश प्राप्त केले असून भाजपच्या बालेकिल्ल्याला देखील खिंडार पडलं आहे. महाविकास आघाडीच्या एकजुटीपुढे भाजपचा सूफडासाफ झाला आहे. तरीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा नाही अस देवेंद्र फडणवीस यांनी … Read more