महाविकास आघाडीकडून निराशा, 5 तारखेला कठोर निर्णय घेणार- राजू शेट्टी

Raju Shetty

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार कडून निराशा झाली असून येत्या 5 तारखेला होणाऱ्या बैठकीत आपण कठोर निर्णय घेणार आहोत असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलं. सत्तेत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसतील तर अशी सत्ता नकोच आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. राजू शेट्टी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत … Read more

उद्धव ठाकरेंनी सत्तेत घेतलं म्हणून हे जिवंत, अन्यथा मेले होते; शिवसेना समर्थक आमदाराच्या विधानाने नवा वाद ?

राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीची स्थापना केली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांमध्ये काही आलबेल दिसत नाही. याचच एक उदाहरण नागपूर येथे दिसलं. नागपूरमधील शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका केली आहे. आशिष जैस्वाल म्हणाले, कॉंग्रेस नेते मेले होते, उद्धव ठाकरे यांनी यांना … Read more

विजय शिवतारेंची प्रकृती ठणठणीत; घेतली आदित्य ठाकरेंची भेट

Aditya thackey and vijay shivtare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या ICUमध्ये होते. याची माहिती विजय शिवतारे यांच्या मुलीने फेसबुक वर एक भावनिक पोस्ट लिहून दिली होती. यामध्ये तिने भावाकडून संपत्तीसाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपदेखील केला आहे. कौटुंबिक वादातून वडिलांना बदनाम … Read more

विधानभवनात भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या आमदारांनी जोरदार राडा घालत सभागृहात गोंधळ निर्माण केला. विधानसभा अध्यक्षाच्या दालनामध्ये भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more

विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेसचाच होणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा विश्वास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विधानसभा अध्यक्ष निवडीबद्दल महाविकास आघाडीत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा केली जात होती. या अध्यक्षपदाच्या निवडीवरून काँग्रेसचे नेते राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत विधान सभेचा अध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार आहे, असा विश्वास महसूलमंत्री थोरात यांनी व्यक्त केला. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत बुधवारी माध्यम प्रतिनिधींशी पत्रकार … Read more

प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्यासाठी लवकरच चर्चा करणार – नाना पटोले

nana patole ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकरांशी आघाडी करण्याबाबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील 2024 ला महाविकास आघाडी एकत्र लढेल असे म्हंटल होत. त्यात आता प्रकाश आंबेडकर पण सामील होणार का हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या नाना पटोले काँग्रेसच्या … Read more

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीत फूट

पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मतदारसंघ खिशात घालण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर येथे महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख … Read more

उद्धवनी सभागृहात फूटपाथवरचा चणेवाला जसा बोलतो तसं भाषण केले; एका बिनडोक माणसाला महाराष्ट्र सहन करतोय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जेष्ठ नेते आणि भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका केली आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसासोबत तुमचे व्यक्तिगत संबंध कसेही असतील पण महाराष्ट्र राज्याचे ते कार्यकारी प्रमुख आहेत याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय. उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणे यांनी … Read more

विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराजबाबा चव्हाण की संग्राम थोपटे ? एकंदरीतच कल काय सांगतोय त्यासाठी वाचा ही बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले विधानसभा अध्यक्ष पद नेमकं जातंय कुणाकडं असा प्रश्न आता सगळ्यांनाचं पडलाय. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. शरद पवारांनी देखील या संदर्भात “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहील याला दुजोरा दिला होता. त्यामूळे काँग्रेसच्या … Read more