चीनच्या जंगलात भयंकर आग! विझवायला गेलेल्या १९ जणांचा होरपळून मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोनानंतर आता आगीचा कहर वाढला आहे. चीनच्या नैऋत्य प्रांतातील सिचुवान प्रांतात जंगलात लागलेली भीषण आग विझवताना १९ जणांचा मृत्यू. ‘झिनहुआ’ या अधिकृत वृत्तसंस्थेने सविस्तर माहिती न देता मंगळवारी या लोकांच्या मृत्यूची माहिती दिली. शहराच्या माहिती कार्यालयाने सांगितले की, सोमवारी दुपारी जोरदार वार्‍यामुळे शेजारच्या शेतात आग पसरली. लोकांना बाहेर काढण्याचे काम … Read more

वणव्याची माहिती आता वन अधिकाऱ्यांना मिळणार मोबाइलवर; नासा करणार मदत

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्याची तात्काळ माहिती आता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. त्याअनुषंगाने नासाच्या संकेतस्थळावर अमरावती विभागात आतापर्यंत ७५ टक्के वनकर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) यांनी जानेवारीमध्ये विभागीय वनाधिकाऱ्यांची बैठक घेऊन वनवणवा नियंत्रणाबाबत सूचना केल्या. या बैठकीत … Read more

बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वरमध्ये घराला आग; दीड लाख रुपयांची राख

बीड प्रतिनिधी । तालुक्यातील पांचाळेश्वर येथील एका घराला अचानक आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम 1 लाख 40 हजार रूपये जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी घडली. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पांचाळेश्वर येथे देविदास भीमराव शिंदे यांच्या राहत्या घराला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत शिंदे यांच्या घरातील … Read more

ऑस्ट्रेलियातील आगीत एका कुटुंबाने वाचवले तब्बल ९० हजार प्राण्यांचे जीव

ऑस्ट्रेलियातील भयानक आगीत येथील वन्यप्राणांवर बेतलेल्या संकटाची मन पिळवटून टाकणारी छायाचित्रे सध्या सोशल मिडीयावर पाहायला मिळत आहेत. कांगारूचे बेट अशी ओळख असणाऱ्या ऑस्ट्रेलिया बेटावर असंख्य कांगारू आगीच्या विळख्यात सापडून मृत्युमुखी पडले. जगातील कोआला प्रजाती केवळ ऑस्ट्रेलियात पाहायला मिळते. गोंडस आणि निरागस दिसणाऱ्या जीवांचे या आगीत झालेले हाल आपल्याला या आगीची भयावहता काय असेल याची कल्पना करून देतात. मात्र,अशा बिकट संकटात काही माणसांनी आगीत सापडलेल्या तब्बल ९० हजार वन्यप्राण्यांना जीव धोक्यात घालून जीवनदान दिलं.

वेदनादायक ! ऑस्ट्रेलियातील महाभयानक आगीत ४८ कोटी वन्यजीवांचा होरपळून मृत्यू

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत जवळपास ४८ कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे. हफिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत ४८० मिलियन्स म्हणजेच जवळपास ४८ कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गमवावा लागला आहे.

साताऱ्यामधील जुन्या एमआयडीसीमध्ये दोन कंपन्या आगीत भस्मसात

सातारा येथील जुन्या एमआयडीसीतील दोन कंपन्यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून अँटिक ट्रान्सपोर्ट अँड प्रा.लि या कंपनी बरोबरच लगत असलेल्या कंपनीचे ही आगीत सुमारे २० लाखाच्यावर नुकसान झाले आहे. कंपन्यात तेलाचे डबे, मशिनरी आदी साहित्य जळाले आहे.