उद्धव ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला ACB ची नोटीस; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

Uddhav Thackeray ACB Nitin Deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातीळ बाकी राहिलेल्या आमदारांना टार्गेट करण्यास शिंदे-फडणवीस सरकारने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणजे सत्तांतराच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला न जाता सूरतहून परत आलेले आमदार नितीन देशमुख यांना आता एसीबीने नोटीस पाठवली आहे. देशमुख यांना मालमत्तेबाबत जबाब नोंदवण्यासाठी 17 जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे … Read more

ठाकरे गटाचे आणखी एक नेते अडचणीत; कोणत्याही क्षणी ‘एसीबी’कडून होणार चौकशी

ACB department

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील एका आमदाराला एसीबीकडून समन्स देण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आमदार राजन साळवी यांची एसीबी अर्थात ‘अँटी करप्शन ब्युरो’कडून चौकशी केली जाणार आहे. बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी साळवी यांची चौकशी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान एसीबीकडून समन्स बजावण्यात आल्यानंतर राजन साळवी चौकशीसाठी अलिबागच्या दिशेनं … Read more

सातारा नगर भूमापनचा लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

ACB

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तहसील कार्यालयातील नगर भूमापन कार्यालयातील प्रमुख लिपिक (क्लार्क वर्ग-3) शामराव शंकर बांदल (वय- 54, मूळ रा. बिभवी, ता. जावली. सध्या रा.रामकुंड, पुष्प जोतिबा अपार्टमेंट, सातारा) याला 5 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत एलसीबीकडे … Read more

तुला व तुझ्या भावाला गुन्ह्यात मदत करतो, बाहेर काढतो 20 हजार रुपये दे…

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सातारा जिल्ह्यात लाच मागण्यांमध्ये आता पोलिसही असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान एकीकडे चक्क गृहमंत्री दौऱ्यावर असताना दुसरीकडे पोलिसाकडून एका गुन्ह्यातील दोघा आरोपींना त्यातून बाहेर काढण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी संबंधित पोलीस हवालदारास एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सातारा … Read more

मनपाच्या नगररचना विभागातील प्रभारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात; नागरिकांनी फोडले फटाके

औरंगाबाद – महापालिकेतील बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेला नगररचना विभागातील प्रभारी अभियंता तथा गुंठेवारी कक्ष प्रमुख संजय चामले याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. तक्रारदार बिल्डरकडे लेआऊट मंजूर करून देण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिल्या हप्त्यापोटी 3 लाख स्वीकारताना पकडण्यात आल्याची माहिती एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेतील भ्रष्टाचाराचे … Read more

साताऱ्यात राज्य उत्पादन शुल्कचे 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

ACB

सातारा | राज्य उत्पादन शुल्क विभागातून बिअर शाॅपीचे लायसन्स मिळण्यासाठी कार्यालयातील तिघांनी लाचेची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लायसन्स मिळविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात प्रकरण देण्यासाठी 3 लाख रूपये लाचेची मागणी केली होती. याबाबत एसीबीने खात्री करून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने बियर शॉपीचे लायसन्स प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी … Read more

निकाल फिरविण्यासाठी 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

औरंगाबाद – मशिदीच्या व्यवस्थापकीय समितीच्या फेरबदलाबाबत वक्फ बोर्डात सुनावणीचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यास मदत करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना खाजगी व्यक्तीला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मशीद ट्रस्टचा सभासद व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली होती. या सुनावणीत निकाल व बोर्डा मधून तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यात मदत करण्यासाठी 60 हजार रुपयांची मागणी केली होती … Read more

बांधकाम विभागातील अधिकाऱ्याच्या लॉकर मध्ये कोट्यावधींचे घबाड 

  औरंगाबाद – औरंगाबादमधील बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याकडे लाखोंच रुपयांचं घबाड सापडलंय. बँकेतल्या एकाच लॉकरमध्ये इतकं मोठं घबाड सापडल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकलेत. बांधकाम विभागातील लाचखोर अभियंत्याचं नाव संजय राजाराम पाटील आहे. औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटीलने सव्वा लाखाची लाच मागितली होती. त्यात तडजोड होऊन चाळीस हजाराचा पहिला … Read more

दहावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी मागितले 30 हजार रुपये; संस्थाचालकास अटक

औरंगाबाद – शिक्षणतज्ञ, संस्थाचालक एस.पी. जवळकर याने दहावीच्या विद्यार्थ्याला हॉलतिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी 30 हजार रुपये मागितले. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात एस.पी. जवळकर हे दहा हजार रुपयांची लाच घेताना शाळेतच रंगेहाथ पकडले गेले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कलावती देवी चारीटेबल ट्रस्ट चे … Read more

मनपाचा लिपिक लाचेच्या जाळ्यात

औरंगाबाद – घराच्या मालमत्ता कराचे पुनर्मूल्यांकन न करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या महापालिकेच्या वरिष्ठ लिपिक आला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सोहेल पठाण फेज अहमद पठाण (52) असे अटकेतील लिपिकाचे नाव आहे. याप्रकरणी लिपिकाविरोधात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महापालिकेच्या सेंट्रल नाका येथील कार्यालयातील मालमत्ताकर विभागात तो कार्यरत आहे. डिसेंबर महिन्यात … Read more