बँकिंग, पेमेंट सिस्टीम आणि शेअर बाजारासह आजपासून ‘हे’ 7 नियम बदलले, याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या

PMSBY

नवी दिल्ली । आजपासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून नवीन महिना सुरू होत आहे. देशात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी काही बदल होतात, कारण काही नवीन नियम या तारखेपासून लागू होतात. आजपासून देखील काही बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होईल. हे नवीन लागू होणारे नियम किंवा बदल रुपया-पैशाचे व्यवहार आणि शेअर मार्केट ट्रेडिंगशी संबंधित … Read more

औरंगाबाद मनपाचा कौतुकास्पद उपक्रम ! आता श्वानांसाठी होणार स्वतंत्र स्मशानभूमी

औरंगाबाद – माणसाप्रति सर्वात इमानदार आणि प्रेमळ प्राणी म्हणून कुत्रा ओळखला जातो. पाळीव प्राण्यांची हौस असणाऱ्यांच्या घरातील श्वान हा त्या कुटुंबातील जणू सदस्यच असतो. तसेच शहरात, नागरी वसतींमध्ये फिरणारे भटके कुत्रेही अनेकदा कॉलनीच्या रक्षणकर्त्याची भूमिका निभावतात. त्यामुळे माणसाचा एक अगदी जवळचा, प्रामाणिक प्राणी म्हणून त्यांची अखेरपर्यंत योग्य काळजी घेण्याच्या उद्देशाने औरंगाबाद महापालिकेतर्फे लवकरच श्वानांसाठी स्वतंत्र … Read more

जरी भरला नाथसागर, तरी आमची रिकामी घागर; सोशल मीडियावर औरंगाबादकर संतापले

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेले जायकवाडी धरण पूर्णपणे भरल्याच्या वृत्ताने काल मराठवाड्यात आनंदी आनंद होता. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याआधी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याहस्ते जलपूजनदेखील करण्यात आले. मात्र धरणातील पाण्याचा संचय करणारा नाथसागर भरला तरीही शहरातील नळांना सहा दिवसांनीच पाणी येते, या भावनेने औरंगाबादकरांनी समाज माध्यमांवर … Read more

मंगळवरच्या पावसाने ‘स्मार्ट सिटीची’ दैना; मोठ्या प्रमाणावर नुकसान

manpa

औरंगाबाद – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे आलेल्या गुलाब चक्रीवादळाचा औरंगाबाद शहराला चांगलाच तडाखा बसला आहे. मंगळवारी शहरात ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसाने ‘स्मार्ट सिटी’ औरंगाबाद ची चांगलीच दाणादाण उडवली होती. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आता महापालिकेने शहरातील नुकसानाचा अहवाल तयार केला आहे. यानुसार शहरात 29 ठिकाणी … Read more

खुशखबर ! शहरात 4 ऑक्टोबर पासून ‘या’ वर्गांच्या शाळा होणार सुरू; ‘ही’ आहे नियमावली

School will started

औरंगाबाद – कोरोना लॉकडाऊन मुळे तब्बल दीड वर्ष शाळा महाविद्यालय बंद होते. परंतु, आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने महाराष्ट्र सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महानगर पालिका हद्दीतील 8 ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे आदेश मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी काढले आहेत. शाळा सुरू करण्यासाठी प्रशासकांच्या अध्यक्षतेखाली … Read more

औरंगाबादेत सलग 75 तास पोहण्याचा उपक्रम ! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता

swimming

औरंगाबाद – महानगरपालिकेतर्फे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत सलग 75 तास पोहण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात उद्या 30 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ जलतरण तलाव येथे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते सकाळी 9.00 वाजता या उपक्रमाचे उदघाटन होईल. … Read more

मनपाच्या आरोग्य केंद्रात चमत्कार ! लस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

corona vaccine

औरंगाबाद – रस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन ॲप हॅक करण्याचे प्रकार शहरात सुरूच आहेत. मंगळवारी मनपाच्या बायजीपुरा आरोग्य केंद्रावर तीन जणांनी लस न घेता प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी हा प्रकार लक्षात घेत तातडीने एका व्यक्तीचे रजिस्ट्रेशन रद्द केले. दोन जणांना प्रमाणपत्र मोबाईल वर गेले. त्यातील एका … Read more

मनपाची शाळा बनली जुगाराचा अड्डा !

jugar

औरंगाबाद – शहरात चक्क महापालिकेच्या शाळेतच जुगार अड्डा सुरु असल्याचा प्रकार समोर आला. पोलिसानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून तब्बल १४ जुगारींना पकडले. कारवाई झाली खरी मात्र पोलिसांचा वचक नसल्याने चक्क जुगाऱ्यांची चक्क शाळेतच अड्डा बनविला होता. हा प्रकार रविवारी (ता.२६) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास शास्त्रीनगरातील महापालिका शाळेच्या सुरक्षारक्षकाच्या खोलीत उघडकीस आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुभाष झंडूराम … Read more

शहरात ‘या’ ठिकाणी होणार चार्जिंग स्टेशन

औरंगाबाद – दिवसागणिक पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे अनेक नागरिक आता ई-वाहनांना अधिक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेतर्फे शहरात सात ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे. शहरातील मध्यवर्ती जकात नाका येथील मनपाच्या पेट्रोल पंपावर चार्जिंगची यंत्रणा उभारण्यात आली असून, लवकरच तेथे या सेवेचे लोकार्पण … Read more

शहरातील जातीवाचक वसाहतींची नावे मनपा बदलणार

औरंगाबाद – अलीकडेच महाराष्ट्र शासनाने जातीवाचक नावाचे गाव, शहरे, वस्ती आणि रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला. यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील 50 जातिवाचक वसाहतींच्या नावांची प्राथमिक यादी तयार केली आहे. संबंधित वसाहतीमधील नागरिकांकडून नवीन नावे मागवण्यात येतील, त्यानंतर वसाहतींची नावे बदलण्याचा निर्णय होणार असल्याचे उपायुक्त अपरणा थेटे यांनी सांगितले. जातीवाचक नावामुळे दोन … Read more