शहराची कचराकुंडी तात्पुरती टळली

औरंगाबाद – किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी शहरात साफसफाईचे काम करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या सुमारे 1100 कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे दिवसभर शहरातील एकाही भागात घंटागाडी गेली नाही. जागोजाग कचऱ्याचे ढीग पडून होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना, शहराची … Read more

विद्यार्थ्यांचा नुकसान भरून काढण्यासाठी मनपाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

  औरंगाबाद – कोरोना काळात शाळा ही ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. आता ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळांना रविवारी सुट्टी दिली जाते. औरंगाबाद महापालिकेने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या शाळा आता शनिवारी आणि रविवारी देखील सुरू राहणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या … Read more

मनपा भरणार 46 लाखांचा हफ्ता

औरंगाबाद – सातारा-देवळाई परिसराचा सहा वर्षांपूर्वी मनपात समावेश झाला. या भागात ड्रेनेज ची कोणतीही यंत्रणा नाही. 232 कोटी रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रस्तावाला तांत्रिक मंजुरी आवश्यक आहे त्यासाठी 2 कोटी 32 लाख रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावे लागणार आहेत. त्यातील पहिला टप्पा म्हणून 46 लाख रुपये सोमवारी महापालिकेकडून देण्यात … Read more

स्मार्ट सिटीचा उपक्रम; शहरातील 9 स्मशानभूमी करणार नयनरम्य

औरंगाबाद – महापालिकेने मागील काही वर्षांमध्ये स्मशानभूमीकडे कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये सर्वसामान्यांना दहा मिनिटे थांबू वाटत नाही. अनेक नागरिक तर स्मशानभूमीच्या प्रवेशद्वारावर उभे राहतात. स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील नऊ स्मशानभूमी विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. संचालक मंडळाचा होकार आल्यानंतर अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याचे काम सुरू होणार आहे. शहर चारही … Read more

इलेक्ट्रिक वाहनांसाठी शहरात उभारणार 200 चार्जिंग स्टेशन

औरंगाबाद – कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी केंद्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे धोरण आखले आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणार्‍यांना अनुदानसुद्धा दिले जात आहे. महापालिकेने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरात तब्बल 200 चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 15 व्या वित्त आयोगातून हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी दिली. … Read more

मनपाच्या नागरी मित्र पथकाने केला एक लाख 32 हजारांचा दंड वसूल

औरंगाबाद – महापालिकेच्या नागरी मित्र पथकाने शहराच्या विविध भागात दंडात्मक कारवाई करून एक लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान 15 पथकामार्फत 5 हजार 150 नागरिकांची लसीकरण प्रमाणपत्र तपासण्यात आले. यात 85 नागरिकांनी अध्याप लस न घेतल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून प्रतिव्यक्ती पाचशे रुपये प्रमाणे एकूण 42 हजार 500 रुपयांचा … Read more

दररोज लाखाच्या महसुलावर मनपा सोडते ‘पाणी’

औरंगाबाद – कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने कमी होत आहे. शासन आदेशानुसार बीबी का मकबरा, पाणचक्की इत्यादी पर्यटन स्थळे खुली करण्यात आली आहेत. मात्र शहरातील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाला अद्यापही कुलूप लावलेले आहे. त्यामुळे महापालिकेला दररोज एक लाख रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. औरंगाबाद शहरात दरवर्षी 30 लाखांवर पर्यटक येतात. बहुतांश पर्यटक मकबरा, पानचक्की, औरंगाबाद … Read more

कोणाच्या हस्ते होणार शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण?

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील आठवड्यात क्रांती चौक येथे बसविण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वी म्हणजेच 19 फेब्रुवारीच्या अगोदर करावे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी शनिवारी सकाळी पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर 9 फेब्रुवारी नंतर अनावरण कार्यक्रम घेण्याचा विचार सुरू आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या … Read more

शहरात दोन वर्षात 12 लाख 50 हजार कोरोना तपासण्या

Corona

औरंगाबाद – मागील दोन वर्षापासून देशभरात कोरोना तपासण्या मोफत केल्या जात आहेत. परंतु कोरोना टेस्ट वर होणारा कोट्यावधी रुपयांचा खर्च आता शासनाला परवडत नाही. त्यामुळे भविष्यात या तपासण्या सशुल्क कराव्या लागणार आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ॲंटीजेनची कीट 450 रुपयांना खरेदी करण्यात आली. आता खासगी कंपन्या त्याच कीट आरोग्य यंत्रणांना अवघ्या 9 रुपयांना विकत आहेत.‌ कोरोनाची … Read more

गुंठेवारी योजनेला मनपाकडून पुन्हा मुदतवाढ

औरंगाबाद – शहरातील अनाधिकृत मालमत्ता गुंठेवारी योजनेत अधिकृत करून देण्याची योजना मनपाने सुरू केली आहे. शहरात किमान 1 लाखाहून अधिक अनाधिकृत मालमत्ता असतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मनपाच्या नगररचना विभागाकडे फक्त पाच हजार फाईल दाखल झाल्या आहेत. या योजनेची अंतिम मुदत 31 जानेवारीपर्यंत होती. मात्र, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता 28 फेब्रुवारीपर्यंत गुंठेवारी … Read more