मुलीच्या आईने धमकावल्याने पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या

औरंगाबाद – एका पंधरा वर्षीय मुलाने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री फर्दापूर येथे घडली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद परवेज सय्यद राजिक (रा. ठाणा, ता. सोयगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. रविवारी रात्री फर्दापूर येथील एका हॉटेलमध्ये सय्यद परवेज याने गळफास … Read more

वाळू माफियांना दणका; तब्बल 46 कोटींचा ठोठावला दंड

sand

औरंगाबाद – गौण खजिन्यावर डोळा ठेवून महसूल यंत्रणेला न जुमानता अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्यांना तहसील प्रशासनाने दुसऱ्यांदा दणका दिला आहे. तालुक्यातील वाळूज मंडळातील आसेगाव येथील वाळू माफियांना शेहचाळीस कोटीचा दंड ठोठावून त्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवण्यात आला आहे. वाळूची चोरटी वाहतूक रोखण्यासाठी ही मोहीम तीव्र करणार असून, वेळ पडल्यास संबंधितांच्या जमिनीच्या लिलावातून दंड वसूल करणार असल्याचे … Read more

नात्याला काळीमा! मुलानेच केला बापाचा खुन

murder

औरंगाबाद – वडीलाच्या त्रासामुळेच आईने जाळून घेतल्याचा राग धरून मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात वीट मारून खून केल्याची घटना काल सकाळी दहेगाव बंगला येथे उघडकीस आली. कडुबाळ मुरलीधर सोनवणे (55) असे दुर्दैवी पित्याचे नाव आहे तर अनिल सोनवणे (24) असे आरोपी मुलाचे नाव आहे. कडूबाळ सोनवणे यांच्या पत्नीने दहा वर्षांपूर्वी जाळून घेत आत्महत्या केली होती. त्यामुळे … Read more

पोलीस दखल घेत नसल्याने कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद – शेजाऱ्यांनी केलेल्या मारहाणीची दखल पोलिस प्रशासन घेत नसल्याने फुलंब्री येथील कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. यासाठी या कार्यालयाच्या झाडावर गळफास घेण्यासाठी दोरही टाकला होता. दरम्यान पोलिसांनी कुटुंबाची समजूत काढून तक्रार देण्यासाठी फुलंब्री पोलिस ठाण्यात पोलिसांच्या वाहनाने पाठवण्यात आले. याबाबातच्या निवेदनात फुलंब्री येथे विठ्ठल रखुमाई मंदिरामागे राहणाऱ्या शोभा राजू बिरसने यांनी म्हटले आहे … Read more

शेतीच्या वादातून दोन गटात भिडले; वृद्धाला काठीने मारहाण

औरंगाबाद – जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील बिलोनी या गावात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेत जमिनीच्या वादातून हे दोन गट आपसात भिडले आहेत. यावेळी दोन्ही गटांनी लाठ्या-काठ्या तसेच शेतातील दगडाने एकमेकास मारहाण केली आहे. कुटुंबातील एका सदस्याने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं … Read more

बाप लेकीच्या नात्याला काळीमा ! बापानेच केला स्वतःच्या मुलीवर अत्याचार

rape

  औरंगाबाद – नराधम बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना वाळूज औद्योगिक परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी नराधम बापा विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधम बापाला अटक करण्यात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद वाळूज पोलिस ठाणे हद्यीतील गुरूधानोरा येथे नेवरगाव येथे एक … Read more

नशा आणणाऱ्या औषधांचा मोठा साठा जप्त

Medicine Tablet

औरंगाबाद – नशेखोरंना विक्री करण्यासाठी चोरट्या मार्गाने विक्रीकरिता आणलेल्या गुंगीवर्धक नशेच्या गोळ्यांचा साठा, खोकल्याचा औषधीसहा उस्मानपुरा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तौफिक रफिक फारूकी (41, रा. ब्रिजवाडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी उस्मानपुरा पोलिसांनी सांगितले की, उस्मानपुरा परिसरातील झोपडपट्टीतील अल्पवयीन मुले तसेच शहरातील अनेकांना औषधी गोळ्या खोकल्याच्या औषधांचा नशेसाठी वापर करण्याचे व्यसन जडले आहे. … Read more

औरंगाबादेत ‘स्पेशल 26’; मंत्रालयात ओळख सांगून हॉटेल मालकाला 41 लाखांचा चुना

Money

औरंगाबाद – कोरोना काळात तुम्हाला जेवण पुरवण्याचे कंत्राट देऊ त्यासाठी 70 ते 80 लाख डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील असे म्हणत दोघांनी शहरातील हॉटेल चालकाची 41 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रजनी रानमारे आणि संदीप बाबुलाल वाघ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भक्तबंधु रामचंद्र पाढी हे शहरात शहरात एक … Read more

शेतकऱ्याच्या हातातील दीड लाखांची बॅग भरदिवसा पळवली; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

crime

औरंगाबाद – दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी शेतकऱ्याच्या बातातील दीड लाख रुपयांची रक्कम हातोहात पळवल्याची घटना गंगापूर तालुक्यात घडली. विशेष म्हणजे भर दुपारी रस्त्यावर वर्दळ असताना ही घटना घडली. मागील वर्षभरात तालुक्यात गंगापूर, घरफोडी आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी बहुतांश घटनांचा पूर्ण तपास करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत … Read more

माजी प्राचार्यांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करत 10 कोटींची मालमत्ता परस्पर विकली

औरंगाबाद – एका माजी प्राचार्यांच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करून त्यांची सुमारे दहा कोटींची मालमत्ता परस्पर विकण्यात आल्याच्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा तसेच बारा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित बारा वर्षीय मुलाच्या चुलत भावांनी निवेदनाद्वारे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. एका माजी प्राचार्यांच्या पहिल्या पत्नीचे 2015 मध्ये … Read more