भरदिवसा रस्त्यावर गाडी अडवून वसुलीचा प्रकार; पैसे देण्यास नकार दिल्याने दुचाकीस्वारावर प्राणघातक हल्ला

औरंगाबाद – भररस्त्यावर गाडी अडवून 300 रुपयांची मागणी केली. ड्युटीवरून घरी परतत असलेल्या दुचाकीस्वाराने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर पोस्ट ऑफिस रस्त्यावर घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, तुकाराम बाजीराव देशमुख (वय-59 … Read more

बहुचर्चित 30-30 घोटाळ्याचा मास्टरमाईंड पोलिसांच्या ताब्यात

औरंगाबाद – मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या ‘तीस-तीस’ घोटाळ्यातून लोकांची फसवणूक करणाऱ्या संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. तीस-तीस योजनेत लोकांकडून गुंतवणूक करुन साठेअठरा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप राठोडवर आहे. दरम्यान या घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधी रुपयांत असण्याची शक्यता आहे. 30-30 योजनेत लोकांकडून गुंतवणूक केल्याची कबुली संतोष राठोडनं दिली होती. बिडकीन पोलिस ठाण्यास … Read more

आधी डोक्यात घातला दगड, मग जाळले गुप्तांग; तरुणाच्या अमानूष हत्येने हादरले शहर

औरंगाबाद – शहरात खुनांचे सत्र सुरूच असून एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या मैदानात ही हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचे गुप्तांग जाळल्याचंही उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मिसारवाडी भागातील खुनाची घटना ताजी असतानाच … Read more

धक्कादायक ! आई घरी नसल्याचे पाहून घरमालकाचे 13 वर्षीय मुलीशी गैरवर्तन

औरंगाबाद – राज्यात तसेच औरंगाबादेत मागील काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. अशातच अल्पवयीन मुलीची आई संध्याकाळी कामानिमित्त बाहेर गेलेली पाहून घरमालकाने मुलीशी गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला. मात्र घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील लोक तिच्याकडे धावले. त्यानंतर ही सर्व घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी घरमालकाला बेड्या … Read more

नशा करणाऱ्या युवकांना वॉचमनने थांबविले, मग युवकांनी वॉचमनलाच…

औरंगाबाद – नशा करण्यासाठी जात असलेल्या काही युवकांना वॉचमनने थांबवण्याचा राग आल्याने या युवकांनी वॉचमनलाच बेदम मारहाण केल्याचा प्रकार काल दुपारच्या सुमारास शहरातील टीव्ही सेंटर भागातील नवीन कॉम्प्लेक्स येथे घडला‌. याप्रकरणी वॉचमनच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्ही सेंटर येथील पोलिस कॉलनी मागे असलेल्या मोकळ्या … Read more

घर रिकामे करण्याच्या वादातून पतीचा पत्नीवर चाकूहल्ला

crime

औरंगाबाद – घर रिकामे करण्याच्या वादावरून पतीने पत्नीला बेदम मारहाण करत चाकू हल्ला केल्याची घटना शहरातील रमानगरात उघडकीस आली आहे. या विवाहितेला घाटीत दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानपुरा भागातील रमानगरातील रमेश शिरसाठ या कंपनीतील कामगार आहे. गल्लीत बदनामी … Read more

मावस भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

rape

औरंगाबाद – अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच वारंवार अत्याचार करून गर्भवती केले. पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम भावाला बेड्या ठोकल्या आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की, गोलवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्याच मावस भावाने वारंवार अत्याचार केल्याने … Read more

घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करणारे दोघे जेरबंद

police

औरंगाबाद – घरगुती गॅस वापराचा उपयोग रिक्षात इंधनासाठी करत असलेले दोघांना गुन्हे शाखेच्या टीमने जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने 3 लाख 74 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल ढोमे यांनी दिली. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक गजानन सोनटक्के यांच्या पथकाला सिल्क मिल कॉलनी समोर हमिदिया गार्डन कॉलनीतील एक गाळ्यात आरोपी … Read more

कोयत्याने वार करून वृद्धाचा निर्घृण खून

Murder

औरंगाबाद – विवाह समारंभ आटोपून आपल्या शेतातील घराकडे निघालेल्या शेतकऱ्याला रस्त्यात गाठून त्याचा खून करण्यात आल्याची घटना कन्नड तालुक्यात घडली. कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील शेतकरी जगन्नाथ साळुबा मनगटे (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कोयत्याने वार करून हा खून केल्याने संपूर्ण कन्नड शहरात एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जगन्नाथ … Read more

औरंगाबादेत बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – बनावट नोटा छापणाऱ्या टोळीच्या मुसक्या पुंडलीकनगर पोलीसांनी आवळल्या आहे. उच्च शिक्षित सराईत आरोपी हुबेहुब बनावट नोटा तयार करायचा, मुकुंदवाडीतील रुम किरायाने घेऊन बिनबोभाट हा गोरखधंदा सुरु होता. पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला. आरोपींच्या ताब्यातून 500, 100, 50 रुपयांच्या सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. तसेच बनावट नोटा तयार … Read more