कार्यालयात घुसून व्यावसायिकाला मारहाण करीत दिवसाढवळ्या तब्बल 13 तोळे सोने लंपास

औरंगाबाद – जमीन खरेदी- विक्रीचा व्यावसाय करणाऱ्या 66 वर्षीय वृद्धाच्या कार्यालयात जाऊन दोन अज्ञात आरोपीनी बेदम मारहाण करीत तब्बल 13 तोळे वजनाच्या गळ्यातील तीन सोन्याच्या चेन ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी वरद गणेश मंदिरा मागे घडली. या घटनेमुळे परिसरातील व्यवसाईकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशोक शनकारराव पाटील असे लूट झालेल्या व्यावसायिकांचे नाव आहे. या … Read more

दहावीच्या परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी मागितले 30 हजार रुपये; संस्थाचालकास अटक

औरंगाबाद – शिक्षणतज्ञ, संस्थाचालक एस.पी. जवळकर याने दहावीच्या विद्यार्थ्याला हॉलतिकीट आणि परीक्षेत मदत करण्यासाठी 30 हजार रुपये मागितले. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात एस.पी. जवळकर हे दहा हजार रुपयांची लाच घेताना शाळेतच रंगेहाथ पकडले गेले आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कलावती देवी चारीटेबल ट्रस्ट चे … Read more

धक्कादायक! 100 रुपयांवरुन युवकाचा खून; मृतदेह फेकला कचऱ्यात

औरंगाबाद – दारूच्या अवैध अड्ड्यावर काम करणाऱ्या 18 वर्षीय युवकाचा शंभर रुपये चोरल्याच्या संशयावरून मारहाण करत खून केल्याची घटना शहरातील आनंदनगरात बुधवारी रात्री घडली. आरोपीने पहाटे दुचाकीवर मृतदेह घेऊन करगिल मैदानाजवळील कचऱ्यात फेकला. पुंडलिक नगर पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शेख अश्पाक उर्फ मुक्या शेख अब्दुल (18, … Read more

भरधाव ट्रक-रिक्षाचा भीषण अपघात; दोन ठार

औरंगाबाद – भरधाव आयशर ट्रक आणि रिक्षात जोरदार टक्कर होऊन रिक्षा चालकासह दोन जण ठार झाले. तर किरकोळ जखमी झालेल्या ट्रक चालकाने मात्र पळ काढला. ही घटना वरुड काजी ते शेंद्रा एमआयडीसी रस्त्यावरील मांडकी कमानीजवळ काल रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. रिक्षाचालक ज्ञानेश्वर विष्णू जाधव आणि आनंद गायकवाड अशी मृतांची नावे आहेत. रिक्षाचालक जाधव हे … Read more

महिलादिनीच पतीने केली पत्नीची हत्या

औरंगाबाद – एकीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना एका निर्दयी पतीनेच पत्नीच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पैठण शहरापासून जवळच असलेल्या औरंगाबाद रोडवरील संस्कृती हुरडा पार्टी येथे रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी आरोपीसह एकाला ताब्यात घेऊन पैठण ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक मोहनराव मुकुटमल (वय 35 रा.पैठण … Read more

आई-वडिलांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला, पती दारुडा निघाल्याने सोडले सासर, अखेर…

rape

औरंगाबाद – आई-वडिलांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. अवघ्या दोन वर्षांतच त्याने रंग दाखविण्यास सुरुवात केली. प्रचंड दारू पिऊन दररोज मारहाण करू लागला. हा जाच सहन होत नसल्यामुळे शेवटी दीड वर्षाच्या मुलाला घेऊन तिला घराबाहेर पडावे लागले. काही दिवस नातेवाइकांकडे काढल्यानंतर शेवटी शहर पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाकडे मदतीचा हात मागितला. दामिनी पथकानेही मदतीचा हात देत त्रासलेल्या युवतीची … Read more

रंगाच्या व्यापाऱ्याला साडेबारा लाखांचा ‘चुना’

औरंगाबाद – शहरातील बीड रोडवरील निपाणी येथील पेंट्स कंपनीच्या गोदामातून फोनवर संपर्क झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवून 12 लाख 61 हजार 165 रुपये किमतीचे 1 हजार 724 कलरचे डब्बे आयशर गाडीत भरले. हे डबे शहरातील चेलीपुरा भागात देण्यास सांगितले. मात्र अनोळखी व्यक्तीने हमाल तेथे न उतरवता अकोला येथे घेऊन जात फसवणूक केली. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी दिलेल्या … Read more

नात्यातील भावानेच घटस्फोटित महिलेवर केला अत्याचार

औरंगाबाद – नात्यातीलच एका नराधमाने असहाय घटस्फोटित महिलेला तुझ्या मुलीसह तुझा सांभाळ करीन म्हणत लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. इतकेच नव्हे तर ‘ती’ गर्भवती राहिल्यानंतर मुलीला मारून टाकीन अशी धमकी देत गर्भपात करण्यास भाग पाडून पाच लाख रुपये लाटले. याप्रकरणी नात्यातील भावाविरोधात क्रांती चौक पोलिसांत २२ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. … Read more

धक्कादायक! अल्पवयीन मुलांनी केला चिमुकलीवर अत्याचार

औरंगाबाद – एका चार वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घराच्या गच्चीवर नेऊन दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी वाळूज उद्योगनगरातील बजाजनगरात घडली. याप्रकरणी चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध एमायडीसीवाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी शेजारील एक 13 वर्षीय व दुसर्‍या 10 वर्षीय मुलाने चिमुकली खाऊ देत … Read more

दिल्लीचे भोंदू बंटी-बबली पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद – पती-पत्नीमधील वाद मिटवण्याची थाप मारून विधी-पूजाच्या नावाखाली रुमालात ठेवलेले साडे पाच तोळ्यांचे दागिने हातचलाखीने लांबविणाऱ्या परप्रांतीय भोंदू जोडप्याला उस्मानपुरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई वाळूज भागात शुक्रवारी करण्यात आली. अबीद रशीद आणि नगिना खान अशी अटकेतील भोंदूची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाकेरा … Read more