औरंगाबाद शहरात ३७ केंद्रांवर महापालिकेकडून लसीकरण अभियान

औरंगाबाद | राज्य सरकारच्या निर्देशानुसार ४५ वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना एक एप्रिलपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. या लसीकरण अभियानाची तयारी महापालिकेने केली असून शहरात ३७ केंद्रे यासाठी तयार केले जाणार आहेत. लस घेण्यासाठी येताना नागरिकांना मतदान कार्ड, आधार कार्ड किंवा पॅनकार्ड या पैकी एक पुरावा सादर करावा लागणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी … Read more

महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला, सरकारकडून आज दहा हजार लसींचे डोस मिळण्याची शक्यता

औरंगाबाद | महापालिकेकडील कोरोना लसींचा साठा संपला आहे. पालिका आता नवीन साठ्याच्या प्रतीक्षेत आहे. आज दहा हजार लशींचे डोस प्राप्त होतील, असे मानले जात आहे. सरकारच्या निर्देशानुसार शहरात १६ जानेवारीपासून लसीकरणीची मोहीम सुरू करण्यात आली. आतापर्यंत सुमारे ८५ हजार व्यक्तींचे लसीकरण महापालिकेच्या माध्यमातून झाले आहे. सरकारकडून महापालिकेला लस पुरविली जाते. पालिकेच्या माध्यमातून विविध आरोग्य केंद्रे … Read more

जि.प.च्या भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प, वैज्ञानिकच नसल्याने टंचाईग्रस्त गावांची पंचाईत

औरंगाबाद | जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वैज्ञानिकांची तीन पदे मंजूर असून त्यापैकी एक पद भरण्यात आले आहे. तेसुद्धा वैद्यकीय रजेवर गेल्याने भूजल सर्वेक्षणाची कामे मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मात्र प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी सध्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे भूवैज्ञानिकच नसल्यामुळे टंचाईग्रस्त गावांची पंचाईत … Read more

रात्रीची संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची कारवाई…

औरंगाबाद | शहरात रात्री आठनंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी वाहने थांबवून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाई करत दंड वसूल केला. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी रात्री आठनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात … Read more

आव्हानात्मक परिस्थितीत उद्योगांची वाटचाल, योग्य काळजीसह कंपन्यांमध्ये उत्पादन सुरू

औरंगाबाद | शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. प्रशासनाने अंशत: लॉकडाउनसह गर्दी व प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक निर्बंध घातले आहेत. उद्योगांना आवश्यक त्या उपाययोजना, तपासणी, चाचणी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करत उद्योगांमध्ये उत्पादन सुरू आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शहर व जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला, सध्या रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रशासनाने अंशत: … Read more

मार्च संपत आला तरी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार रखडले; जीएसटीची रक्कम २४ कोटींच्या घरात

औरंगाबाद | मार्च महिना संपत आला तरी राज्य सरकारकडून महापालिकेला जीएसटीची रक्कम अद्याप मिळाली नाही. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जीएसटीची रक्कम मिळावी, यासाठी पालिकेकडून सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. राज्य सरकारकडून महापालिकेला दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जीएसटीची रक्कम दिली जाते. सरकारकडून मिळणारी ही रक्कम २४ कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यापैकी सुमारे २१ कोटी रुपये … Read more

नागरिकांनो सावधान! व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण….

औरंगाबाद | मनपा आरोग्य विभाग व जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या सहकायार्ने शहरात सहा ठिकाणी कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. त्यातून 61 व्यापाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. एसएसएस शाळेत 119 पैकी 12 पॉझिटिव्ह, पैठण गेट 125 मधून आठ पॉझिटिव्ह, महावीर भवनात 77 पैकी 9 पॉझिटिव, शहागंज मध्ये 143 पैकी 13, अग्रसेन भवनात 150 पैकी … Read more

पॉझिटिव्ह रूग्ण एक हजारांपर्यंत गेल्याने शहरात २१ कोवीड केअर सेंटर सुरू करणार

औरंगाबाद | शहरात दररोज एक हजार पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्णांवर कुठे उपचार करावेत, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला असून, युध्दपातळीवर २१ कोवीड केअर सेंटर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यातील ९ केंद्रे सुरूही झाली आहेत. आजा सुरू केलेले केंद्र दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हाउसफुल्ल होत आहे. दररोज … Read more

रुग्णांना कुठलीही असुविधा होता कामा नये, विभागीय आयुक्तांनी टोचले मनपा अधिकाऱ्यांचे कान

औरंगाबाद | औरंगाबादेत गेल्या काही दिवसांपासून कोविड सेंटरमधील असुविधा संबंधी सातत्याने वृत्त प्रकाशित होत आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मेल्ट्रोन व एम आय टी येथे सुरू केलेल्या कोविड सेंटर ला सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी सर्व सुविधांचा आढावा घेऊन, रुग्णांना कुठल्याही असुविधा होता कामा नये. अशा शब्दात त्यांनी मनपा डॉक्टर व अधिकाऱ्यांचे कान टोचले असल्याचे … Read more

मनपाच्या हलगर्जीपणाने रस्त्याचे नऊ कोटी पाण्यात जाण्याची शक्यता

औरंगाबाद | शासनाने दिलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून, शहरातील रस्त्याचे कामे होत आहे. या अंतर्गतच मोंढा नाका, जाफर गेट ते रविवार बाजार कॉर्नर या रस्त्याचे काम केले जात आहे. परंतु हे काम करत असताना, रस्त्यात येणारे विद्युत खांब ‘जैसे थे’ ठेवत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर खर्च होणारे सुमारे 9 कोटी रुपये पाण्यात जाण्याची … Read more