रात्रीची संचारबंदी असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल, जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची कारवाई…

औरंगाबाद | शहरात रात्री आठनंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनधारकांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी वाहने थांबवून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाई करत दंड वसूल केला. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी रात्री आठनंतर विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात … Read more

जिल्हाधिकाऱ्यांकडून लॉकडाऊनचे संकेत, आता पर्यंत टाळले,वेळ आली तर उद्योगाबाबत विचार करू

औरंगाबाद | आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत जिल्ह्यात अंशतःलॉक डाऊन लावून देखील नागरिक कारणे दाखवून रस्त्यावर फिरत आहेत. नागरिकांनी मदत करावी आता पर्यन्त प्रशासनाने लॉकडाऊन टाळले मात्र वेळ आलीच तर उद्योगा बाबत विचार केला जाईल.असे म्हणत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी औरंगाबादेत लॉकडाऊनचे संकेत तर दिले नाही ना अशी चर्चा सुरू आहे. आज … Read more

लॉकडाऊनबाबत येत्या काही तासांत निर्णय; पालकमंत्र्यांचे सुतोवाच

औरंगाबाद : शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यातील 85 टक्के रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत तसेच मृत्यू दरही एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाचा संसर्ग रोखला पाहिजे. यामुळे अंशतः लॉकडाऊन केला रात्रीची संचारबंदी ही लावली, परंतु रुग्ण संख्या वाढतच आहे. यामुळे कडक लॉकडाऊन लावण्याबाबत विचार करावा लागेल. येत्या … Read more

नागरिकांची पिळवणूक थांबवा; भाजपची पालकमंत्र्यांकडे मागणी

औरंगाबाद : कोरोना परिस्थितीतही जिल्हयातील नागरिकांची होणारी पिळवणूक त्वरित थांबवा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन देखील देसाई यांना देण्यात आले आहे. त्यात नमूद केल्याप्रमाणे, कोरोना महामारीसारख्या परिस्थिती मध्ये शहरात दररोज दीड ते दोन हजार रुग्ण आढळून येत आहेत. अशा वेळी शासकीय यंत्रणा नागरिकांना सेवा देण्यासाठी … Read more

दहावी- बारावीच्या विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा देऊ द्या, हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने केली बोर्डाकडे विनंती

औरंगाबाद | दहावी- बारावीच्या परीक्षेत मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनीना बुरखा किंवा स्कार्फ घालून परीक्षा देण्याची अनुमती द्यावी, यासह आदी मागण्यांसाठी हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ औरंगाबाद  विभागीय सचिव  सुगता पुन्ने यांची भेट घेतली. हॅपी टू हेल्प फाऊंडेशनच्या वतीने बोर्डाच्या सचिव पुन्ने यांच्याशी माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा … Read more

दिलासादायक…! घाटी रुग्णालयातील २५ रुग्णांना पाठविले घरी

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा एकीकडे ७२ हजार पार गेला आहे. त्यामुळे चिंता जरी वाढली असली तरी दुसरीकडे बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उपचार घेऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील वाढल्याने दिलासा मिळाला आहे.  घाटी रुग्णालयात आज पुन्हा २५ रुग्णांना सुट्टी देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. घाटीत आज आयसीएमआरच्या नवीन नियमानुसार २५ … Read more

‘या’ तारखेपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढला कहर ,पंधरा दिवसापासून धक्कादायक आकडा; काळजी घेण्याचे आवाहन

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा प्रतिदिन वाढत चालला आहे. यामुळे सर्वाधिक चिंतेत भर पडली आहे. ११ मार्चपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. ११ ते २४ मार्चपर्यत प्रतिदिन येणारा आकडा हा धक्कादायक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आकडा पाहिला तर १० मार्चपर्यत पाचशे पर्यत कोरोनाचे रुग्ण प्रतिदिन … Read more

शहरातील रस्त्यांची कामे मेअखेर पूर्ण करा -पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश

औरंगाबाद | शासन अनुदानीत शहरी सडक योजनअंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या 152 कोटी व 100 कोटी निधीच्या माध्यमातून सुरु असलेल्या रस्त्यांची कामे मे अखेर पूर्ण करावीत, असे निर्देशित करुन शहरातील विविध विकास योजनांची अंमजबजावणी विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योग, खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महानगरपालिकेच्या विकास कामांच्या … Read more

घाटीत आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने बळी

औरंगाबाद | घाटी रुग्णालयात आणखी दहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे घाटी रुग्णालयात आतापर्यंत ११९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे घाटी रुग्णालयाने जाहीर केले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा आकडा एकीकडे वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील आणखी दहा रुग्णांचा घाटी रुग्णालयात मृत्यू झाला … Read more

महापालिकेची नोकरभरती लांबणीवर, सेवाभरती नियमांत सरकारने काढल्या त्रुटी

औरंगाबाद | राज्य सरकारने औरंगाबाद महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांचे आकृतीबंध मंजूर केले आहेत, पण सेवाभरती नियम मंजूर करताना राज्यातील सर्व महापालिकांमधील सर्व पदांसाठीची पात्रता सारखी असावी, असा निकष नगरविकास विभागाने ठरवला आहे. त्यादृष्टीने एकत्रित सेवाभरती नियमांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेत आकृतीबंधाचे भिजत घोंगडे होते. पाच वर्षांपासून आकृतीबंधाच्या प्रस्तावावर काथ्याकुट केला जात होता. … Read more