मनपाची मागील 8 महिन्यांत कोट्यावधींची करवसुली

औरंगाबाद – महानगरपालिकेच्या वतीने चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांच्या कालावधीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कराची मिळून एकूण तब्बल 81 कोटी 78 लाख रुपयांची वसुली करण्यात आली असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे. यामध्ये मालमत्ता कराचे 63 कोटी 89 लाख तर पाणीपट्टीचे 17 कोटी 79 लाख रुपयांचा समावेश आहे. वसुली ची सरासरी टक्केवारी 14.75 इतकी आहे. कोरोना … Read more

जिल्ह्याभरात 26 बसेसची चाके फिरली; ‘या’ मार्गांवर सुरु झाली बससेवा

st bus

औरंगबाद – महिनाभरापासून सुरु असलेल्या संपात सहभागी झालेल्यांपैकी काल आणखी 55 कर्मचारी रुजू झाल्याने एकूण 530 संपकरी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विभागातील सिल्लोड आगार सुरु झाला असून, या आगारातून फुलंब्रीसाठी दोन बसच्या 4 फेऱ्या करण्यात आल्या. तर वैजापूर आणि गंगापूर आगार मंगळवारीच सुरु झाले होते, मात्र काल दिवसभरात या दोन्ही आगारातून एकही … Read more

सुखद ! ग्रामीणमध्ये 315 दिवसांनंतर एकही कोरोना रुग्ण नाही

औरंगाबाद – जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी आणि आरोग्य यंत्रणेसाठी कालचा मंगळवार दिलासादायक ठरला. ग्रामीण भागात तब्बल 315 दिवसानंतर दिवसभरात एकाही कोरोना रुग्णाचे निदान झाले नाही. त्याच बरोबर मागील 24 तासात जिल्हाभरात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर शहरातही अवघ्या तीन कोरणा रुग्णांची वाढ झाली आहे. औरंगाबाद शहरात मार्च 2020 मध्ये पहिल्या कोरोना रुग्णाचे निदान झाले … Read more

अनेक संपकरी एसटी कर्मचारी कामावर परतले; आतापर्यंत ‘इतके’ कर्मचारी परतले कामावर

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे कर्मचारी 8 नोव्हेंबरपासून संपावर आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी कर्मचारी संपावर आहेत. एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात संपकरी अनेक कर्मचारी आता कामावर परतत आहेत. तीनच दिवसांत कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 358 वरून 473 झाली आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले जात आहे. तब्बल 28 दिवसांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच … Read more

राष्ट्रवादीचे नेते उल्हास उढाण यांचे निधन

ncp

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकरा मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन सदस्य, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास उढाण यांचे मध्यरात्री 2:30 वाजेदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह, विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, डॉ. उधाण काल मित्रांच्या भेटीसाठी मालेगावला गेले होते. रात्री 11 वाजेदरम्यान घरी पोहचले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ … Read more

शहरातील शहागंजमधील झुलेलाल मंदिरात जबरी चोरी

chori

औरंगाबाद – शहरातील सिंधी समाजातील नागरिकांचे कुलदैवत असलेल्या शहागंजातील श्री झुलेलाल साई मंदिरात चोरट्यांनी दोन चांदीच्या मूर्ती, दानपेटीसह अनेक वर्षांपासून 24 तास तेवत असलेल्या दिव्याची समई लंपास केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सचिन परसराम करमाणी (रा.सिंधी कॉलनी) यांनी … Read more

एसटीच्या टपावर चढून वाहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

st

लातूर – महामंडळाचे राज्यशासनाने विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मागील 40 दिवसांपासून एसटी कामगार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, रविवारी लातूर जिल्ह्यातील औसा आगारातील एका वाहकाने एसटीच्या टपावर चढून अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि उपस्थित आंदोलन कामगारांनी वेळेस मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद … Read more

प्रभाग रचनेनेचा कच्चा आराखडा आज होणार सादर

औरंगाबाद – राज्य निवडणूक आयोगाकडे महानगरपालिका प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा आज सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य शासनाने औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्याचे ठरवले आहे. त्यातच वाढलेल्या लोकसंख्येनुसार नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय देखील राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार नगरसेवकांची संख्या वाढवून प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्याचे आदेश … Read more

पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून 1 कोटींचा गुटखा केला जप्त

police

औरंगाबाद – औरंगाबाद-जालना महामार्गावर शेकटा परिसरात गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक काल दुपारी दीड वाजता पाठलाग करून पकडला. या कारवाईत तब्बल एक कोटी पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई खबऱ्यामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या पथकाने केली. ​ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक कोटी पेक्षा जास्त रकमेचा गुटखा घेऊन एम.एच.04 … Read more

औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती ! सख्या भावानेच केली बहिणीची हत्या

murder

औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यात सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेम विवाह केल्यामुळे अल्पवयीन भावाकडून मोठ्या बहिणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. यादरम्यान पतीने पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, … Read more