दारुड्या मुलाने बापावरच केले कुऱ्हाडीने वार

Crime

औरंगाबाद – घरात सुनेला मारहाण करणाऱ्या दारूड्या मुलाला समजावण्यासाठी गेलेल्या बापा वरच मुलाने कुर्‍हाडीने वार केल्याची घटना काल वैजापूर तालुक्यात घडली.‌ कडू बागुल (रा. खंडाळा) असे मारहाण करणाऱ्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कडू बागुल याने बुधवारी सकाळी दारू पिऊन पत्नी सविता आईला मारहाण केली. याचवेळी शेजारी राहत असलेले त्याचे वडील रामदास … Read more

झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृत बिबट्या

bibatya

औरंगाबाद – झाडांवर फांद्यांमध्ये लटकलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळल्याचा प्रकार आज सकाळी कन्नड तालुक्यातील आमदाबाद शिवारात समोर आला आहे. शिकार करताना फांदी मध्ये अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी काही शेतकरी शेतात जात असताना झाडावर लटकलेल्या अवस्थेत बिबट्या शेतकऱ्यांना दिसून आला. ही बाब गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर … Read more

औरंगाबादेत ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस

Aurangabad Rain

औरंगाबाद – काल सायंकाळपासून औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून गारठा पसरला आहे. शहरात रिमझिम पाऊस होत आहे. ग्रामीण भागात टाकाळी राजेराय, बाबरा, पाचोड, विहामांडवा, बालानगर येथे हलक्याशा सरी बसरल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील बसस्थानक परिसरात जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे कायगाव परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा कांदा, कापसाला बसल्याने नुकसान झाले आहे. तसेच जनजीवन विस्कळीत … Read more

चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी ‘ईतक्या’ फुटांनी वाढणार

aurangabad Airport

औरंगाबाद – शहरातील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर विस्तारीकरणास कराव्या लागणाऱ्या भूसंपादनाला सुमारे 517 कोटी रुपये लागतील असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवला आहे. ही फक्त जमिनीची किंमत असून बाधित मालमत्तांचे मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे भूसंपादनाचा खर्च एक हजार कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ही सगळी प्रक्रिया भूसंपादन नियमाने करायची की वाटाघाटीने याबाबत मात्र … Read more

जिल्ह्यातील 2494 शाळांची 20 महिन्यांनी वाजली घंटा

औरंगाबाद – तब्बल वीस महिन्यानंतर पहिली ते चौथीच्या चिमुकल्यांनी काल शाळेची वाट धरली. आईवडील आपल्या मुलांना शाळेच्या प्रांगणात सोडत होते. कुणाला मित्रांसोबत खेळायला मिळण्याचा आनंद होता, तर कुणी शाळेच्या भीतीने रडतखडत वर्गाकडे गेले. शाळांकडून नही फुगे, गुलाबपुष्प, बिस्किट देऊन तसेच रांगोळ्यांनी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागातील उत्साही कारभारी ही या उत्सवात सहभागी झाले. … Read more

आता एका दिवसात दिल्लीवारी शक्य !

औरंगाबाद – कालपासून इंडिगोने सकाळच्या वेळेत सुरू केलेल्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान सेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या विमान सेवेमुळे आता शहरातून दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर दिल्लीहून कनेक्टींग फ्लाईट ने पाटणा, जयपूर, डेहराडून, श्रीनगर आदी ठिकाणी जाणेही शक्य होणार आहे. यामुळे उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. इंडिगो एअरलाइन्स च्या वतीने … Read more

शहरात होणार 11 आधुनिक रुग्णालये; स्मार्ट हेल्थ अंतर्गत उपक्रम

औरंगाबाद – स्मार्ट सिटी प्रशासनाने शहरातील घाटी रुग्णालय यावरील वाढता ताण कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. स्मार्ट सिटीतून तब्बल 40 कोटी रुपये खर्च करून आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय काल घेण्यात आला. याअंतर्गत शहरातील आंबेडकर नगर, सिडको एन 2 कम्युनिटी सेंटर जवळ 10 कोटी रुपये खर्च करून दोन मोठी रुग्णालये उभारण्यात येतील. … Read more

कोलमडलेल्या आरोग्य सेवेबाबत काय कारवाई केली ?

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – राज्यातील ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली असल्याचा आरोप करणाऱ्या माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. याबाबत काय कार्यवाही केली याविषयी शपथपत्र दाखल करण्याचेही आदेश सचिवांना दिले आहेत. याचिकेवर 21 डिसेंबर रोजी … Read more

किरकोळ कारणावरून रुग्णाच्या नातेवाइकांकडून घाटीतील डॉक्टरांना मारहाण

Ghati hospital

औरंगाबाद – अपघात विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी किरकोळ कारणामुळे एका डॉक्टरला मारहाण केल्याची घटना काल रात्री साडेदहा वाजता घडली. या घटनेमुळे घाटी रुग्णालयातील सर्व डॉक्टर एकत्र होत काम न करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे काही काळ घाटीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली अपघात विभागाच्या … Read more

ओमिक्रॉनची धास्ती ! रेल्वे, विमान प्रवाशांची होणार कोरोना चाचणी

औरंगाबाद – कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून येणाऱ्या नागरिकांबाबत सावधगिरी बाळगली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने शहरात 1 डिसेंबरपासून नवी नियमावली जारी केली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार भयंकर वेगाने होत असल्याने नागरिकांनी लसीकरण करुन घेण्यावर प्रशासन जास्त भर देत आहे. तसेच रेल्वे आणि विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची कोरोना … Read more