एसटीचा तिढा कायम ! कर्मचारी संपावर तर महामंडळ निलंबनावर

औरंगाबाद – एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाईचा धडाका सुरूच असून काल औरंगाबाद विभागातील आणखी दहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात सिडको बस स्थानकातील पाच आणि पैठण आकारातील पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामुळे संपकरी कर्मचाऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांकडून तिसऱ्या दिवशी लढा सुरूच राहिला. औरंगाबाद शहरातील … Read more

अधिकाऱ्यांचा सत्कार, सिडको बसस्थानकातील 5 कर्मचारी निलंबित

ST employee

औरंगाबाद – संपात भाग न घेता काम करणारे एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून संपकरी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली गांधीगिरी पाच जणांना चांगलीच भोवली आहे. त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई काल करण्यात आली. मंगळवारी संपा दरम्यान सेवा बजावणाऱ्या चालक वाहकांच्या बस मध्ये जाऊन संपकऱ्यांनी सत्कार केला. अधिकाऱ्यांनी हटकल्याने संपकऱ्यांनी अधिकाऱ्यांनाही पुष्पहार घातला. यानंतर सिडको बस स्थानकातील पाच कर्मचाऱ्यांवर मंगळवारी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला ! ऐन दिवाळीत प्रवाशांचे बेहाल तर एसटीला 24 लाखांचे नुकसान

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारल्याने दिवाळीनंतर आपापल्या गावी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. या प्रवाशांना या संपाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद सिडको, पैठण, सिल्लोड, कन्नड, वैजापूर, सोयगाव या आगारातील कर्मचाऱ्यांनी काल सकाळपासूनच काम बंद आंदोलन केले … Read more

ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीची वाहतूक विस्कळित; कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणामुळे शहर बसही ठप्प

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. या उपोषणात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याबरोबरच शहर बसही … Read more

औरंगाबाद- सोलापूर महामार्गावर ‘द बर्निंग ट्रक’ चा थरार !

Car Burn

औरंगाबाद – औरंगाबादहून भरधाव वेगात मुरमुरे घेऊन बीडकडे जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतला. यात कंटेनरसह मुरमुरे जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे (ता.पैठण) जवळ घडली असुन सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक माहिती अशी, औरंगाबादहून मुरमुरे घेऊन कंटेनर भरधाव वेगात बीडकडे जात असताना बुधवारी पहाटे … Read more

खड्ड्यांमुळे महिलेची बसमध्येच प्रसूती, बाळाचा मृत्यू

baby

औरंगाबाद – गेल्या महिन्यापासून सतत होणारा पाऊस आणि जागोजागी साचलेले पाणी, रस्त्यावरील खड्डे यामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था तर खूपच गंभीर झाली आहे. याचाच एक दाखला म्हणजे सोमवारी रात्री घडलेली दुर्दैवी घटना. रात्रीची वेळ आणि प्रसूती वेदना सुरु झाल्याने शिऊर बंगला येथून एक महिला तिच्या पतीसह उपचारासाठी औरंगाबादच्या … Read more

धावती एसटी बस नदीत कोसळली ! सुदैवाने 25 प्रवासी बचावले

st

जालना – चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने 25 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पाण्यात कोसळल्याची घटना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदी वर काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन बसमधील पंचवीस प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. परतूर तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. … Read more

प्रवाशांसाठी खुशखबर! सर्वसामान्यांची लालपरी विविध मार्गावर सुरू

औरंगाबाद : अडीच महिन्यांच्या खंडानंतर एसटी महामंडळाच्या बस सेवेला 1 जून पासून सुरुवात झाली असून गुरुवारी औरंगाबाद विभागातून पुणे, धुळे, नाशिक, जळगाव, जालना आदी मार्गावर सुमारे 26 बसेस धावण्याची माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली. एसटी महामंडळाची बस सेवा अत्यावश्यक सेवेत असली तरी कोरोनाच्या दहशतीमुळे घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळले होते. यामुळे एसटीला ही प्रवासी … Read more

Breaking News : सातारा-पंढरपूर एसटी बसवर रात्री अज्ञांतांची दगडफेक; दरोडेखोरांचा लुटमारीचा डाव?

Pandharpur Satara ST Bus

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा-पंढरपूर एसटी बसवर मंगळवारी रात्री अज्ञांतांनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास सातारा- पंढरपुर रस्त्यावरील म्हसवड नजिकच्या पिलीव घाटात चार- पाच अज्ञात दरोडखोरांनी एसटी व मोटरसायकल चालकावरही दगडफेक केली आहे. हा दरोडेखोरांचा लुटमारीचा डाव असल्याचे बोलले जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हाती … Read more

आता सुट्या पैशांच्या बदल्यात जर दुकानदाराने टॉफी किंवा चॉकलेट घेण्यास भाग पडले तर येथे करा तक्रार, त्वरित होणार कारवाई

नवी दिल्ली । देशात सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. 8-9 महिन्यांनंतर पहिल्यांदाच बाजार पुन्हा गजबजला आहे. दुकानांवर गर्दी जमण्यास सुरुवात झाली असून लोक जोरदार खरेदी करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागते. आता समस्या सुटे पैसे किंवा ओपन मनी (Coin) ची आहे. असे अनेकदा पाहिले जाते की, जेव्हा आपण खरेदी (Products Purchase) … Read more