“माझा अभ्यास कमी पण भुजबळांचा ”व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन”; उदयनराजेंचा जोरदार टोला

सातारा । भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना उत्तर दिलं आहे. “भुजबळ हे वयाने मोठे आहेत. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही”, असा टोमणा उदयनराजे भोसले यांनी लगावला. उदयनराजे भोसले यांचा आरक्षणाचा (Maratha … Read more

प्रताप सरनाईकांवरील ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा भाग- छगन भुजबळ

मुंबई । शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच कार्यालयावर ईडीने छापेमारी सुरु केली आहे. आज सकाळीच ईडीचं पथक नाईक यांच्या घरी दाखल झालं. ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. याच प्रकरणी भुजबळांनी भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी ईडीची कारवाई ‘ऑपरेशन लोटस’चा (BJP Operation Lotus)भाग असू शकते, असं मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते … Read more

बाळासाहेबांचं मंत्रालयावर भगवा फडकविण्याचं एक स्वप्न पूर्ण, दुसरं आम्ही पूर्ण करु!- छगन भुजबळ

मुंबई । ”मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. मराठी माणसाचं पाऊल पुढे नेण्याचं दुसरं स्वप्नही आम्ही पूर्ण करु,” अशी भावना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलं. बाळासाहेबांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त भुजबळ छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर दर्शनासाठी आले होते. … Read more

आपल्याच मित्रपक्षाला संपवण्याचा भाजपच्या प्रयोगामुळे नितीशकुमाराना फटका ; छगन भुजबळांचा दावा

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून याच वरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा राहिलेला नाही हे निवडणुकीच्या कलावरून दिसून येत आहे, असा टोला त्यांनी लगावला तसेच ज्या पक्षाला सोबत घ्यायचे त्याच पक्षाला संपवायचे … Read more

राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्येही लक्ष घालतायत याचा आनंद; अर्णब गोस्वामी प्रकरणावर भुजबळांचा टोला

नाशिक । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांची चिंता करू नये. सरकारी नियमांनुसार त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात आहे, असे वक्तव्य राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केले. राज्यपाल लहानसहान गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन … Read more

आत्ता फक्त खडसे आलेत, अजून अनेक आमदार आमच्या संपर्कात ; छगन भुजबळांचा दावा

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता दिग्गज नेते छगन भुजबळ यांनीही उडी मारली आहे. आतापर्यंत भाजपमध्ये अनेक नेते जात होते आणि भाजप सुद्धा त्यांना आपलं सरकार येणार अस चॉकलेट दाखवत होते. पण आता मात्र एकनाथ खडसे भाजपमधून राष्ट्रवादी … Read more

सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करून घेणार – छगन भुजबळ

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नाशिकच्या लासलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासोबत चर्चा करून मंजुरीसाठी प्रयत्न करणार आहोत असे सांगत सद्यस्थितीत या योजनेतून होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा असा आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला … Read more

शब्दच्छल करणाऱ्यांनाही पवारांनी गारद केलंय; भुजबळांचा फडणवीसांवर पलटवार

मुंबई । शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुलाखतीवरून सुरू असलेल्या टोलेबाजीत आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी उडी घेतली आहे. शब्दच्छल करणाऱ्यांनाही पवारांनी गारद केलंय, असा टोला भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना त्यांचे नाव न … Read more

शिवभोजन आता फक्त ५ रुपयांत; करोनामुळं सरकारचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशा बंदच्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या योजनेचा … Read more

राजकारणातील अचूक टायमिंग अजित पवारांनी साधलं, राष्ट्रवादीची गाडी पुन्हा रूळावर

शरद पवार यांना ईडी चौकशीच्या दरम्यान देण्यात येणारा त्रास आपल्याला सहन होत नसल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून मी राजीनामा दिला, परंतु यावेळी मी याबद्दल कुणाशीही काहीच बोललो नव्हतो. या प्रकारामुळे जे दुखावले गेलेत त्यांची मी माफी मागतो. राजीनाम्याचा बऱ्याच दिवसांपासून विचार सुरु होता परंतु निर्णय होत नव्हता असं सांगत आता मात्र आपण शरद पवारांच्या म्हणण्यानेच पुढे जाणार असल्याचं अजित पवार म्हणाले.