भारतातून काठमांडूला जाऊन ‘यासाठी’ चिनी लस घेत आहेत भारतीय व्यापारी; जाणून घ्या काय आहे या बातमीमागील सत्य

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन।काठमांडूमध्ये भारतीय उद्योजकांना चिनी लस मिळत आहे. करोना विषाणूची चीनी लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय व्यावसायिक नवी दिल्लीहून काठमांडूला जात आहेत. एका मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा केला गेला आहे. यानुसार हे व्यापारी काठमांडूला केवळ चीनची लस घेण्यासाठी येत आहेत, जेणेकरून ते चीनला जाऊ शकतील. चीनची लस घेतली म्हणजे चीनला जाणे सोपे होईल असे … Read more

हाफकिनमध्ये होणार कोवॅक्सिनची निर्मिती; केंद्र सरकारची परवानगी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना लसीच्या तुटवड्या मुळे चिंता निर्माण झाली होती. अखेर आपल्याला दिलासादायक बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानी मिळाली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलीय. हाफकिनला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार … Read more

देशात करोना लस चोरीची पहिली केस आली समोर; सरकारी दवाखान्यातून 320 लसी चोरीला

corona vaccine

जयपूर। राजस्थानची राजधानी जयपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानात कोरोना लसीच्या कमतरते नंतर आता लसही चोरीला जात आहे. जयपूरच्या सरकारी रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीच्या 320 डोस ची चोरी झाली. आरोग्य विभागाने अज्ञात चोरट्यांविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. बेकायदेशीरपणे लस देणारे हे रॅकेट सक्रिय झाले आहे का? याची तपासणीही आरोग्य विभाग करणार आहे. … Read more

रेमदेसेविर इंजेक्शनचा साठा आणि काळाबाजार करणाऱ्या विरोधात कठोर कारवायीचे केंद्राचे आदेश – डॉ. हर्षवर्धन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। कोरोनावरील उपचारांसाठी प्रभावी उपायांच्या कमतरतेबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, सर्व संबंधितांशी या संदर्भात चर्चा झाली आहे आणि त्याचे उत्पादन वेगवान करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी फार्मास्युटिकल कंपन्यांनी कमी कोरोना प्रकरणांमुळे रेमदेसीविरचे उत्पादन कमी केले होते. पण आता कॉरोनाच्या वाढत्या केसेस बघून ते पुन्हा वाढवण्याची गरज आहे. परंतु आता पुन्हा … Read more

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मोदींना पत्र ; केल्या या मागण्या…

Raj Thackarey

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वेगाने वाढते आहे. तसेच राज्यात आज(14 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पाच प्रमुख मागण्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी म्हंटले आहे की,’ … Read more

लस घेतल्यानंतरही करोना का होतो? अदार पुणावाला यांनी दिले ‘हे’ उत्तर

adar punawala

मुंबई | करोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही अनेक लोकांना करोना झाल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक लोकांच्या मनात लसीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. सोबतच, यावर विविध पातळीवर चर्चा देखील सुरू आहे. यावर सिरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनीच स्पष्टीकरण देऊन नागरिकांच्या मध्ये असलेल्या या संभ्रमाला दूर केले आहे. एका वृत्तवाहिणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदर पूनावाला यांना करोनाची … Read more

चिंताजनक : महापालिकेकडे दोन दिवस पुरेल एवढा लसीचा साठा

औरंगाबाद | महापालिकेने सुरू केलेली मेगा लसीकरण मोहीम संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेकडे दोनच दिवस पुरेल एवढा लसीचा साठा आहे. दर आठवड्याला एक लाख लस देण्याची मागणी पालिकेने शासनाकडे केली आहे. पण या मागणीच्या तुलनेत लसींचा अत्यल्प साठा उपलब्ध होत असल्यामुळे एकूणच यंत्रणेसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या फक्त १८ हजार लसी उपलब्ध … Read more

केंद्राने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्यावी – विजय वडेट्टीवार

vijay vadettiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत असून कोरोना प्रतिबंधक लसीचा आलेला साठा दोन दिवसात संपेल. देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस देण्यापेक्षा, महाराष्ट्राला लस द्यावी, अशी मागणी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यात कोरोनाची स्थिती भीषण आहे. त्यामुळेच मी तीन आठवड्यांच्या कडक लॅाकडाऊनची … Read more

… तर मग रेमेडिसिवीरची वितरण व्यवस्था ‘या’ प्रशासनाकडे सोपवा : खासदार कोल्हे यांची राज्यसरकारकडे मागणी

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रेमेडिसिवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्या थेट वितरकांंमार्फत वितरण करत आहेत. मात्र त्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची परवड सुरू असल्याचे चित्र आहे. याचा गैरफायदा घेत जादा दराने इंजेक्शन विक्रीचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.तो रोखण्यासाठी तसेच गरजूंना रुग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत वितरणाची … Read more

कोरोना लस तयार करणार्‍या सीरमने ‘या’ मोठ्या कंपनीत केली गुंतवणूक, त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठे विमा एग्रीगेटर प्लॅटफॉर्म पॉलिसीबाजार (Policybazaar) चा IPO येत आहे. याआधीच लस तयार करणारी देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India- SII) ने त्यात हिस्सा घेतला आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पॉलिसीबाजार मधील हा भाग खासगी इक्विटी फंड मॅनेजर ट्रू नॉर्थ (True North) कडून … Read more