Big Breaking | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला ‘जनता कर्फ्यू’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इथून पुढचा काही काळ आपण सामाजिक अंतर ठेवून वागणच हितकारक आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विज्ञानाला अजूनही ठोस उपाय सापडला नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा वेळ सुजाण भारतीय नागरिक म्हणून मला द्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवून दुसऱ्यांनाही आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना … Read more

सचिन तेंडुलकरने केली करोना व्हायरसची टेस्ट क्रिकेटशी तुलना, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकार प्रमाणेच नागरिक सुद्धा काळजी घेताना दिसत आहेत. करोनासंबधी जनजागृतीसाठी अनेक सेलिब्रिटी सध्या जनजागृती करताना दिसत आहेत. करोनाला रोखण्यासाठी संपूर्ण स्वच्छता आणि दक्षता घेण गरजेचं असल्याची जाणीव भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि माजी फलंदाज सचिन तेंडुलकर यांनीही लोकांना करुन दिली आहे. दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने आता … Read more

कौतुकास्पद! करोनाचा धोका लक्षात घेत कोल्हापूरात अवघ्या २० लोकांच्या उपस्थितीत उरकलं लग्न

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातही कोरोनो व्हायरस सदृश रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाघवे इथल्या ऋतुजा शेलार आणि गारगोटी इथल्या किरण शिंदे यांचा विवाहसोहळा अवघ्या 20 लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा सोहळा म्हणजे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शिंदे आणि शेलार कुटूंबियांनी सर्व समाजाला … Read more

मोदी सरकारचा मोठा निर्णय, २२ मार्चपासून परदेशी विमानांच्या लँडिंगवर घातली बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात करोना व्हायरसमुळे मृत्यूची संख्या ४ झाली आहे. तसेच संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून १७७ झाली आहे. तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९ झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांमध्ये सर्वात जास्त संख्या परदेश दौरा करून भारतात परतलेल्यांची आहे. केंद्र सरकारने ही बाब लक्षात घेत २२ मार्चपासून परदेशातून भारतात येत असलेल्या सर्व प्रवासी विमानांच्या लँडिंगवर … Read more

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या रेल्वे तिकिटांवरील सवलती बंद केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत मोठा निर्णय घेत सर्व कॅटेगरीतील रेल्वे तिकिटांवरील सवलती पूर्णपणे बंद केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना मिळणारी सवलत, दिव्यांगजनांच्या ४ श्रेणी आणि ११ प्रकारच्या रूग्णांना मिळणाऱ्या रेल्वे तिकिटावरील सवलती कायम … Read more

करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी कोल्हापूर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमून दिलेली जबाबदारी सर्व विभाग प्रमुखांनी सक्षमपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज सभागृहात विविध विभाग प्रमुखांची जिल्हाधिकारी देसाई यांनी बैठक घेवून नेमून दिलेल्या जबाबदारीच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. याबैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. … Read more

कोल्हापूरात रेल्वेचे तिकीट आरक्षण ५० टक्क्यांनी घटले; रेल्वे प्लॅटफॉर्मवर शुकशुकाट

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिक प्रवास करणे टाळत आहेत. त्याचा फटका कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला (रेल्वे स्थानक) बसला आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये तिकीट आरक्षण ५० टक्क्यांनी कमी झाले असून, प्रवाशांची संख्या १५ टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे स्थानक परिसरात शुकशुकाट पसरला आहे. दक्षता म्हणून विविध रेल्वेच्या डब्यांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण रोज … Read more

धसका करोनाचा! कोल्हापूरात केवळ शिंकल्यामुळं एकाला बेदम मारहाण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर एकीकडे जीवघेण्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनापासून ते नागरिकांपर्यंत सर्वांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे करोनाची दहशत लोकांमध्ये पसरली असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, कोल्हापूरात करोनाच्या धसक्यातून एका व्यक्तीला भर रस्त्यात बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. काल शहरातील गुजरी गल्लीत बाईक वरुन जाणाऱ्या दोघांमध्ये केवळ अंगावर शिंकल्याच्या कारणावरुन वाद झाला. … Read more

परभणी रेल्वे स्थानकावर करोना विशेष कक्षाचे उद्घाटन

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मुंबई आणि पुणे येथे करोनाची मोठ्या प्रमाणात संसर्ग होत असल्याने मूळचे परभणीचे असलेले नागरिक, आता परत येऊ लागले आहेत. या नागरिकांनी घाबरून न जाता संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य कारण्याचे आवाहन परभणीचे जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी केले आहे. परभणी रेल्वे स्थानकावर यासाठी विशेष कक्षाचे उद्घाटन करण्यात आले असून, यावेळी जिल्हाधिकारी बोलत … Read more

१३० वर्षात प्रथमच मुंबईच्या डब्बेवाल्यांनी १० दिवस सेवा ठेवली बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ४९ वर पोहचली आहे. करोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र आता ही संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला घरातच थांबण्याचं आवाहन केलं आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळू लागला आहे. दरम्यान, … Read more