Tuesday, February 7, 2023

गो कोरोना : नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण- १२ मुद्द्यांमध्ये

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी बाजार, दुकाने, हॉटेल्स बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती असून नागरीक जीवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाता नागरीकांना महत्वाचे आवाहन केले आहे.

१) २२ मार्चला सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचं आवाहन

- Advertisement -

२) सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे.

३)नागरिकांनी सरकारच्या निर्देशांचं पालन करावं. 

४) अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना अभिवादन करू… रविवारी सायंकाळी ५.०० वाजता टाळ्या, थळ्या, घंटा वाजवून कृतज्ञता व्यक्त करू.

५) जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा थांबणार नाही. त्यामुळे नागरिकांनी वस्तूंची खरेदी अगोदर प्रमाणे सामान्य करावी. वस्तूंचा साठा करण्याची गरज नाही.

६) आपल्या आजुबाजुला असणाऱ्या वरिष्ठ नागरिकांनी येणारे काही आठवडे घराबाहेर पडू नये.

७) अर्थमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कोविड १९ टास्क फोर्स’ नेमणार. 

८) नागरिकांनी घरातून बाहेर पडणं टाळा. ऑफिसची कामं घरातूनच करण्याचा प्रयत्न करा.

९) नागरिकांनी शक्य झाल्यास महत्वाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्यात.

१०) वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात जाणे टाळा. छोट्या छोट्या समस्यांसाठी फोनवरच फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्या.

११) व्यापाऱ्यांनी, व्यावसायिकांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचीही काळजी घ्यावी अशी विनंती.

१२)वैश्विक संकटाच्या वेळी मानवता विजयी होवो, भारत विजयी होवो!

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.