कोरोना महाराष्ट्रात दाखल? नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिल आहे. या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली असून त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटलं … Read more

भाजपा आमदाराने कोरोनावर शोधला रामबाण उपाय; गोमूत्र, शेणाने करता येतो इलाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूवर उपचार शोधण्यासाठी जगभर युद्धपातळीवर संशोधन सुरु असताना आसाममधील एका भाजपच्या आमदाराने कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी रामबाण इलाज शोधून काढला आहे. तो म्हणजे, गाईचे गोमूत्र आणि शेणानं कर्करोगच नाही तर कोरोनासारखे घातक रोग बरे होऊ शकतात असा दावा या आमदाराने केला आहे. आसाममधील आमदार सुमन हरिप्रिया यांनी आसामच्या विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या … Read more

कराटे किंग ‘जॅकी चॅन’ला कोरोनाचा संसर्ग? तडकाफडकी रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे चीनमध्ये अक्षरश: थैमान घातल आहे. कोरणामुळं चीनमध्ये आतापर्यंत २ हजार हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतासह हा वायरस जवळपास ५० देशांमध्ये कोरोनाचे लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. भारतात या व्हायरसने दिल्लीतही दार ठोठावले आहे. दिल्लीतील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे. तर तेलंगणामध्ये कोरोना व्हायरसच्या … Read more

दीपिकाने घेतला कोरोना व्हायरसचा धसका; ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये जाणं टाळलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री दीपिका पादुकोणने जागतिक कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये जाण्याची आपली योजना रद्द केली आहे. पॅरिस फॅशन वीक ३ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, लक्झरी ‘फॅशन हाऊस लूई वीटॉन’ ने दीपिकाला पॅरिस फॅशन वीकमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवले होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळं दीपिकाने … Read more

कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करणार्‍या रुग्णालयाचे अध्यक्ष कोरोनाव्हायरसमुळे मरण पावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करण्यात गुंतलेले चीनच्या हुबेई प्रांतस्थित वुहान वुचांग हॉस्पिटलचे अध्यक्ष लियू झिमिंग यांचा नोवेल कोरोनाव्हायरस न्यूमोनियामुळे मंगळवारी काळी मृत्यू झाला आहे. ‘द स्टार’ने चायना सेंट्रल टेलिव्हिजनच्या वृत्ताचा हवाला देताना म्हटले आहे की शहरातील वूचांग जिल्ह्यातील यांगयुआन स्ट्रीटवरील रुग्णालय हे अत्याधुनिक रुग्णालय आहे आणि वुहानमधील कोरोनाव्हायरस रूग्णांवर उपचार करण्यासाठी नियोजित सात … Read more

‘या’ प्राण्याचे मांस खाल्ल्यामुळे पसरला कोरोना व्हायरस ; घ्या जाणून कोणता आहे हा प्राणी

मागील काही दिवसांपासून चीनसह संपूर्ण देशात कोरोना व्हायरसने सळोकी पळो करून सोडले आहे. या आजाराबद्दल नागरिकांमध्ये अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत.

‘कोरोना’ व्हायरसने फास आवळला,चीनमधील मृत्यूंची संख्या १ हजार पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मागील महिनाभरापासून जगात दहशत माजवलेल्या कोरोना विषाणूने सर्वांनाच हादरवून सोडलं असून कोरोनो व्हायरसमुळे चीनमधील मृतांचा आकडा १० तारखेपर्यंत एक हजारांच्या वर गेला आहे. चीनमध्ये ठराविक काळाच्या अंतरात एखाद्या आजाराने लोकांचा बळी जाण्याचा हा दुर्दैवी विक्रम असून यामुळेच चीनमधील आरोग्यव्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. विमानतळावर या आजाराची लागण होऊ नये म्हणून … Read more

अभिमानस्पद! भारतीय शास्त्रज्ञाने शोधला ‘कोरोना’ विषाणूवरील जालीम उपाय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळ चीनमध्ये आतापर्यंत करोनाने ६१८ जणांचे बळी घेतले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ अथक परिश्रम घेत आहेत. दरम्यान, शास्त्रज्ञांच्या मेहनतीला यश मिळाल्याची सुखद वार्ता ऑस्ट्रेलियामधून मिळत आहे. करोना विषाणूवर लस बनवण्याच्या अगदी जवळ गेल्याचा एका शास्त्रज्ञाने दावा केला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियातील … Read more

‘करोना’ व्हायरसचा भारतातील स्मार्टफोन आयातीवर परिणाम

जगातील अग्रणी स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर निर्मितीचे उद्योग चीनमध्ये आहेत. भारतात स्मार्टफोन आणि कॉम्प्युटरची आयात मोठ्या प्रमाणावर होते. ही आयात विशेषतः चीनमधून होत असते. मात्र, चीनमध्ये ‘करोना व्हायरस’मुळे आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असून येथील औद्योगिक उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. यामुळे नजिकच्या काळात चीनमधून भारतात आयात होणाऱ्या मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या आयातीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माघी यात्रेसाठी पंढरपूरात लाखो भाविक दाखल; कोरोना व्हायरस उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन

सोलापूर प्रतिनिधी । पंढरपूरात माघी यात्रेसाठी लाखो भाविक दाखल होऊ लागले आहेत. अशातच कोरोना व्हायरसचे सावट निर्माण झाले आहे. वारी काळात कोरोना व्हायरस पसरू नये. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात दहा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रूग्णासाठी मोफत तपासणी आणि औषधोपचार ही केले जाणार आहेत. यामध्ये स्वतंत्र वैद्यकीय अधिकार्यासह पाच … Read more