जर दिल्लीत भाजप सत्तेत आली तर शाहीन बाग एका तासात रिकामा करू- भाजप खासदार

काल दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या एका प्रचारसभेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. शाहीन बागमध्ये जमलेल्या जमावाला देशद्रोही ठरवत, अशा देशद्रोह्यांना गोळी मारायला पाहिजे, असे वक्तव्य ठाकूर यांनी केले होते. त्यामुळं दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयन्त केला जात आहे. या वक्तव्याचे समर्थन करताना CAA आणि NRCच्या विरोधात शाहीन बागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाला एका भाजप खासदाराने लक्ष केलं आहे. शाहीन बागमधील परिस्थितीची तुलना काश्मीरशीसोबत करून दिल्लीच्या मतदारांना भाजपाला मतदान करण्याचे आवाहन खासदार परवेश वर्माने केलं आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या आपल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दिल्ली निवडणुकीत रंगला आर्ट विरुद्ध आर्टिस्टचा सोशल ट्रेण्ड; भाजपवर उलटला डाव

दिल्ली विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना आर्ट विरुद्ध आर्टिस्ट (Art vs Artist) या भाजपच्या आयटी सेलने सुरु केलेल्या मोहिमेचा फज्जा उडताना दिसत आहे. प्रत्यक्ष परिस्थिती आणि मोदींनी केलेलं काम यावर सोशल मीडियाचा आधार घेऊन भाजपने अरविंद केजरीवाल यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला. मात्र ही शक्कल भाजपच्या विरुद्ध जाणार असं एकूण सोशल मीडिया ट्रेन्डसवरुन दिसून येत आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केजरीवाल यांना तब्बल ६ तास रांगेत उभं राहावं लागलं

आम आदमी पक्षाचा उमेदवार म्हणून आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना केजरीवाल यांना तब्बल ६ तास आपला अर्ज दखल करण्यासाठी लागले. मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यानुसार अरविंद केजरीवाल रिटर्निंग अधिकाऱ्याच्या कार्यालयात आज मंगळवारी १२ वाजता पोहोचले यावेळी त्याचे आई-वडील आणि पत्नी सोबत होत्या.

दिल्ली निवडणुकीत भीम आर्मीच्या चंद्रशेखरची दमदार एन्ट्री, काही अटी घालून न्यायालयाने निर्बंध उठवले

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा देणाऱ्या भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर यांचा दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तीस हजारी कोर्टाने चंद्रशेखर यांच्यावरील निर्बंध उठवले असून निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणं हा भारतीय नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा खुलासा न्यायालयाने दिला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या ७ उमेदवारांची यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने एकूण ७ उमेदवारांना उमेदवारी देत विधानसभा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी दिलेल्यांमध्ये आम आदमी पक्षाचा राजीनामा दिलेले कमांडो सुरेंद्र सिंह यांच्या समावेश आहे. दिल्ली केंट विधानसभा जागेसाठी राष्ट्रवादीने कमांडो सुरेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे

दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर असून येत्या ८ फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे तर ११ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकाच टप्प्यात होणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता आहे.