फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य अडीच वर्षांपासून ऐकतोय; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यातील नेत्यांमध्ये जोरात टोलेबाजी सुरु आहे. अनेक कारणांवरून एकमेकांवर निशाणाही साधला जातोय. आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. ” भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यांचे ‘मी पुन्हा येईन’ … Read more

आपत्तीकाळातील मदतीच्या घोषणा नुसत्या हवेतीलच; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठवाडा येथे अतिवृष्टीचे संकट आले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांप्रमाणे भाजप नेतेही जाणार आहेत. तत्पूर्वी आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानीची मदत, घोषणांवरून राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “यापूर्वीही राज्यात ज्या ज्या वेळी आपत्ती आली तेव्हा राज्य सरकारकडून ज्या घोषणा दिल्या … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुसती पोकळ आश्वासने नको, तातडीने मदत करा – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात मराठवाड्याचे नुकसान झालेले आहे. या ठिकाणी आताच राज्य सरकारने कोणत्याही स्वरूपाचे निकष न लावता सरसकट मदत करावी अशी मागणी होत आहे. येथील नुकसानीवरून आता भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाना साधला जात आहे. दरम्यान, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नुकसानीवरून ट्विटद्वारे आवाहन केले आहे. “केवळ पोकळ आश्वासने … Read more

सोमय्यांनी चिथावणीखोर विधाने करू नये; गृह राज्यमंत्री सतेज पाटलांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काही दिवसांपूर्वी घोटाळ्यांचे दोन आरोप केले आहेत. त्याबाबतची तक्रार कागल तालुक्यातील मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आज कोल्हापूरात दाखल झाले आहेत. यावरून गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमय्यांना इशारा दिला असून सोमय्यांनी कायदा व्यवस्था सुस्थितीत राहावी म्हणून चिथावणीखोर विधाने करू नये, असा … Read more

फडणवीसांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र पाठवून केली ‘हि’ तातडीची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक महत्वाचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. एसटी महामंडळात ९० हजार पेक्षा जास्त एसटी कर्मचारी अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात आहेत. याप्रकरणी लवकर निर्णय … Read more

ओ….लंके! 2 पावले माघार नाही तर 200 पाऊले पुढे जात ठोकणारे..लक्षात ठेवा – चित्रा वाघ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके आणि तहसिलदार ज्योती देवरे यांच्यातील वाद चांगलाच चर्चेत आहे. अहमदनगरमधील पारनेरच्या महिला तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. याबाबत त्यांची एक सुसाईट ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर … Read more

जामीन मिळाल्यानंतर राणेंना फडणवीसांचा फोन; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबदल अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाड न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायदंडाधिकाऱ्यांनी 4 अटींसह मंत्री राणेंना जामीन मंजूर केला. त्यानंतर भाजप नेते तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राणेंशी फोनवरुन संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय … Read more

राणेंना अटक, हीच तुमची शिवशाही आहे का?; चित्रा वाघ संतापल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करण्यात आल्याने भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षातील वाद आता विकोपाला पोहचला आहे. या दरम्यान, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मंत्री राणेंवरील कारवाईबाबत संताप व्यक्त केला आहे. “नारायण राणे यांच्या अटेकसाठी तत्परता दाखवणं आणि इतर प्रकरणी तत्परता न दाखवणं हीच तुमची शिवशाही आहे का? असा … Read more

“ना डरेंगे, ना दबेंगे”; केंद्रीय मंत्री राणेंच्या अटकेनंतर फडणवीसांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत मंत्री राणेंवर अटक करण्याचे आदेश पोलिसांनी काढले. त्यानुसार राणेंनी कोर्टाने जामीन मागितला असता कोर्टानेही जामीन फेटाळल्यानंतर राणेंना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली. याबाबत भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले असून “ना … Read more

भाजप केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या पाठीशी – देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याबाबत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत मत व्यक्त केले. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही पण मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी भाजप … Read more