फडणवीसांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य अडीच वर्षांपासून ऐकतोय; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजप यांच्यातील नेत्यांमध्ये जोरात टोलेबाजी सुरु आहे. अनेक कारणांवरून एकमेकांवर निशाणाही साधला जातोय. आज भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. ” भाजपचे नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे यांचे ‘मी पुन्हा येईन’ हे वाक्य गेल्या अडीच वर्षांपासून ऐकतो आहोत,” असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज शिर्डी येथे श्रीरामपूर व रहाता विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली यावेळी ते म्हणाले की, “सोमय्या कायम विरोधात बोल्ट असतात. विरोधात बोलणे त्यांचे काम आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणे गरजेचे नाही.

भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यावेळी पाटील यांनी टोला लगावला. ते म्हणाले की, अनेकवेळा ऐकत आलोय कि मी पुन्हा ऐन, मी पुन्हा पुन्हा. हे देवेंद्र फडणवीस कायम म्हणत आले आहेत. मात्र, ते कधी येणार हे  माध्यमनीच सांगावे,” असा टोला मंत्री पाटील यांनी लगावला.