एकनाथ खडसेंनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हिंगोली । भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. तत्पूर्वी बुधवारी एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचे भाजपमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया … Read more

मुख्यमंत्र्यांनी राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांना तातडीने सरसकट मदत द्यावी :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रेड कार्पेटवर उभारून पाहणी दौरा करत आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चिखलात जाऊन थेट शेतकऱ्यांची संवाद साधत आहोत. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावं मात्र शेतकऱ्यांच्या साठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, असा टोला विधान परिषदेचे विरोधी … Read more

अतिवृष्टीग्रस्त भागात बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश द्या; फडणवीसांची सरकारकडे मागणी

हिंगोली । ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत. यानंतरही कर्जवसुली करणाऱ्या बँकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मागणी यांनी राज्य सरकारकडे केली आहे. देवेंद्र फडणवीस आज हिंगोलीतील अतिवृष्टीग्रस्त … Read more

‘बोलघेवडेपणा सोडा! अन कृतीवर भर द्या!’ फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

Devendra Fadanvis

हिंगोली । राज्य सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस बुधवारी हिंगोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी … Read more

राज्याने केंद्राकडे कर्ज मागितल्यास फडणवीसांनी ते मंजूर करून घ्यावं; प्रकाश आंबेडकरांचा सल्ला

सोलापूर । राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जर केंद्राकडे कर्जाची मागणी केली असेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे कर्ज मंजूर करून घेतले पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज सोलापूर येथील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून निधी आणण्यासंदर्भात संभाजीराजेंची फडणवीसांना विनंती, म्हणाले..

बीड । मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओल्या दुष्काळाची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक मात्र जबाबदारी केंद्राची की राज्याची यावर वाद घालत आहेत. या पार्श्वभुमीवर भाजप खासदार संभाजीराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारकडून राज्यासाठी निधी आणण्यासंदर्भात विनंती केलीय. राज्याची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी केंद्राचीदेखील आहे असं भोसले यांनी म्हटलं आहे. बीड … Read more

‘सरकारनं ठरवलं तर सारं काही शक्य, पण दुर्दैवानं मी मुख्यमंत्री पदावर राहिलो नाही’- देवेंद्र फडणवीस

उस्मानाबाद । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला. मात्र, त्यांच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळाला का? अशी विचारणा करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. ‘सरकारनं ठरवलं आणि इच्छाशक्ती असेल तर सगळं शक्य आहे. पण दुर्दैवानं मी पदावर राहिलो नाही’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. गेल्या वर्षीच्या … Read more

‘नाकर्त्या सरकारचा बचाव करणं एवढचं पवारांचं काम आहे’, फडणवीसांनी घेतला पुन्हा पंगा

बारामती । कोरोनाच्या काळात घरातच राहून कामकाज करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. ‘अनेक बाबतीत राज्य सरकारचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. त्याविरोधात लोकांमध्ये असंतोष आहे. त्यामुळं शरद पवारांना सरकारचा बचाव करावा लागतो. तेवढं एकच काम आता त्यांच्याकडं आहे,’ असा टोला देवेंद्र फडणवीस … Read more

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार अतिवृष्टी भागांचा दौरा

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ात परतीच्या पावसामुळे पिकांचं खूप मोठय़ा प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.  शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या … Read more

फडणवीसांची ड्रीम योजना चौकशीच्या फेऱ्यात; जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत चौकशी

मुंबई । जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही भाजपाच्या यशस्वी योजनांमधली एक समजली जात होती. पण आता तीच योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही ड्रीम योजना होती. मात्र या योजनेवर कॅगने ताशेरे ओढले होते. त्या अनुषंगानेच ही चौकशी … Read more