‘शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्या!’ मोदींसमोर ‘आप’ खासदारांची जोरदार घोषणाबाजी; घेराव घालण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. मोदी सरकारचे कृषी कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीच्या समर्थनात आज आम आदमी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘शेतकरीविरोधी काळा कायदा मागे घ्या’ अशी घोषणाबाजी करत … Read more

उपमुख्यमंत्र्यांचा विरोध! शेतकऱ्यांनी चक्क हेलिपॅडचं काढलं खोदून

जिंद । केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज २८ वा दिवस आहे. या आंदोलनाला मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादामुळे सरकार आणि भाजप हैराण झालं आहे. असं असलं तरी कृषी कायदे मागे घेतले जाणार नाहीत, या निर्णयावर सरकार अद्याप ठाम आहे. तर दुसरीकडे, कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी … Read more

अण्णा प्लिज! शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करू नका!; गिरीष महाजनांची राळेगणसिद्धीत जाऊन विनंती

अहमदनगर । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन त्यांच्या भेटीसाठी राळेगणसिद्धीत पोहोचले. आंदोलन करू नये, अशी विनंती महाजन यांनी अण्णांना केली आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचदरम्यान शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज भाजप … Read more

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर थेट हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांच्याविरोधात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर निषेध व्यक्त करण्यासाठी त्याचा ताफा रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या १३ शेतकऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा आणि दंगलीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हरियाणाच्या अंबालामध्ये मंगळवारी शेतकऱ्यांच्या एका गटानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले होते. आगामी पालिका निवडणुकांसाठी पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ सभांना संबोधित करण्यासाठी मुख्यमंत्री खट्टर अंबालामध्ये … Read more

‘राजा इतना भी फकीर मत चुनो की’… सिद्धूंचा मोदींवर पुन्हा त्याचं वाक्याने निशाणा

नवी दिल्ली । दिल्लीत सुरु सलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारवर टीका सुरूच आहे. राजा इतकाही संत (फकीर) निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल, अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) अप्रत्यक्ष निशाणा साधला. विशेष म्हणजे 2019 मध्येही आचार्य चाणक्यांच्या याच … Read more

फट..फजिती! भाजपच्या कृषी कायद्याच्या जाहिरातीचा ‘पोस्टर बॉय’ शेतकरी आंदोलनात सहभागी

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात भाजपच्या जाहिरातीतील शेतकरीही आहे. यामुळे भाजपवर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws ) दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन ( farmers protest ) सुरू आहे. या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी हरप्रीतसिंग हेही सहभागी झाले आहेत. … Read more

अंबानींच्या ऑफिसवर मोर्चा काढण्यापूर्वीच बच्चू कडूंना नागपुरातचं रोखलं; वरिष्ठांच्या आदेशावरून कारवाई?

नागपूर | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज मुंबईत मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. पण बच्चू कडू यांना पोलिसांनी नागपुरातच रोखून धरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे बच्चू कडू यांना वरिष्ठांच्या आदेशानुसारच अडवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र हा आदेश देणारे वरिष्ठ कोण? असा प्रश्न आता उपस्थित … Read more

‘माझ्या मृत्युस मोदी आणि शहांना जबाबदार धरावं’, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची प्रतिक्रिया

नवी दिल्ली । दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवासांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनातील एका शेतकऱ्याने आज आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचे लक्ष येताच त्या शेतकऱ्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामुळे त्याचे प्राण वाचले. पण आपल्या आत्महत्येच्या प्रयत्नाला पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा कारणीभूत असल्याचा आरोप त्याने केला. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील ६५ … Read more

भाजपने घेतला अण्णांचा धसका? दिल्लीत आंदोलन करण्याचं जाहीर करताचं हरिभाऊ बागडे राळेगणसिद्धीत

राळेगणसिद्धी । केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भाजपमध्ये एकचं खळबळ उडाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी राळेगणसिद्धीत जाऊन आण्णांशी चर्चा केली. अण्णांच्या आंदोलनाची धास्ती घेतल्यानेच या गाठीभेटी सुरू केल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. (bjp leader haribhau bagade … Read more

“शेतकरी चळवळीमुळे पंजाब, हरयाणा आणि हिमाचलला होत आहे दररोज 3500 कोटींचे नुकसान”- असोचॅम

नवी दिल्ली । इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असोसिएशने केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना शेतकरी निषेध लवकरच सोडवावा असे आवाहन केले आहे. या चळवळीमुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आर्थिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 3500 कोटींचे नुकसान होत आहे. असोचॅमच्या म्हणण्यानुसार या तीन राज्यांतील अनेक उद्योग शेतीवर … Read more