हॅलो महाराष्ट्राचा इम्पॅक्ट ! विद्यापीठाने ‘ते’ बोर्ड केले अपडेट

bamu

औरंगाबाद – शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रवेश करतानाच त्या ठिकाणी विद्यापीठातील अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्यांच्या नावांचे बोर्ड त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते. परंतु त्यातील बहुतांश सदस्य हे आपल्या कार्यातून सेवामुक्त झालेले आहेत. तसेच सध्या या समितीत असलेल्या सदस्यांपैकी एकाही सदस्याचे नाव त्या पाठीवर नसल्याचे दिसून आले. यामुळे विद्यार्थ्यांनी काही तक्रार असल्यास … Read more

औरंगाबादेत सलग 75 तास पोहण्याचा उपक्रम ! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता

swimming

औरंगाबाद – महानगरपालिकेतर्फे भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत सलग 75 तास पोहण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात उद्या 30 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थ जलतरण तलाव येथे महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते सकाळी 9.00 वाजता या उपक्रमाचे उदघाटन होईल. … Read more

खळबळजनक ! जीवे मारण्याचा धाक दाखवून लुटले

Robbary

औरंगाबाद – घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून न उघडल्यामुळे तिघांनी वृध्द दाम्पत्यासह त्याच्या मुलाला बांधून ठेवत लुटमार केली. ही खळबळजनक घटना बुधवारी पहाटे साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान बीड बायपास रस्त्यावरील न्यू गणेशनगरात घडली. यावेळी लुटारुंनी सोन्याचे दागिने, मोबाइल आणि इन्व्हर्टर हिसकावून नेले. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको … Read more

सलग तिसऱ्या वर्षी भरले जायकवाडी धरण; 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

jayakwadi

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 95 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण … Read more

शेतकरी उद्धवस्त, औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा; जलील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

औरंगाबाद – जिल्ह्यात पावसाने अक्षरश: दाणादाण उडवली आहे. गेल्या आठवडाभर पावसाने होत्याचं नव्हतं केलंय. काढणीला आलेली पीकं डोळ्यादेखत वाहून गेलीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याचं हजारो-लाखो रुपयांचं नुकसान झालंय. त्यामुळे उद्धवस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची गरज असल्याचं सांगत औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मनपाच्या आरोग्य केंद्रात चमत्कार ! लस न घेताच लसीकरणाचे प्रमाणपत्र

corona vaccine

औरंगाबाद – रस न घेता लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोविन ॲप हॅक करण्याचे प्रकार शहरात सुरूच आहेत. मंगळवारी मनपाच्या बायजीपुरा आरोग्य केंद्रावर तीन जणांनी लस न घेता प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी हा प्रकार लक्षात घेत तातडीने एका व्यक्तीचे रजिस्ट्रेशन रद्द केले. दोन जणांना प्रमाणपत्र मोबाईल वर गेले. त्यातील एका … Read more

आज ‘या’ वेळेत उघडणार जायकवाडीचे दरवाजे; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

jayakwadi damn

औरंगाबाद – परतीचा पाऊस संकट म्हणून येईल, असं मराठवाड्याला वाटलं नव्हतं. पण गेल्या सात दिवसांत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातलाय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. तुफान पावसाने लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. धरणांतल्या पाणी पातळीतही वाढ झालीय. मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी धरण 92 टक्के भरलं आहे. आणखीही आवक सुरुच आहे. जर पाण्याची … Read more

सावधान ! जायकवाडीतून कुठल्याही क्षणी होऊ शकतो पाण्याचा विसर्ग

jayakwadi damn

औरंगाबाद – मराठवाड्याची तहान भागवणारे पैठण येथील जायकवाडी धरण सध्या 85 टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रातून येव्यामध्ये वाढ झाल्यानंतर कुठल्याही क्षणी गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर व हवामान विभागाच्या पुढील आठवड्यात अतिवृष्टीचा इशारा या अनुषंगाने सद्यस्थितीत पूरनियंत्रण यंत्रणा अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. दरम्यान, या वर्षीची रेकॉर्डब्रेक 82 हजार … Read more

कुख्यात गुंड ‘टिप्याने’ केले आत्मसमर्पण

tipya

औरंगाबाद – पोलिस अधिकाऱ्याचा अंगावर जीप घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणारा, कारागृह पोलिसाला धमकावून खंडणी उकळणारा कुख्यात गुन्हेगार टीप्या उर्फ शेख जावेद शेख मकसूद मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर झाला. त्याने नाट्यमयरीतीने केलेल्या शरणागती मागे पोलिसांकडून ‘टिपले’ जाण्याची भीती असल्याचे बोलले जात आहे. दोन पोलिसांना खेळणाऱ्या टीप्याला तातडीने बेड्या घाला असा आदेश पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेत … Read more

नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यात पावासाचा जोर कायम असून नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.तसेच आवश्यक साधन सामुग्री, पशुधन सुरक्षित स्थळी स्थलातंरीत करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी पेक्षा 150 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले … Read more