Budget2020Live: मध्यमवर्गाला मोठा दिलासा, सरकारने टॅक्समध्ये केला बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने कर स्लॅबबाबत मोठी घोषणा केली आहे. करदात्यांना दिलासा देताना अर्थमंत्री म्हणाले की, आता 5 ते 7.5 लाख रुपये उत्पन्न मिळविण्याकरिता 10 टक्के कर भरावा लागेल. 7.5 ते 10 लाख रुपये मिळविण्याकरिता तुम्हाला 15 टक्के कर भरावा लागेल. 10 ते 12.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्यासाठी 20 टक्के कर भरावा लागेल. … Read more

सरकारने मनमानीपणे कर लादणं हा सुद्धा सामाजिक अन्याय- सरन्यायाधीश बोबडे

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी वसुलीसंबंधी महत्वपूर्ण विधान केलं आहे. देशातील नागरिकांवर करांचा बोझा लादण्यात येऊ नये, असं सांगतानाच करचोरी हा जसा आर्थिक गुन्हा आणि सामाजिक अन्याय ठरतो, तसाच सरकारनं जनतेवर मनमानी कर लादणं हा सुद्धा एकप्रकारचा सामाजिक अन्यायच आहे, असं मत सरन्यायाधीश बोबडे यांनी व्यक्त केलं आहे. इन्कम टॅक्स अपीलेट ट्रायब्युनलच्या ७९ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आयकर नियमात नवीन बदल; ‘या’ २ गोष्टींची माहिती न दिल्यास कंपनी तुमचा पगार कापणार

तुम्ही जर आपल्या आधार आणि पॅनचा तपशील आपल्या कंपनीला दिला नसेल तर सावधान! नवीन आयकर नियमानुसार तुमच्या पगारात कपात केली जाऊ शकते. प्राप्तिकर विभागाच्या (कर विभाग) नियमानुसार जर एखादा कर्मचारी आपल्या कंपनीला पॅन आणि आधार क्रमांक देत नसेल तर 20% टीडीएस (कर वजावट स्त्रोत) त्याच्या पगारामधून वजा केला जाईल. आधीच लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न कमवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे.

३०० रुपये रोजंदारी कामविणाऱ्याला आयकर विभागाने बजावली १ कोटीची टॅक्स नोटीस

मुंबई उपनगर ठाण्यातील अंबिवली येथील झोपडपट्टी राहणारे बाबूसाहेब अहीर ३०० रुपये रोजंदारी कमावतात. मात्र, आयकर विभागाने अहिर यांना पाठविलेली नोटीस पाहून अहिरच नाही तर कोणालाही धक्का बसेल. आयकर विभागाने मजुरी करणाऱ्या १.०५ कोटी रुपयांची आयकर भरण्याची नोटीस पाठविली आहे. नोटाबंदीच्या वेळी अहिरच्या बँक खात्यात ५८ लाख रुपये जमा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लातूरमध्ये खाजगी क्लासेसवर आयकर विभागाची धाड

लातूर प्रतिनिधी। आयकर विभागाच्या वतीने आज लातूर मध्ये खासगी ट्युशन क्लासेस परिसरामध्ये धाडी टाकण्यात आल्या. क्लासेस परिसरातील मोठ्या क्लासेस वरती एकाच वेळी अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या टाकण्यात आलेल्या धाडीत आयकर विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या दिमतीला पोलिसांचा मोठा फौजफाटा दिसत आहे. यामुळे खाजगी क्लासेसने आपल्या नियमित वर्गांना आज सुट्टी … Read more