निवडणूक : कराड- पाटण शिक्षक सोसायटीसाठी 21 जागांसाठी तब्बल 289 अर्ज दाखल

Karad-Patan Teachers Society

कराड | कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत 21 जागांसाठी तब्बल 289 अर्ज दाखल झाले आहेत. आज अर्ज छाननी होणार असून 1 डिसेंबर पर्यंत अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे. त्यामुळे 2 डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांनी दिली आहे. कराड- … Read more

मराठा समाजातील तरूणांना मालक करण्याचे अण्णासाहेब पाटील महामंडाळचे काम : नरेंद्र पाटील

Narendra Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठी समाजातील तळागाळातील घटकापर्यंत व्यावसायिकता उभी राहिली पाहिजे. केवळ नोकरी नव्हे तर मराठी मुलांनी व्यावसायिक, मालक झाले पाहिजे. यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, त्यासाठी प्रत्येक मराठा समाजातील तरूणांला मदत केली जाईल. मराठा समाजातील तरूणांना बळ देण्याचे काम अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळ काम करत असल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे … Read more

कराडला ऊसदर संघर्ष समितीची 6 किलोमीटर पायी दिंडी यात्रा

Karad Usdar Sangharsh Samiti

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उसाला 3 हजार 500 रुपये भाव मिळाला पाहिजे, यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकरी संघटना एकवटल्या आहेत. सोमवारी कराडात ऊसदर संघर्ष समितीच्या वतीने कोपर्डे ते कराड 6 किलोमीटर पायी दिंडी काढण्यात आली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून साखर कारखानदारांना सुबुद्धी द्यावी असे साकडे घालण्यात आले. सोमवारी सकाळी कोपर्डै हवेली (ता. … Read more

भाजपाचा “रात्रीस खेळ सुरू” : कराडला काॅंग्रेस, राष्ट्रवादीतच अंतर्गत कुरघोड्या सुरू

Karad Politics BJP & NCP, Congress

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील कराड उत्तर व कराड दक्षिण मतदार संघात सध्या काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीची झुंज लावून भाजपाची व्यूहरचना सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाचा बालेकिल्ला सातारा जिल्हा बनविण्यासाठी कराड तालुका महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. त्यामुळे राज्य पातळीवरून वेगवेगळ्या पध्दतीने या दोन मतदार संघात व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. सातारा जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने … Read more

कराड कृषी प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांना निमंत्रण : पालकमंत्री अध्यक्षस्थानी राहणार

Karad Agriculture Exhibition

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कराड येथे 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेले राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे निमंत्रण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देण्यात आले. सहकार विभागाचे जिल्हा निबंधक मनोहर माळी, उपनिबंधक तथा बाजार समितीचे प्रशासक संदीप जाधव … Read more

कराड दक्षिणमध्ये 2024 ला “एकच बाबा, अतुल बाबा” : चंद्रशेखर बावनकुळे

Karad South Atul Bhosale

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिणमध्ये 2024 ला अतुल बाबा आमदार होणार असल्याचे जिल्हाध्यक्षांनी जाहीर केले आहे. आता जिल्हाध्यक्षांनी आपली भावना मांडली ती गोष्ट खरी आहे. आपला विधानसभेचा नेता कसा असावा तर आपल्या समाजाचे प्रश्न सरकारमध्ये मांडणारा असावा. तर तो कसा असावा तर डाॅ. अतुल भोसले यांच्या सारखा असावा. तेव्हा आता एकच बाबा राहील … Read more

अतिक्रमण हटविलेल्या परिसरात प्रतापगड पायथ्याशी शिवस्मारक उभारावे : विक्रम पावसकर

Afzal Khan Tomb

कराड | शिवप्रताप दिनी छ. शिवाजी महाराजांनी अफझल खान यांचा कोथळा बाहेर काढला होता. त्याचदिवशी हिंदुत्ववादी सरकारने थडगे परिसरातील अतिक्रमण काढले आहे. आता या परिसरात भव्य असे शिवस्मारक उभे करण्यात यावे अशी मागणी भाजप नेते व हिंदू एकता आंदोलनचे विक्रम पावसकर यांनी केली आहे. गुरूवारी सातारा जिल्हा प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवत गोपनीय पध्दतीने प्रतापगड पायथ्याशी … Read more

शोभा पवार पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वर्षाताई पाटील उपाध्यक्षपदी शीलादेवी पाटणकर; निवडी बिनविरोध

Election Shobha Pawar Credit Institution

कराड | तांबवे (ता. कराड) येथील (कै.) सौ. शोभा पवार कऱ्हाड-पाटण तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची आणि अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी वर्षाताई पाटील तर उपाध्यक्षपदी शीलादेवी पाटणकर यांची निवड झाली. (कै.) सौ. शोभा पवार कऱ्हाड-पाटण तालुका माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर सेवकांच्या सहकारी पतसंस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. संस्थेच्या नूतन संचालकपदी विकास किरतकर, धर्मेंद्र राऊत, शंकर … Read more

कराडात पतसंस्थेच्या ठेवीदार, सभासदांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांकडून तिघांना अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते नागरी पतसंस्थेने ठेवीदारांची ठेवीची मुदत संपलेली असतानाही गेली चार- पाच वर्षे पैसे ठेवीदारांना दिलेले नाहीत. त्यामुळे डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्या मोहिते हॉस्पिटल समोर आज सकाळी यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेविदारांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करणाऱ्या बबनराव पाटील (आटके), शंभूराज पाटील (काले), दीपक पावणे (कासार शिरंबे) … Read more

ऊसदर आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांची निर्दोष मुक्तता

Farmers' Acquittal Karad

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उसाला चांगला दर मिळावा, यासाठी 2013 मध्ये पाचवड फाटा येथे झालेल्या ऊसदर आंदोलनातील खटल्याचा निकाल आज लागला. यात शेतकरी नेत्यांसह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व शेतकऱ्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. बळिराजा शेतकरी संघटनेने न्यायालयाच्या निकालानंतर दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून फटाके वाजवून जल्लोष केला. बळिराजा शेतकरी संघटनेचे … Read more