किरपेत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद : वनविभागाने गुपचूप हलविला

कराड | तालुक्यातील किरपे येथे आज बुधवारी दि. 26 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात सापडला आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची माहिती न होता, वनविभागाने हा बिबट्या किरपे गावातून अन्य ठिकाणी नेला आहे. कराड तालुक्यातील येणके येथे बिबट्या दोन महिन्यांपूर्वी पिंजऱ्यात अडकला होता. त्यानंतर आज 26 जानेवारी रोजी दुसरा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. मात्र, किरपे, … Read more

जमिन वाटणीच्या वादातून दोन मावशीवर चाकू हल्ला

Murder

कराड | सैदापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत जागेच्या वाटणीवरून एकाने दोन्ही मावशीवर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. यबााबतची फिर्याद शालन वसंत कांबळे (वय 55, रा. बेघर वस्ती, सैदापूर ता. कराड) यांनी कराड शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शालन वसंत कांबळे, नंदा लक्ष्मण माने (रा. … Read more

जिल्हा हादरला : एकाच दिवसात 5 जणांची आत्महत्या

sucide

सातारा | जिल्ह्यातील विविध भागात एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या करणाऱ्यात वयाची चाळीशी पार केलेले एकाचाही समावेश नाही. त्यामुळे ऐन तारूण्यात टोकाचे पाऊल तरूण दिसत आहेत. समाजात अत्यंत चितेंचा विषय बनत असलेला दिसून येत आहे. जिल्ह्यातील विविध भागातील पाच जणांनी गळफास घेऊन जीवन संपवले आहे. एकाच दिवशी पाच जणांनी आत्महत्या केल्याने … Read more

प्रशांत पाटील याचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन

कराड | साकुर्डी येथील प्रशांत आनंदराव पाटील (वय- 33) यांचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शनिवारी दि. 22 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास पुणे येथे प्रशांत पाटील यांना हदयविकाराचा धक्का बसला. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र, डाॅक्टरांनी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. प्रशांत यांचा मृतदेह कराड तालुक्यातील साकुर्डी या मूळ गावी आज रविवारी … Read more

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील किरपे येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर गुरूवारी 20 जानेवारी रोजी बिबट्याने हल्ला केल्यावर त्याच्या वडिलांनी बिबट्याशी झुंज देत आपल्या मुलाला वाचविले. या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीरही दिला. आ. चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या … Read more

जातीयवादी विचारांना काँग्रेसने हद्दपार केले : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी उंडाळे- सवादे भागातील बरेचसे लोक कामानिमित्त मुंबईला असतात. गावाच्या विकासासाठी ते सर्वजण गावकऱ्यांच्या सोबत कायमच असतात. अश्या वेळी प्रत्येक निवडणुकीत या भागातील गावांनी काँग्रेस पक्षाचा विचार जपला आहे. स्व यशवंतराव मोहिते, स्व. विलासराव पाटील व त्यांच्यानंतर माझ्या पाठीशी येथील जनता ठामपणे उभी असल्याने राज्यात व देशात काम करण्याची संधी मिळाली … Read more

वडीलांना शेतात मदत करत होता 5 वर्षांचा मुलगा; अचानक झुडपातून बिबट्यानं झडप मारली अन्..

कराड | वडीलांना शेतातील कामात मदत करत असलेल्या एका पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. कराड तालुक्यातील किरपे या गावात सदर घटना घडली. गेल्या काही दिवसापूर्वी किरपे गावाशेजारील येणके येथे बिबट्याने पाच वर्षाच्या मुलावर हल्ला करून ठार केले होते. आता पुन्हा याच परिसरात बिबट्याने हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. … Read more

संकल्पपूर्ती : किल्ले वसंतगडावर बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण, लोकार्पण सोहळा उत्साहात

कराड | किल्ले वसंतगडावरील पश्चिम दरवाज्याच्या बाजूकडील बुरुजासह तटबंदीचा काही भाग अतिवृष्टीमुळे ढासळला होता. त्याची डागडुजी व पुनर्बांधणी करून संवर्धन करण्याचा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी केला होता. तो संकल्प पूर्णत्वास नेत बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण करून नुकताच त्याचा दुर्गार्पण सोहळाही उत्साहात संपन्न झाला. या दुर्गार्पण सोहळ्यासाठी गडावर जमलेल्या शेकडो दुर्गसेवकांनी छत्रपती शिवाजी … Read more

कामथी येथे किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण, दोघांवर गुन्हा

crime

कराड | कामथी ता. कराड येथे किरकोळ कारणावरून महिलेस दोघांनी मारहाण केली. शनिवारी 15 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद संगिता आनंदा पवार (वय 40) रा. कामथी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पूनम विनोद सूर्यवंशी व विनोद मारूती सूर्यवंशी रा. … Read more

कोयना नदीकाठी हाैदोस : चार जेसीबीसह 30 ट्रॅक्टरने तांबडी मातीचा उपसा, प्रशासन झोपेत

कराड | कराड तालुक्याचे तहसीलदारासह महसूल विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनातील अधिकारी कोरोना बाधित असल्याची माहिती असल्याने कोयना नदीकाठी वीट भट्टीसाठी लागणारी तांबडी मातीचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. कराड शहराजवळ असलेल्या मलकापूर शहराच्या हद्दीत वीट भट्टीसाठी तब्बल चार जेसीबी आणि 30 ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती उपसा सुरू आहे. अशावेळी प्रशासनाचे अधिकारी … Read more