आरेवाडीत श्री. भैरवनाथ पॅनेल विजयी

कराड | आरेवाडी (ता. कराड) येथील जय किसान विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला आहे. श्री भैरवनाथ रयत ग्रामविकास पॅनेलने निवडणूक लागलेल्या सर्वच्या सर्व 10 जागांवरती मोठ्या फरकाने विजय मिळवला. त्याचबरोबर एक जागा बिनविरोध अशा एकूण 11 जागा मिळविल्या. तर भैरवनाथ परिवर्तन पॅनेलला केवळ एक जागा बिनविरोध करण्यात यश … Read more

कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या मुलाचा थर्माकोल सुटला अन् बुडून मृत्यू

कराड | शिरवडे येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय- 14) असे बुडलेल्या मुलाचे नाव आहे. ओंकार ज्योतिर्लिंग विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता. ओंकार मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार आपल्या चार मित्रांसोबत दुपारी कृष्णा नदीवरील पुलाजवळ पोहण्यास गेला होता. थर्माकोलच्या आधारे पोहण्याचा प्रयत्न … Read more

तांबव्यात बिबट्यानंतर आता रानगव्याचा कळप, शेतकऱ्यांच्यात भीती

कराड | कराड तालुक्यातील तांबवे गावात आज रविवारी दि. 1 मे रोजी रानगव्याचा कळप घुसला. सकाळी गावच्या कमानीजवळ 4 ते 5 रानगवा आल्याने गावकऱ्यांची चांगलीच पळापळ उडाली. बिबट्यानंतर आता गवा रेडा गावात आल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. तेव्हा वनविभागाने या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्यातून केली जात आहे. तांबवे गावात कमानीजवळ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप … Read more

सुपने जिल्हा बँकेचे शाखाप्रमुख अजित शेडगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

देशमुखनगर | बोरगाव (ता.सातारा) येथील अजित विश्वनाथ शेडगे यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटकेने निधन झाले. ते 37 वर्षांचे होते. येथील वृत्तपत्र व्यवसायिक धनाजी शेडगे यांचे ते लहान बंधू होते. अजित शेडगे हे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या सुपने (ता.कराड) शाखेचे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुली,दोन भाऊ,वहिनी असा परिवार आहे. खा. उदयनराजे … Read more

अभयचीवाडी सोसायटीत सत्तांतर : अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर गटाचा विजय तर राष्ट्रवादीचा पराभव

कराड | अभयचीवाडी (ता. कराड) कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने सत्तांतर घडवले. ॲड. उदयसिंह पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने 12/1 असा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर यांना मानणाऱ्या पॅनेलचा पराभव करत सत्तांतर घडवून आणले. शेतकरी विकास परिवर्तन पॅनेलमधून यशवंत खाशाबा काटकर (140), सचिन नाथाजी जाधव (143), अनिल विठ्ठल पगडे … Read more

विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण यांचा काठी अन् घोंगडे देवून सन्मान

कराड | कल्पवृक्ष शेळी पालन व मेंढी पालन उद्योग समूहास महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि महाराष्ट राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी भाऊसाहेब ढेबे (काका) यांनी धनगर समाजाचे प्रतीक असलेले काठी अन् घोंगडे देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कराड तालुक्यातील कापील गोळेश्वर येथील युवा … Read more

चचेगाव येथे शेतकरी विकास पॅनेलचा 13- 0 ने विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी चचेगाव (ता. कराड) येथील चचेगाव विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने 13-0 असा विजय मिळवला. चचेगाव विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत ॲड. उदयसिंह पाटील, कराड दक्षिणचे विद्यमान आ. पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने चुरशीच्या झालेल्या लढतीत १३-० … Read more

आष्टा- इस्लामपूर मार्गावर अपघातात मुलाच्या डोक्याचा चेंदामेंदा तर बापाचे डोके डंपरच्या चाकात : कराड तालुक्यातील पिता- पुत्र ठार

शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार बेदरकार भरधाव डंपरने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत पिता- पुत्र जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या भयावह अपघातात पिता-पुत्रांची डोकी धडावेगळी झाली होती. दुचाकीवरील तिघेही कराड तालुक्यातील हजारमाची येथील आहेत. पती, पत्नी व मुलगा दुचाकीवरून जात असताना मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात अंकुश शिवाजी … Read more

राष्ट्रीय मार्गावर इर्टींगा चारचाकी आणि दुचाकीचा अपघात : आठजण जखमी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावरील पाचवड फाटा येथे चारचाकी इर्टीगा गाडी आणि दुचाकीचा अपघात जोरदार अपघात झाला आहे. अपघातातील दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून आठजण जखमी झालेले आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झालेले असून पंचमाना करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोल्हापूरहून कराडच्या दिशेला जाणाऱ्या लेनवरती चारचाकी (क्रमांक एमएच-12- केएन- … Read more

धावरवाडी ग्रामसभेत राडा : दारूच्या दुकानावरून जोरदार खडाजंगी

कराड | धावरवाडी (ता.कराड) ग्रामपंचायतीच्या हद्दीत बिअर बार व परमिट रूम ला परवानगी देण्यावरून ग्रामसभे दरम्यान दोन गट समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी मलिदा घेऊन परवानगी दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून सुमारे शंभर ग्रामस्थांच्या सह्या असलेले निवेदन कराड गटविकास अधिकारी यांना देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली … Read more