कराडला पेन्शरांचा मोर्चा : किमान 7 हजार 500 पेन्शन देण्याची मागणी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पेन्शनरांना किमान सात हजार ५०० रुपये पेन्शन, संलग्न महागाई भत्ता मिळावा, सर्वोच्च न्यायालयाचा पेन्शनचा निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी पेन्शनरच्या वतीने राष्ट्रीय संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना देण्यासाठी प्रांताधिकारी उत्तमराव दिघे यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांचे निवेदन संघर्ष समितीचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सुभाष पोखरकर, … Read more

कोडोलीतील हायस्कूलास शिक्षक आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य

कराड | कोडोली येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली (ता. कराड) येथील हायस्कूलला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर ( पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पोतदार ए. … Read more

पुणे- बेंगलोर महामार्गावर हुंडाईच्या धडकेने व्हॅगनार गाडी पलटी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बेंगलोर महामार्गावर वाहन चालकाचा ताबा सुटल्यानंतर पाठीमागून धडक दिल्याने व्हॅगनार गाडी पलटी झाली. कराड जवळ असलेल्या गोटे गावच्या हद्दीत आज दुपारी बारा वाजता हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज दिनांक 31/8/2022 दुपारी 12 वाजता गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत हाॅटेल … Read more

कराडला गणेशोत्सव काळात 165 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव : बी. आर. पाटील

Karad Police B R Patil

कराड | गणेशोत्सवाच्या काळात तापदायक ठरणाऱ्या 165 संशयितांवर तात्पुरत्या हद्दपारीचे 146 प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यातील काही लोकांना उत्सव कालावधीत स्थानबध्द अथवा त्यांना शहर सोडून जाण्याचे बंधन घालण्यात येणार आहे, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवात 100 स्वंयसेवकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांना स्वतत्र गणवेशाची … Read more

कराडचे तलाठी सागर पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात

कराड | कराडात ऑनलाईन सातबारा उतार्‍यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी कराडचे तलाठी सागर पाटील यांनी 40 हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आल्याने पुन्हा एकदा कराड तलाठी ऑफिस चर्चेत आले आहे. यापूर्वीही या तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यावर कारवाई करण्यात आली होती. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराडचे तलाठी सागर पाटील यांनी तक्रारदार … Read more

मंत्री संतापून पत्रकार परिषदेत म्हणाले… नवीन आहेस, मग घरी जा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि शिंदे- भाजप सरकार मधील राज्य उत्पादन शुल्क मंत्री असलेल्या शंभूराज देसाई यांची कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंत्री चांगलेच संतापलेले पहायला मिळाले, चक्क लाईट गेल्याच्या कारणावरून उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला झापले. मंत्री शंभूराज देसाई हे पत्रकार परिषद … Read more

आत्ताचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे, त्यांना हवाई सफर आवडत नाही; शंभूराज देसाईंचा नाव न घेता ठाकरेंना टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सध्याचे मुख्यमंत्री हे जमिनीवर चालणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांना जास्त हवाई सफर आवडत नाही, असे म्हणत मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. तसेच आत्तापर्यंत जेवढा निधी मिळाला नव्हता त्यापेक्षा जास्त आधी एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळेल असेही शंभूराज देसाई यांनी म्हंटल. ते कराड … Read more

देवाचा आर्शिवाद पाहिजे, म्हणत भामट्यांनी महिलेचे 12 तोळे केले लंपास

Karad Police

कराड | तुमच्या देवाचा मला आर्शिवाद पाहिजे, असे म्हणत हातचलाखी करत घरात शिरत महिलेचे सहा लाखांचे 12 तोळ्याचे सोन्याचे दागिने दोन भामट्यांनी लंपास केले. शहरातील मध्यवस्तीतील मेन रोड पोलिस चौकी नजीकच गजबजलेल्या अशोक चौकात भरदुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सुभद्रा रोकडे (रा. अशोक चौक, कराड) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. … Read more

आता टशन : धैर्यशील कदमांचा भाजपमध्ये प्रवेश, माजी पालकमंत्र्यांना शह देण्यासाठी खेळी

पुसेसावळी | कराड उत्तरचे नेते आणि वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी आज शिवबंधन तोडून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, खा.रणजितसिंह निंबाळकर,आ.राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कराड उत्तर मधील विकासकामांना गती देऊन धैर्यशील कदमांना ताकद देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी दिली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील … Read more

गणेशोत्सवात आवाजाची मर्यादा पाळावीच लागणार : अजय कुमार बन्सल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाने उत्सव काळात चार दिवस बारा वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. गणेशोत्सव काळात रस्त्यावर होणारी गर्दी, वाहतुकीची समस्या याबद्दल सूचना देण्यात येतील. शहरातील मंडळात नियमांचे उल्लघंन होणार नाही, यासाठी मंडळांनीही दक्षता घ्यावी. मंडळांचे परवान्यासाठीचे अर्ज ऑनलाइनही स्वीकारले जातील. तसेच ध्वनिपेक्षावरील आवाजाची मर्यादा पाळावीच लागेल. त्यासाठी पोलिस आवाज सेट करून देतील, असे … Read more