मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांकडून शिवरायांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक

सांगली प्रतिनिधी । कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यामुळे मिरज शहर सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरज पंचायत समिती समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. तसेच कर्नाटक सरकाराच्या निषेधाची घोषणा देत तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी समितीचे अ‍ॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, नगरसेवक शिवाजी दुर्वे, दिगंबर जाधव, विलास देसाई, संतोष माने, … Read more

बेंगळुरू मधील शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेमुळे मिरजेत संतप्त शिवसैनिकांकडून तुफान तोडफोड

 सांगली प्रतिनिधी ।  कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर साई फेकल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. आज, सकाळी मिरजेत संतप्त शिवसैनिकांनी बस स्थानक परिसरात एकत्र येऊन कर्नाटकच्या गाड्या फोडल्या. या परिसरात असलेल्या हॉस्पिटल वरील कर्नाटक अक्षारतील … Read more

बसवराज बोम्मई तत्काळ माफी मागा; वादग्रस्त विधाना प्रकरणी एकनाथ खडसेंची मागणी

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणी आता शिवसेना नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी बोम्मई यांच्यावर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारचे प्रमुख जर असे म्हणत … Read more

छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना ही छोटी गोष्ट; कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर महाराष्ट्रात याचे पडसाद उमटत आहेत. अशात आता कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना हि छोटी गोष्ट आहे, असे वादग्रस्त विधान बोम्मई यांनी केले आहे. … Read more

समाज कंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करा; पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेबाबत खासदार संभाजी छत्रपती यांच्यानंतर आता सातारचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “समाजकंटकांना शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे. बंगळुरुमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटनेनंतर खासदार … Read more

बेंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवा; संभाजी छत्रपती आक्रमक

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काल विटंबना करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेबाबत खासदार संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. बंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेववावी,’ असे खासदार संभाजी छत्रपती यांनी … Read more

बंगळुरुमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना; कोल्हापूर, बेळगावमधील शिवप्रेमीचा संताप

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ वरून कोल्हापूरात शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी कोल्हापुरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आहे. तर बेळगावात शिवप्रेमींकडून कानडी व्यावसायिकांची दुकाने बंद करण्यात आली. या घटनेचे पडसात कोल्हापूरही उमटले. … Read more

जेंव्हा बलात्कार टाळता येण्याजोगा नसतो, तेंव्हा झोपा आणि…; भर विधानसभेतच ‘या’ काँग्रेस आमदाराचे वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राजकीय नेत्यांमध्ये वादग्रस्त विधाने करण्याचे प्रमाण चांगलेच वाढल्याचे दिसते. अनेकजण अगोदर वादग्रस्त विधाने करतात आणि नंतर मग जाहीरपणे माफीही मागतात. मात्र, त्यामुळे त्यांची समाजामध्ये प्रतिमा खराब होतेच. असेच एक वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आले आहे. ते म्हणजे कर्नाटक विधानसभेचे माजी स्पीकर आणि वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश कुमार यांनी चक्क विधान … Read more

कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरूगेश निराणी यांना डी. लिट पदवी प्रदान

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ प्रसंगी कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांना विद्यापीठाच्या वतीने डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डॉ. सुरेश भोसले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रविण शिंगारे, डॉ. निलम मिश्रा, विनायक भोसले आदी … Read more

कर्नाटकात आता ऑनलाईन गेम खेळता येणार नाही, Online Gambling Games वर घातली बंदी

नवी दिल्ली । कर्नाटक सरकारने राज्यात ऑनलाइन गेमिंगवर पूर्णपणे बंदी घातली आहे. ऑनलाइन गॅम्बलिंग थांबवण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाईन गेमिंगवरील कायद्याची अधिसूचनाही जारी केली आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयापासून, Mobile Premier League (MPL) ने त्याच्या अटी आणि नियम अपडेट केले आहेत, ज्यामध्ये असे म्हटले गेले आहे की, कर्नाटकात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर कोणत्याही मोबाईल गेमिंगमध्ये सहभागी … Read more