जातपंचायतीच्या 5 जणांवर गुन्हा : प्रेमसंबधाच्या संशयावरून 2 लाखांचा दंड अन्यथा बहिष्कृतची धमकी

Pusegaon Police

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके पुसेगाव (ता. खटाव) येथे महिलेसोबत असलेल्या प्रेम प्रकरणाच्या संशयावरून बेकायदा जातपंचायत भरवून मुलाच्या कुटुंबियांवर 2 लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावणे. तसेच दंड न भरल्यास सामाजिक बहिष्कार टाकल्या प्रकरणी 5 जणांवर पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मतन लक्ष्मण शिंदे, लाव्हाऱ्या लक्ष्मण शिंदे, विकास मिन्या शिंदे, साजन किर्लोस्कर शिंदे, इंद्रा चंद्रकांत शिंदे … Read more

निमसोडला घरफोडीत 15 लाखांचा ऐवज लंपास

Satara Police

मायणी | निमसोड (ता. खटाव) येथील संजय हिंदुराव घाडगे यांच्या बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञातांनी सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संजय घाडगे हे व्यवसायानिमित्त उत्तर प्रदेशात राहतात. निमसोड येथे त्यांची आई वास्तव्यास असून त्या बुधवार दि. 21 डिसेंबर … Read more

श्री सेवागिरी महाराजांच्या अमृत महोत्सवी रथाचे राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते पूजन

Sevagiri Maharaj

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथ पूजन महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सेवागिरी यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. रथोत्सवाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सेवागिरी महाराजांच्या सोहळ्यास भाविकांची मोठी … Read more

राजपथ इंन्फ्रावर तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई : साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त

Rajpath Infra Khatav

सातारा प्रतिनिधी| वैभव बोडके औंध ते गोपूज रस्त्यावर आणि गोपूज गावच्या हद्दीत असलेल्या राजपथ इंन्फ्रा कंपनीने तब्बल साडे सहा कोटींचा महसूल बुडविला आहे. या कारणास्तव खटाव तालुक्याचे तहसीलदार तथा तालुका न्यायदंडाधिकारी किरण जमदाडे यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. संबंधित कंपनीच्या गौणखणीज साठ्यासह ते वाहतूक करणारी वाहने यापुर्वीच जागेवरच सिल केली होती. या बाबतची केस सुरू … Read more

चोराडे गावातील गायराण घरे कायम करा: चोराडे ग्रामस्थांचे पालकमंत्र्यांना निवेदन

Chorade villagers

पुसेसावळी | शासनाच्या कायद्यात बदल करून गायराणातील आता पर्यंतची सर्व अतिक्रमणे कायम करावीत, अशी मागणी चोराडे ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री शंभुराज देसाई यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की चोराडे गावात गायराण जागेत 1960 पासुन ते 2022 पर्यत 350 च्या वर घरे वसली आहेत. गावातील सर्व समाजातील लोक त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या … Read more

अवघ्या 1 हजाराची लाच घेताना मंडलधिकारी रंगेहाथ सापडला

Lach

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुसेसावळी येथे कार्यरत असलेला काशीळ गावचा मंडल अधिकारी अवघ्या एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला. वडिलांच्या नावाचा फेरफार नोंद करण्यासाठी 22 वर्षीय तक्रारदाराला लाचेची मागणी केली होती. केवळ एक हजाराची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडीलाच्या नावाचा फेरफार नोंद करण्यासाठी पुसेसावळी मंडल … Read more

विकासकामे करण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा ताकद द्यावी : सुरेंद्र गुदगे

Khatav Surendra Gudge

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आजवर सिमेंटबंधारे, कॉक्रिटीकरण, मुरमीकरण, साकव, गटर, रस्त्यांसारखी कोट्यावधीची कामे करण्यात आपणास यश आले. मात्र अलीकडच्या काळात विकासकामे करताना मर्यादा आलेल्या आहेत. तरुणांच्या मनातील विकासाच्या संकल्पना पुर्ण करण्यासाठी पाचवडकर ग्रामस्थांनी पुन्हा भविष्यात आपणास ताकद द्यावी, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगेंनी केले. पाचवड (ता.खटाव) येथील पाचवड- विखळे रस्त्याच्या कामाच्या … Read more

खटाव येथील चोरीला गेलेला ट्रक्टर सापडला : आरोपीस अटक

Stolen tractor seized Khatav

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वडी (ता. खटाव) येथील चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा छडा लावण्यात औंध पोलीसांना यश आले. या प्रकरणात सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोलिसांनी ट्रॅक्टर चोरट्याला गजाआड केले आहे. संशयित आरोपी हा पाटण तालुक्यातील भुडकेवाडी येथील रहिवाशी असून एका अल्पवयीन मुलासही ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडी येथील संदीप विष्णू … Read more

तहसिलदाराच्या दरवाजाला कुजलेल्या सोयाबीनचे तोरण बांधून निषेध

Shivsena Andolan Vaduj

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पन्नास खाेके…एकदम अोके, या सरकारचं करायचे काय… मिंद्दे सरकार हाय हाय…शेतक-यांना दिलासा देत नाय.. अशा घाेषणा देत सातारा जिल्ह्यातील वडूज येथे शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी वडूज तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला कुजलेल्या शेतातील पिकाचे तोरण बांधून सरकारचा निषेध नाेंदविला. सातारा जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून मुसळधार पडलेल्या परतीचा पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान … Read more

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकात राष्ट्रावादीचा झेंडा फडकावा : आ. बाळासाहेब पाटील

पुसेसावळी | मतदार संघातील गावांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असुन पुसेसावळी भागातही अनेक विकासकामे केलेली आहेत. आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व मार्केट कमिटीच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वानी काळजी घेणं आवश्यक आहे. गावाचं विकासाचं केंद्र आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आपल्याला हे काम करायच आहे. त्यासाठी … Read more