कातरखटाव येथे दिवसाढवळ्या घरफोडी : 35 तोळे सोन्यासह रोख रक्कमही लंपास

खटाव | कातरखटाव (ता. खटाव) येथील भरवस्तीत असणारे एक बंद घर दिवसाढवळ्या अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी तानाजीराव देशमुख यांच्या बंद घरातील सुमारे 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदी आणि रोख रक्कमही लंपास केली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून घटनेची माहिती घेतली आहे. परंतु दिवसाढवळ्या घडलेल्या घरफोडीमुळे नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

विसापूर येथे वृध्द पती-पत्नीच्या खूनाने खळबळ

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यात विसापूर गावात एका वृध्द दाम्पत्यांचा खून केल्याची घटना समोर आली आहे. हनुमंत निकम (वय-70) आणि त्याची पत्नी कमल हनुमंत निकम (वय -65 ) असे खून झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. विसापूर गावात या भयंकर घटनेमुळे खळबळ उडाली. या खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असून पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपसा केल्याची … Read more

पोपळकरवाडी येथे भीषण अपघातात दुचाकीवरील 3 जण जागीच ठार

Accident

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके निमसोड -म्हासुर्णे मार्गावर असलेल्या पोपळकरवाडी येथे एका ट्रीपल सीट निघालेल्या मोटरसायकलला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत मोटर सायकलवरील तीघेजण जागीच ठार झाले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल रात्री शनिवारी (दि.25) रात्री आठच्या सुमारास हा अपघात घडली. या अपघातातील मृतांमध्ये गजानन दबडे (रा. कलेढोणे, ता. खटाव) यांचासह … Read more

शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर आज खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील व विविध विभागाचे अधिकारी यांनी शहीद जवान सुरज शेळके यांना … Read more

वनविभागाची कारवाई : जिवंत घोरपडीसह एकजण ताब्यात

Forest Department Arrest News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके खटाव तालुक्यातील नांदोशी येथे जिवंत घोरपड पकडून घरी आणल्या प्रकरणी वन विभागाकडून एकावर कारवाई करण्यात आली आहे. जिवंत घोरपड, दुचाकीसह एकास ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. धनाजी मारूती खताळ (वय 45, रा.नांदोशी, ता. खटाव, जि.सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नांदोशी गावचे … Read more

धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारे सातारा जिल्ह्यातील “विसापूर”

सातारा प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील  ब्रिटीशकाळापासून लष्कराचा इतिहास सांगणारे धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारे सातारा जिल्ह्यातील विसापूर हे गाव आहे. खटाव तालुक्यातील या गावात 225 आजी- माजी सैनिक आहेत. आजपर्यंत भारत देशासाठी या गावातील 5 सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे या गावासोबत आता विसापूर या गावातही घरटी सैनिकांची परंपरा निर्माण … Read more

साताऱ्याचे सुपुत्र सुभेदार विजय शिंदे लडाखमध्ये शहिद

सातारा | लडाख येथे सैनिकांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात सातारा जिल्ह्याचा सुपुत्र शहिद झाला आहे. खटाव तालुक्यातील विसापूर येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे असे मृत जवानाचे नांव आहे. सायंकाळी त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच विसापूर गावावर शोककळा पसरली आहे. लडाख येथे 26 सैनिकांना जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडले. या अपघातात सात जवानांचा मृत्यू झाला. … Read more

400 वर्षाचा इतिहास असलेल्या यमाई देवी तळे परिसर विकासाच्या कामास मुख्यमंत्र्यांची मान्यता

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील औंध येथे यमाईदेवी तळे सुशोभीकरणास आणि परिसर विकासाच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून हे काम करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव … Read more

म्हासुर्णे सोसायटीच्या चेअरमनपदी दादासो कदम तर व्हा. चेअरमनपदी प्रदिप माने बिनविरोध

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील म्हासुर्णे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी दादासो कदम तर व्हा.चेअरमन प्रदिप प्रताप माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित संचालक राजाराम माने, गोरख माने, रामचंद्र माने, चंद्रकांत माने, अधिक सदाशिव माने, अधिक शिवाजी माने, दिपक यमगर, रविंद्र सरकाळे, जगन वायदंडे, अर्चना निकम, कांताबाई माने यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित चेअरमन व … Read more

जवान मंदार नलवडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खटाव | वेटणे (ता. खटाव) गावचे सुपुत्र व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा जवान मंदार मानसिंग नलवडे (वय- 32) यांचा बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास देशसेवा बजावीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यांना रात्री उशिरा साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. जवान मंदार यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वेटणे येथील … Read more