सातारा जिल्ह्यात सकाळपासून अनेक भागात पावसाला सुरूवात

सातारा | सातारा जिल्ह्यात आज गुरूवारी दि. 29 रोजी सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर माण, कोरेगाव, सातारा, खटाव व फलटण तालुक्यातील काही ठिकाणी मध्यम, तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नवरात्र उत्सव सुरू असून पावसाचाही अंदाज वर्तविला असल्याने दांडिया खेळण्याचा हिरमोड होवू शकतो. आज … Read more

येरळा नदीत पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या वृध्दाचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव नजीक असलेल्या येरळा नदीच्या पात्रात एक वृध्द चरायला नेलेली जनावरे घेवून घरी परतताना पूराच्या पाण्यातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. भिकू आकोबा पाटोळे (वय- 60) असे सदरील इसमाचे नाव असून आज सोमवारी दि. 12 रोजी ते मयत अवस्थेत आढळून आले आहेत. याबाबतची पुसेगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी … Read more

सीसीटीव्हीमुळे गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत : दत्तात्रय दराडे

पुसेसावळी | पुसेसावळी पोलीस दुरक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या वडगावमध्ये ग्राम पंचायतीच्या वतीने सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे गुन्हे उघडकीस येण्यास पोलीस यंत्रणेला मदत होणार आहे. तसेच गावामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल. तरी गावामध्ये चोरीचे प्रमाण कमी होण्यास सी.सी. टीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे मदत होणार असल्याचे मत औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय दराडे यांनी … Read more

आता टशन : धैर्यशील कदमांचा भाजपमध्ये प्रवेश, माजी पालकमंत्र्यांना शह देण्यासाठी खेळी

पुसेसावळी | कराड उत्तरचे नेते आणि वर्धन अँग्रोचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी आज शिवबंधन तोडून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.जयकुमार गोरे, खा.रणजितसिंह निंबाळकर,आ.राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. कराड उत्तर मधील विकासकामांना गती देऊन धैर्यशील कदमांना ताकद देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी दिली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील … Read more

खटाव तालुक्यातील सरपंच संघटनेचे उपोषण तात्पुरते स्थगित

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील सरपंच संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात पंचायत समिती प्रशासनाच्या विरोधात संघटनेच्यावतीने आज येथे उपोषण करण्यात आले. या आंदोलनाला तालुक्यातून वाढता पाठिंबा पाहून तात्काळ तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी उदय साळुंखे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमित पंडित यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करून सर्व मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तात्पुरते … Read more

चोराडे फाट्यावर वाहनांच्या अपघातात वाढ : स्पीड बेकर बसवण्याची मागणी

पुसेसावळी | खटाव तालुक्यातील चोराडे गावातुन विटा- महाबळेश्वर हा नव्याने झालेल्या राज्यमार्गामुळे चोराडे फाट्यावरुन वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातात वाढ झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुस स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी वाहनचालक व ग्रामस्थांकडून होत आहे. या मार्गावर वाहनांना कोणत्याही प्रकारच्या वेगाचे बंधन राहिले नसल्याने सातत्याने अपघातांची मालिका सुरुच आहे. या रस्त्यावरून जाताना पादचारी, दुचाकी चालक यांना जीव मुठीत … Read more

उरमोडी जलसिंचनचे वडी येथे विक्रमबाबा कदम यांच्या हस्ते पाणी पूजन

खटाव | उरमोडी जलसिंचन योजनेचे पाणी दुष्काळी भागातील खटाव माण भागातील गावांना वर्षभर मिळावे व पावसामुळे अतिरिक्त झालेल्या पाणीसाठा आत्ताच दुष्काळी भागात वळवून उन्हाळ्यात कोरडे पडणारे तलाव बंधारे भरावेत अशी मागणी कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेते व वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम, वर्धन ऍग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक पुसेसावळी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते विक्रमबाबा … Read more

दरोड्यातील तब्बल 2 कोटीचा मुद्देमाल सुरक्षित : वडगाव जिल्हा बॅंक चोरी प्रकरणात 3 युवक अटकेत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील वडगांव जयराम स्वामी येथे दि. 7 रोजी रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिडकीचे लोखंडी गज, कापून बँकेचे आतमध्ये प्रवेश केला. तसेच गॅसकटरच्या सहाय्याने बँकेची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. सदर बाबत माहिती प्राप्त होताच तात्काळ औंध पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल … Read more

पैशासाठी वृध्द सासू- सासर्‍यांचा मावस जावयाने केला खून, दोघांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील विसापूर येथील निकम दांपत्याच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सतीश विजय शेवाळे (वय- 47, रा. शनिवार, पेठ, सातारा) व त्याचा साथीदार सखाराम आनंदा मदने ( वय- 43, रा. पारले उत्तर, ता. कराड) या दोघांना अटक केली. संशयितास 10 ते 15 दिवसांनंतर … Read more

शेअर मार्केटमध्ये नुकसान : मुलाने मारला स्वतःच्याच घरात 35 तोळ्याच्या सोन्यावर डल्ला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कातरखटाव येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीतील संशयिताला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, ही चोरी फिर्यादीच्याच मुलाने केल्याचे समोर आले आहे. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुलाने स्वतःच्या घरातील 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोलिसांनी दोन तासाच्या आतच या चोरीचा भांडाफोड केला. तेजस तानाजी देशमुख (वय- 20, रा. कातरखटाव, … Read more