द्रोणाचार्य अकॅडमीत प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनीला काठीने मारहाण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके अकॅडमीत सराव करताना थकवा आल्याने ग्राऊंडवर बसल्याने प्रशिक्षणार्थी विद्यार्थींनीला काठीने मारहाण केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. खटाव तालुक्यातील दरूज येथील द्रोणाचार्य अकॅडमीतील हा प्रकार घडला. सरावात आई- वडिलांचा उल्लेख करत शिवीगाळ करू नका असे म्हटल्याने विद्यार्थींनाला प्रशिक्षकाने काठीने मारहाण केली आहे. पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरुज येथील … Read more

खटाव तालुक्यात 22 जणांवर कारवाई : जुगार अड्डयावर तलवारीसह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त

jugar

खटाव | पांढरवाडी (ता. खटाव) गावच्या हद्दीतील जुगार अड्डयावर सातारा आणि पुसेगाव पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. पोलिसांनी 14 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेत 22 जणांवर कारवाई केली आहे. याबाबत पुसेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सहाय्यक पोलिस अधिक्षक आंचल दलाल यांना पांढरवाडी येथील प्रदीप नलवडे यांच्या पोल्ट्री शेडमध्ये सागर काटकर (रा. ललगुण) हा बेकायदेशीर जुगार … Read more

रस्त्यात उभ्या ट्रॅक्टर ट्राॅलीला दुचाकीची धडक, युवक जागीच ठार

पुसेसावळी : – कडेगाव तालुक्यातील नेवरी जवळ उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टर ट्राॅलीला मोटरसायकल चालकाने जोराची धडक दिली. या अपघातात खटाव तालुक्यातील मोटरसायकल स्वार ठार झाला असल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक घटनास्थळी वरून मिळालेली माहिती अशी, विटा (ता.खानापूर) येथील सुळेवाडी पाटबंधारे विभागात कार्यरत असलेले वैभव गुरव (वय- 25, रा पुसेसावळी, ता. खटाव) हे त्याच्या मालकीच्या हिरो … Read more

शिक्षणा बरोबरच व्यक्तीमत्व विकास होणे आवश्यक : रचना पाटील

खटाव | उज्वल भविष्य घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तीमत्व विकास होणे गरजेचे असुन त्यामुळे विद्यार्थांनी व्यक्तीमत्व विकास व संभाषण कौशल्य आत्मसात केले पाहिजे असे मत श्रीनिवास पाटील फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा रचना सारंग पाटील यांनी व्यक्त केले. वडगाव ज.स्वा (ता.खटाव) येथे श्रीनिवास पाटील फाऊंडेशन व जयराम स्वामी विद्यामंदीर यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तीमत्व विकास व प्रभावी संभाषण कौशल्य कार्यशाळा … Read more

खटावचे तहसिलदार किरण जमदाडे शेतकऱ्यांच्या बांधावर

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके तडवळे ता. खटाव येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्याने खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पिकाची पाहणी करून पंचनामा करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तहसिलदारांच्या या कामाच्या पध्दतीमुळे शेतकऱ्यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या चार दिवसापूर्वी सातारा जिल्ह्यात अवकाळीने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे खटाव तालुक्यातील हाताशी … Read more

खटाव तालुक्यातील तडीपार गुंडास अटक

Dahiwadi Police

दहिवडी | खटाव तालुक्यातील एका तडीपार गुंडाने आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दीपक नामदेव मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) असे तडीपार गुंडाचे नांव आहे. दीपक मसुगडे यांच्यावर पुसेगाव, दहिवडी, फलटण, कोरेगाव या परिसरात मोठी दहशत होती. त्याच्यावर जबरी चोरीचे, घरफोडीचा, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी व चोरी असे एकूण 9 गुन्हे … Read more

दिवाळीनिमित्त पारगांवात मेंढरांची अनोखी जंगी स्पर्धा संपन्न

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस गेली 98 वर्षापासून दिवाळी निमित्त खटाव तालुक्यातील पारगांव येथे मेंढ्या पळवण्याची पंरपरा सुरू आहे. या वर्षी ही बिरुदेव मंडळाने मेंढ्यांच्या जंगी शर्यती आयोजन केले होते. यावेळी बिरुदेव मंदिराभोवती गोल फेरी मारून खांडव्यातील बकऱ्याने व मेंढ्यांनी उंची उढी मारून नारळाचे तोरण शिवले. यावेळी विजेत्या मेंढ्यांना चांदीचे कडे व चांदीची अंगठी देवून … Read more

वडूज नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते शहाजीराव गोडसे यांचा शिवसेनेत प्रवेश

खटाव | वडूज नगरपंचयातीचे विरोधी पक्षनेते शहाजीराजे गोडसे यांच्या शिवसेनेत प्रवेशाने खटाव तालुक्यात पक्षाला निश्चित ऊर्जा मिळणार असून विकासकामासाठी पक्ष शहाजीराजे गोडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे वक्तव्य शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क नेते दिवाकर रावते यांनी केले. वडूज नगरपंचयातीचे विरोधी पक्षनेते यांनी शिवसेनेत प्रवेशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सातारा सांगली संपर्क प्रमुख प्रा. नितीन … Read more

खटाव तालुक्यातील पती- पत्नीचे 12 तासांत निधन झाल्याने हळहळ

खटाव | बनपुरी, (ता. खटाव) येथे पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बनपुरी येथील प्रभावती रामचंद्र गुरव यांचे मंगळवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांना बुधवारी सकाळी 8 वाजता अग्नी देण्यात आला. त्यानंतर केवळ दोन तासाने बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पती रामचंद्र अनंत गुरव (वय- 82) यांचेही … Read more