म्युकोरमायकोसिसचा ठाण्यात पहिला रुग्ण आढळला, महिलेचा डोळा झाला निकामी

Mucormicosis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: देशात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाशी लढताना नाकीनऊ येत असताना आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस रोगाचा संसर्ग होताना आढळून येत आहे. म्युकोरमायकोसिसचा पहिला रुग्ण ठाणे जिल्ह्यात आढळला आहे. एका महिलेला याची लक्षण आढळून आली असून या महिलेचा डोळा निकामी झाला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ठाण्यातील जिल्हा … Read more

कर्नाटकने रोखला ‘या’ 6 जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्सिजनचा पुरवठा; केंद्राची हस्तक्षेपाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वाढत्या संख्येला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक आहे. केंद्राकडून प्रत्येक राज्याला ऑक्सिजनच्या टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑक्सिजनच्या अभावी अनेकांनी आपले प्राण गमावल्याची घटना देखील आपण पाहिल्या आहेत. मात्र आता कर्नाटकातून कोल्हापूर, सांगली, सातारा याबरोबरच सहा जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजनचा … Read more

पश्चिम बंगाल हिंसाचार प्रकरणी चौकशीसाठी केंद्राने गठित केली समिती

amit shah mamata banarjee

नवी दिल्ली वृत्तसंस्था: दोन मे रोजी पश्चिम बंगाल निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यानंतर मात्र पश्‍चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आलं. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारप्रकरणी आता केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारने या चौकशीसाठी एक समिती गठीत केली आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्रालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी … Read more

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरींचे कोरोनामुळे निधन, PM मोदींनी व्यक्त केले दुःख

ajit singh

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोनामुळे देशात हाहाकार माजला आहे. अशातच कोरोनामुळे देशातील अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटींना देखील आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे (Rld )अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून त्यांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी … Read more

PMO वर अवलंबून राहणे फायद्याचे नाही, कोरोना युद्धाची जबाबदारी गडकरींकडे द्या! भाजप खासदारांचा घरचा आहेर

नवी दिल्ली वृत्तसंस्था : देशात सध्या कोरोनाची परिस्थिती अतिशय चिंताजनक बनली आहे. रोज नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. अशा परिस्थिती सध्याची स्थिती हाताळण्यासाठी मोदी सरकारला अपयश आल्याची टीका केली जात आहे. मात्र राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी खुद्द याबाबत असे वक्तव्य केले आहे. मोदींनी या कोरोना युद्धाची जबाबदारी केंद्रीय मंत्री गडकरींकडे सोपवावी, … Read more

RBI कडून मोठी घोषणा आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी ५०,००० कोटी देणार

नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे.याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. अशातच आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आरबीआय आपत्कालीन आरोग्य सेवांसाठी 50 हजार कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, दुसऱ्या लाटेच्या विरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या संपूर्ण … Read more

पॅराशूट तेलाच्या किंमती वाढवून ऑफर्स केल्या बंद, तरीही विक्रीत 29% वाढ; कंपनीला झाला हजारो कोटींचा नफा

नवी दिल्ली । कंपन्यांच्या चौथ्या तिमाहीचा निकाल येऊ लागला आहे. शुक्रवारी, पॅराशूट तेलाचे (Parachute Oil)  उत्पादन करणार्‍या मेरीकोने (Marico) आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल शेअर बाजाराला दिला. 2020-21 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च 21 मध्ये मेरीकोचा नफा वार्षिक वर्षाच्या 14.1 टक्क्यांनी वाढून 227 कोटी रुपये झाला आहे. विश्लेषकांच्या मते हे 220 कोटी … Read more

वाहनांच्या नव्याने नोंदणीसाठी सरकार बनवणार सुलभ नियम, याचा लाभ कसा घ्यावा ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांच्या नव्याने रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुलभ नियमांची अधिसूचना जारी केली आहे. ज्यामध्ये सरकारने सर्वसामान्यांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यानंतर नवीन राज्यात वाहन नोंदणीसाठी शासन आराखडा तयार करेल. त्याचबरोबर हा मसुदा तयार झाल्यानंतर नवीन नियम बनविण्यात येतील ज्यामुळे आपल्याला अनेक बरेच फायदे मिळतील. उदाहरणार्थ, जर आपल्याला आता नोकरी किंवा इतर … Read more

देशातील कोरोनास्थितीवर आज केंद्र सरकार मांडणार सुप्रीम कोर्टात बाजू

suprim court

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशातील करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता सर्वोच्च न्यायालयाने ही बाब गंभीर मानत कोरोनाला राष्ट्रीय संकट असल्याचे म्हटले होते मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने असे म्हटले की गंभीर परिस्थिती असताना केवळ मूक प्रेक्षक बनून नाही राहू शकत. याशिवाय देशातील ऑक्सिजन, रेमडीसीवीरआणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून देखील केंद्र सरकारला विचारणा केली होती. आता आज शुक्रवारी होणाऱ्या … Read more

केंद्राने लसी दिल्या म्हणून राज्यात सर्वात जास्त लसीकरण; फडणवीसांचा हल्लाबोल

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध आणि लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. यावरूनच विरोधी पक्ष … Read more