महाबळेश्वरला जाताय तर थांबा, घाटात दरड कोसळली

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- मेढा- महाबळेश्वर मार्गावर केळघर घाटात दरड कोसळली आहे. रेंगडी गावानजीक काळाकडा या ठिकाणी दरड कोसळली. दरड कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महाबळेश्वरला जाणारे पर्यटक घाटात अडकून पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर जाणाऱ्या पर्यटकांनी पर्यायी मार्गाने जावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी सकाळी केळघर … Read more

महाबळेश्वर, कास पर्यटकांसाठी खासच : सलग सुट्ट्यांमुळे फुल्ल गर्दी

सातारा | सातारा जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ असलेले कास पुष्प पठार आणि महाबळेश्वर ही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी नेहमीच खास राहिली आहेत. कास पठारावरील फुलांच्या हंगामाचा शुभारंभ झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसात सलग सुट्ट्यांमुळे 4 हजार पर्यटकांनी कासला वर्षातील पहिली भेट दिली. तर मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरलाही शेकडो पर्यटकांनी भेट दिली. कास पठारावर यंदाच्या हंगामाचा शुभारंभ मुख्य … Read more

महाबळेश्वर अर्बन बॅंकेवर प्रशासक नेमण्याची संचालकांची मागणी

महाबळेश्वर | महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बॅंकेत प्रशासकाही नियुक्ती करण्याची मागणी बँकेचे संचालक समीर सुतार यांनी सहा.दुय्यम निबंधक जे.पी शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीत तोडकर, दिलीप रिंगे, वृषाली डोईफोडे उपस्थित होत्या. महाबळेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या निवडी आधी सर्व संचालकांची … Read more

मुख्यमंत्री थांबलेले महाबळेश्वर मधील `ते` हाॅटेल अनाधिकृत

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या खासगी दौऱ्यावर महाबळेश्वर येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाबळेश्वरच्या हॉटेल ब्राईट लँड या हाॅटेलमध्ये वास्तव्य केलेलं होते. आता हे हॉटेल बेकायदेशीर बांधण्यात आलं असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन या हाॅटेलवर कारवाई करणार की दबावात अधिकृत करणार असा … Read more

मुख्यमंत्र्यांचे अनाधिकृत बांधकामांना अभय? : म्हणतायत “मुद्दा तपासू, तातडीने कारवाई नाही”

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आपल्याला पर्यटन वाढवायचे आहे, पण पर्यावरणही जपायच आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, परंतु लोकांनीही सहकार्य करावे. पर्यटन आणि पर्यावरणाचा बॅलन्स करायचा आहे. शेवटी सर्व ग्रामस्थ आपले आहेत. त्यामुळे तातडीने कुणावर अन्याय होईल, असे सरकार काही करणार नाही. सरकार गोरगोरीबांचे आहे. त्यांची रोजीरोटी जाईल असेही करणार नाही, असे म्हणत अतिक्रमण असलेल्या … Read more

वाई, महाबळेश्वर येथून चोरीस गेलेल्या 6 दुचाकी जप्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई शहरातील सिद्धनाथवाडी येथे दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेवून चाैकशी केली असता वाई आणि महाबळेश्वर येथून चोरलेल्या 6 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या प्रकरणात प्रतिक लक्ष्मण भोसले (वय- 19 वर्षे, रा. शिरगांव, ता. वाई), हेमंत किशोर कदम (वय- 19 वर्षे रा. खेड (नांदगीरी) ता. कोरेगाव) या … Read more

महाबळेश्वरला गवारेडा विहिरीत पडला अन् वनविभाग रिकाम्या हातांनी पोहचले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड येथील मोलेश्वर या गावानजीक असलेल्या खोल विहरित काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रानगवा पडला. महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून काल रात्रीपासून हा गवा पाण्याने साचलेल्या विहरित अडकून पडला आहे. वनविभाग घटनास्थळी रिकाम्या हातांनी दाखल झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर तालुक्यात मोलेश्वर येथे काल … Read more

पुनवडी पुलाचा भराव संततधार पावसाने वाहून गेला : बारा गावे संपर्कहीन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर तालुक्यातील केळघर परिसरात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पुनवडी पुलाचा भराव वाहून गेला आहे. या पुलाचा भराव वाहिल्याने 10 ते 12 गावांचा केळघर- मेढ्याशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सातारा जिल्ह्यात गेल्या 10 दिवसापासून पावसाने कमी- जास्त प्रमाणात हजेरी लावली आहे. तर जावळी, महाबळेश्वरसह कोयना धरण क्षेत्रात … Read more

महाबळेश्वरातील Wilson Point वरील ऐतिहासिक बुरुज ढासळला

Wilson Point Tower

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्राचे नंदनवन समजले जाणारे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर पाचगणीचा निसर्गरम्य परिसर होय. महाबळेश्वर शहर व परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. येथील महत्वाच्या व उंच असलेल्या विल्सन पॉईंटवरील तीन बुरुजापैकी एक बुरुज ढासळला आहे. महाबळेश्वर मधील महत्वाच्या असलेल्या विल्सन पॉईंटवरील बुरुज ढासळल्यामुळे त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, … Read more

महाबळेश्वरात CBI चा छापा : कोट्यावधी रूपयांचे पेटींग्ज घेतले ताब्यात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर येथील वाधवन बंधूंचा बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा वाधवान यांच्यावर आरोप आहे. CBI चे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान याच्या बांगल्यावर हजर झाले आहेत. परदेशी पेंटिंग्ज पोर्ट्रेट सील करून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्या पेंटींग्ज पोर्ट्रेटची किंमत कोटी … Read more