मी तुरुंगात गेलो नाही ; शरद पवारांचा अमित शहांना टोला

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अमित शहा यांनी सोलापूरच्या सभेत त्यांनी काय केले असा सवाल केला होता. त्या सवालाचे शरद पवार यांनी सोलापूरातच उत्तर दिले आहे. मी अनेक चांगली वाईट कामे केली मात्र मी तुरुंगात गेलो नाही असे शरद शरद पवार म्हणाले आहेत. त्यांनी नाव नघेता अमित शहा यांच्यावर संधान साधले … Read more

कॉंग्रेस हाय कमांड : जेष्ठ नेत्यांनी विधानसभेची निवडणूक लढा ; या नेत्यांना लढण्याचे आदेश

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्या नंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीला नवीन रणनीती आखली आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वच जेष्ठ नेत्यांना काँग्रेसने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. जेष्ठ नेते निवडणुकीला सामोरे गेल्यास काँग्रेसचे संख्याबळ वाढेल आसा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींचा अंदाज आहे. उद्या बुधवारी काँग्रेस छाननी समितीची नवी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडणार आहे. … Read more

कोल्हापुरातील ‘या’ स्थानिक नेत्या सोबत मुख्यमंत्र्यांनी केली बंद दाराआड चर्चा

कोल्हापूर प्रतिनिधी | मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी रात्री जनसुराज्‍य शक्‍ती पक्षाचे संस्‍थापक अध्‍यक्ष व माजी मंत्री विनय कोरे यांनी भेट घेतली. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्‍यांची बंद खोलीत चर्चा झाली. मात्र चर्चेचा तपशिल समजू शकला नाही. याशिवाय संभाजी भिडे तसेच शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके, आ. डॉ. सुजित मिणचेकर यांनीही मुख्‍यमंत्र्यांची भेट घेतली. युतीसाठी शिवसेनेचा … Read more

बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

ठाणे प्रतिनिधी | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर आणि ऐरोली विधान सभेत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकी नंतर विजयी मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या नवी मुंबईत … Read more

युतीसाठी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला ; भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई प्रतिनिधी |  भाजप शिवसेना युतीच्या चर्चा सध्या अशा वळणावर आल्या आहेत कि कधी ही युती तुटू शकते अथवा कधीही युती अंतिम होऊ शकते. शिवसेना कमी पणा घ्यायला तयार नाही आणि भाजप शिवसेनेला अधिकच्या जागा देण्यास तयार नाही अशा स्थितीत युतीचे काय होणार हा यक्ष प्रश्न आहे. शिवसेना भाजप युतीचा शिवसेनेने नवीन फॉर्म्युला भाजपसमोर ठेवला … Read more

काँग्रेस सोडलेल्या उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई प्रतिनिधी | राजकारण कोणता व्यक्ती कोणत्या पक्षात जाईल याबद्दल काहीच सांगता येत नाही. राजकीय विचारधारा हि बाब कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे. अशाच पक्षांतराच्या वादळात काँग्रेस सोडलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सोबत फोन वरून चर्चा केल्याचे देखील … Read more

राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत थारा नाही : शरद पवार

नाशिक प्रतिनिधी |  लोकसभा निवडणुकीत ‘लाव रे तो व्हिडीओ’ च्या जुमल्याने भाजपला सळो की पळो करून सोडले. त्या राज ठाकरे यांना शरद पवार यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नाशिक येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मनसेला महाआघाडीत थारा दिला जाणार नाही असे म्हणले आहे. त्यामुळे मनसे नेमके काय पाऊल उचलणार हे बघण्यासारखेच राहणार आहे. राज … Read more

कर्जत जामखेड : रोहित पवारांना धक्का ; राष्ट्रवादीच्या ताकतवान स्थानिक महिला नेत्या भाजपच्या वाटेवर

अहमदनगर प्रतिनिधी |  शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या अडचणी वाढवण्यात त्यांचे प्रतिस्पर्धी राम शिंदे यशस्वी होताना दिसत आहे. कारण राम शिंदे स्थानिक राष्ट्रवादी संघटनात्मक दृष्ट्या खीळखिळा करण्याच्या तयारीत असल्याचे पाहण्यास मिळते आहे. रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरु होण्याआधी राष्ट्रवादीतून कर्जत जामखेड मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असणाऱ्या मंजुषा … Read more

पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला भुजबळांची दांडी ; राजकीय चर्चाना पुन्हा उधाण

नाशिक प्रतिनिधी |  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे घोंगावते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. हे पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आता संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार हे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्याला आज (सोमवार) नाशिकमधुन सुरूवात झाली आहे. एकीकडे … Read more

म्हणून उदयनराजेंच्या प्रवेशाला पंतप्रधान उपस्थित राहिले नाहीत : मुख्यमंत्री

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असे बोलले जात होते. परंतु मोदी उपस्थित राहिले नाहीत आणि सर्वांना चर्चेसाठी एक नवा विषयच मिळाला. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साताऱ्यात पत्रकारांनी विचारना केली असता त्यांनी पत्रकारांना या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान हे पद … Read more