Thursday, March 30, 2023

मी तुरुंगात गेलो नाही ; शरद पवारांचा अमित शहांना टोला

- Advertisement -

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अमित शहा यांनी सोलापूरच्या सभेत त्यांनी काय केले असा सवाल केला होता. त्या सवालाचे शरद पवार यांनी सोलापूरातच उत्तर दिले आहे. मी अनेक चांगली वाईट कामे केली मात्र मी तुरुंगात गेलो नाही असे शरद शरद पवार म्हणाले आहेत. त्यांनी नाव नघेता अमित शहा यांच्यावर संधान साधले आहे.

राष्ट्रवादी पक्षाला पडलेले खिंडार बघता अवसान नगाळता शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची आखणी केली आहे. त्यासाठीच ते सोलापूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी भाजप अध्यक्षांचा खरपूस समाचार घेतला आहे.

- Advertisement -

अजून मी म्हातारा झालो नाही. बऱ्याच लोकांना आणखी घरी बसवायचे बाकी आहे असे देखील शरद पवार म्हणाले आहेत. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला लागलेली गळती पाहता राष्ट्रवादीची एक किंवा दोन जागा या जिल्ह्यात निवडून येतील असे चित्र असताना कार्यकर्त्यांमध्ये शरद पवारांच्या भाषणे चांगलाच उत्साह संचारला आहे.