भाजपच्या बंडखोर उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडले

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या दोन समर्थकांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटताना रंगेहात पकडले आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे शुक्रवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला असून, याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबनराव लोणीकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

जालन्यातील परतुरचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वायरल विडिओ मधील भाषणाच्या आधारावर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवारांच्या ‘त्या’ सभेनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जोश! ट्विटर द्वारे व्यक्त केले मत

राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी केवळ काही तास शिल्लक आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला असून सर्वच पक्ष मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसत आहे. अनेक पक्षांच्या सभा वेगवेगळ्या कारणाने गाजत आहेत. अशीच एक सभा सध्या शुक्रवार रात्रीपासून तुफान चर्चेत आहे ती म्हणजे साताऱ्यामध्ये झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची सभा.

महाराष्ट्रातील दुष्काळ काँग्रेस-राष्ट्रवादी निर्मित- नितीन बानगुडे पाटील

महाराष्ट्रातील दुष्काळ हा निसर्ग निर्मित नसून तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस निर्मितआहे . या दोन्ही काँग्रेसने राज्यात ७० हजार कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा केला आहे. हा घोटाळा झाला नसता तर महाराष्ट्रातील इंच-इंच जमीन ही सिंचनाखाली आली असती , ही सर्वात मोठी वस्तुस्थिती आहे. शेतकरी मोडून पडला हे पाप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. असा आरोप शिवसेनेचे नेते नितीन बानगुडे पाटील यांनी बुलढाणा येथे केला.

चंदगड मध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; भाजप समर्थक अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असतानाच अनेक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदगड मधून काँग्रेस आघाडीकडून राजेश पाटील तर महायुतीकडून संग्राम कुपेकर हे रिंगणात आहेत. या दोघांविरोधात भाजप समर्थक अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी शड्डू ठोकला आहे.

‘तिकीट नाही दिलं तर मी काय गप्प बसणार आहे!’- एकनाथ खडसे

नाथाभाऊला तिकीट नाही दिलं तर काय नाथाभाऊ काय गप्प बसणार आहे’ काय. विकासकामांसाठी आम्ही सरकारला काही स्वस्थ बसू देणार नाही असं विधान करत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला. खडसे मलकापूर येथे भाजपा उमेदवार चैनसुख सांचेतींच्या प्रचारासाठी आले होते.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला वाळव्यात मोठा धक्का 

राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना पाठींबा दिला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष सुधीर पिसे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे पुत्र सतेज पाटील, उरूण विकास सोसायटीचे संचालक शिवाजी पाटील, माजी नगरसेवक फारूख इबुशे, मुनीर इबुशे यांच्यासह उरूण परिसरातील पाटील, जाधव, मोरे, कोरे भावकीतील प्रमुखांनी इस्लामपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर पाठींबा दिला.

अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचा खुलासा

कर्नाटकचे पाणी जतला मिळाले पाहिजे. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी कर्नाटकचे पाणी जतला देणार म्हणतात. ते शक्य वाटत नाही. दोन्ही राज्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे याबाबतीत मौन आहे. त्यामुळे भाजपचे हे खोटे आश्वासन ठरणार असल्याचा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी पत्रकार बैठकीत केला. तर अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे महापूर आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

धनगर समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला धडा शिकवा – मुख्यमंत्री सिध्दरामय्या

धनगर समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. मात्र पाच वर्षात त्यांनी आरक्षण दिले नाही. त्यामुळे भाजपबद्दल समाजबांधवांच्या मनात द्वेेष निर्माण झाला पाहिजे. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री हे खोटारडे आहेत. ते समाजाला आरक्षण देणार नाहीत. समाजाचा अपमान करणाऱ्या भाजपला समाजबांधवांनी मतदान करू नये, देशाच्या एकात्मतेसाठी कॉंग्रेसला मतदान करावे, असे आवाहन कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ धनगर मेळाव्याचे आयोजन वारणा मंगल कार्यालयात केले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला रामहरी रूपनवर, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली !’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आता दिसत आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.