पालघर जिल्ह्यात सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात

पालघर जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजल्या पासून मतदानाला सुरवात झाली आहे. जिल्यात एकूण एकूण-19 लाख 51 हजार 668 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यातील नालासोपारा विधान सभेत 2 लाख 86 हजार 4 पुरुष, तर 2 लाख 33 हजार 20 स्त्रिया आणि  इतर- 58 असे  एकूण-5 लाख 19 हजार 82 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदान करणाऱ्यांना सरकारकडून सर्वात जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार – मुख्यमंत्री फडणवीस

मतदान केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे’ नागरिकांना आवाहन केले. तसेच ‘प्रत्येकाला सरकारकडून अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे.’ मतदान करणाऱ्यांना सर्वात जास्त अधिकार आहे. सर्वांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करावं’ असे आवाहन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे

भंडाऱ्यात मतदानाला सुरवात, १० लाख मतदार बजावणार हक्क

आज राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान होत असून, सकाळी सात वाजल्यापासून राज्यात सर्वत्रच मतदानाला सुरवात झाली आहे. भंडारा जिल्हातील तीन मतदार संघात १ हजार २०६ मतदार केंद्र आहेत. तर या मतदार संघात एकूण ९ लाख ९१ हजार ८९० मतदार आपल्या मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. नागरिकांना मतदान व्यवस्थित करता यावे तसेच कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने ५ हजार २०२ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २ हजार ३७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

१०० टक्के मतदान झालं पाहिजे – मोहन भागवत

मतदानानंतर मोहन भागवत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांना निवडणुकीच्या मतदानाचे महत्व समजावून सांगितले आहे. तसेच १०० टक्के मतदान हे झाले पाहिजे असं देखील आवाहन केले आहे.

केंद्रीय मंत्री संजय धोत्रेंची सभा रणजित पाटील समर्थकांनी उधळली

अकोला प्रतिनिधी । अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभेचे उमेदवार हरीष पिंपळे यांनी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढले होते. याचाच जाब केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांना रणजित पाटील समर्थकांनी त्यांना विचारला. यातून एकच गोंधळ उडवत पाटील समर्थकांनी अखेर धोत्रेंची सभा उधळली. पिंजर इथं आयोजित सभेत हा सर्वप्रकार घडला.

‘पैसे वाटताना जर कोणी दिसलं तर हातपाय तोडू’- संदीप क्षीरसागर

‘प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा. अन्यथा आम्हाला जर कोणी पैसे वाटताना दिसले तर त्याचे सरळ हातपाय तोडू’ असा इशारा बीड मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी दिला. बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरात पैसे वाटप करणाऱ्या सुरेश बन्सोडे यांस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यावेळी प्रशासनाला दमदाटी करत क्षीरसागर यांनी स्फोटक वक्तव्य केलं.

निवडणूक निशाणी असलेल्या ‘हेलिकॉप्टर’मधूनच अपक्ष उमेदवाराने केला प्रचाराचा समारोप

ज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता. परभणीत सर्वच उमेदवारांनी मैदानात उतरत रॅली काढत चारही विधानसभा मतदार संघात मोठं शक्तिप्रदर्शन केल. त्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांना आपल्याकड आकर्षित करण्यासाठी, उमेदवारांनी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या. गंगाखेड विधानसभेतील संतोष मुरकुटे या अपक्ष उमेदवाराने तर, आपली निवडणूक निशाणी असलेल्या हेलिकॉप्टर मधूनच, प्रचार करत आजच्या प्रचाराचा समारोप केला.

पंकजा मुंडे भोवळ येऊन अचानक स्टेजवरच कोसळल्या

बीड प्रतिनिधी । आपल्या धडाकेबाज प्रचाराने आपल्या प्रशासकीय विभागासह महाराष्ट्रभर झंझावाती प्रचार करणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडेंना मागील महिनाभरात महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं आहे. प्रचार दौऱ्यांचं व्यस्त वेळापत्रक पाहता तब्येतीकडं थोडंफार दुर्लक्ष होणं साहजिक होतं. याचाच प्रत्यय आज पंकजा मुंडेंना आला.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा घेतानाच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना चक्कर आल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळाली. जवळपास १० मिनिटे बेशुद्धावस्थेत असल्याने उपस्थित लोकांमध्ये चिंतेचं वातावरण पहायला मिळालं. हातातील कापड, ओढणी, रुमाल फिरवून पंकजा मुंडेंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत होते.

अखेर वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर कार्यकर्त्यांसहित पंकजा मुंडेंनीही सुटकेचा निश्वास टाकल्याचं पहायला मिळालं.  दरम्यान भाजप नेते नितीन गडकरींनाही अशाच प्रकारची भोवळ मागील वर्षभरात दोन ते तीन वेळा आल्याचं निदर्शनास आलं होतं. पंकजा मुंडे यांना नक्की कशामुळे भोवळ आली हे अद्यापही समजू शकलं नाही.

Pankaja Munde | पंकजा मुंडे यांना भाषण करताना आली चक्कर

परभणी जिल्ह्यात प्रचार तोफा थंडावल्या…

विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २१ ऑक्टोबर रोजी राज्यभरात पार पडणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निकालापर्यंत पारदर्शीपणे पार पाडावी, मतदात्यांना निर्भयपणे मतदान करता यावे आणि कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही या दृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.

नितेश राणेंच्या प्रचारात ‘तडीपार’ आरोपी सहभागी; शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा आरोप

राज्यातील विविध भागांतील हद्दपार झालेले आरोपी नितेश राणे यांच्या प्रचारात सहभागी आहेत. आणि ते राजरोसपणे पैसे वाटण्याचे काम करत आहेत असा आरोप सतीश सावंत यांनी केला. सावंत यांच्या आरोपानंतर मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.