कोल्हापूर जिल्ह्यात ‘आघाडी’ची जोरदार मुसंडी; ‘युती’च्या दिग्गजांना मोठा धक्का

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळ पासून सुरुवात झाली आहे. या मतमोजणीनंतर २८८ जागांचे कल हळूहळू समोर येत आहेत. ‘युती’ ने मतमोजणीमध्ये जोरदार मुसंडी मारली असली तरी ‘आघाडी’ सुद्धा सर्वांना काटे कि टक्कर देताना दिसत आहे. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कोल्हापूर जिल्हा मतदारसंघाचे सुद्धा निकाल समोर आले आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके आघडीवर दिसत आहेत. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार पी एन पाटील पिछाडीवर पडलेले आहेत. काँग्रेस साठी महत्वाचा असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी जोरदार आघाडी घेतलेली दिसत आहे. टायच्या विरोधात उभे असलेले भाजपाचे अमल महाडिक पिछाडीवर पडलेले आहेत.

‘या’ ७ जागांवर मतदान झाल्यानंतरच निकाल स्पष्ट झालाय..!!

राज्यात चुरशीच्या ठरतील अशा काही लढती आहेत, त्याच पद्धतीने सोपा विजय मिळेल अशाही काही जागा आहेतच.

बिग फाईट्स – महाराष्ट्रातील ‘या’ ६ जागांकडे सगळ्या जनतेचं लक्ष

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या जाहीर होतील. निकालानंतर कुणाची दिवाळी साजरी होणार आणि कुणाचं दिवाळ निघणार हे स्पष्ट होईलच. वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल असं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत राज्यातील काही भागांत घटलेली मतदानाची टक्केवारीसुद्धा मतदारांमधील निराशा दाखवून देत असताना राज्यातील काही जागांबाबत मात्र जनतेने विशेष रस घेतल्याचं पहायला मिळत आहे. या ६ जागांपैकी ५ जागा पश्चिम महाराष्ट्रातीलच आहेत. याचं कारण हे शरद पवार या एका व्यक्तिभोवती फिरतंय का? हे खालील माहिती वाचून तुम्हांला समजेलच..!!

आम्हाला लै कॉन्फिडन्स हाय,निवडून येनार तर रोहित दादाच! कार्यकर्ते जोमात

विधानसभा निवडणुकीत अत्यंत अटीतटीच्या झालेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे राम शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांच्यात दुरंगी लढत झाली. निवडणूकीच्या निकालासाठी काही तसाचा अवधी राहिलेला असताचा कर्जत जामखेड तालुक्‍यात रोहित पवार प्रचंड मतांनी निवडून आले असल्याचे डिजिटल फलक उत्साही कार्यकर्त्यांनी आधीच लावले आहेत. तर काही कार्यकर्त्यांनी डिजेसाठी ऍडव्हान्स दिला असुन काहींनी थेट सट्टा लावला आहे.

‘नितेश ५० हजार मतांनी निवडून येणार ‘- नारायण राणे

विधानसभा निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया गुरुवारी सकाळी ८ वाजता सुरु होणार आहे. निवडणूक निकालापूर्वी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. एकीकडे उमेदवारांमध्ये निकालाची धाकधूक आहे तर, दुसरीकडे आमदारकीच्या या परीक्षेमध्ये कोण पास होणार कोण नापास होणार,हे चित्र उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल. दरम्यान नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे निवडून येणार असल्याचं भाकितं केलं.

कर्जत-जामखेडमध्ये निकालाआधीच रोहित पवार जनतेच्या ‘फोटोतील’ आमदार

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात झालेली लढत महाराष्ट्रातील सर्वात जास्त चुरशीची लढत मानली गेली. या मतदारसंघातून भाजपचे राम शिंदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार अशी दुरंगी लढत पहायला मिळाली. निवडणूकीच्या निकालासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना कर्जत जामखेड तालुक्‍यात रोहित पवार प्रचंड मतांनी निवडून आल्याचे डिजिटल फलक उत्साही कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

राजकारण्याच्या पटलावरुन पारंपरिक पेहरावातील पुढारी कालबाह्य

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागतील आणि 288 नेते आमदार होऊन विधानसभेमध्ये दाखलही होतील. आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत महत्वाचा वाटा असणाऱ्या नेत्यांच्या पेहरावातही बदल झाल्याचं दिसून येत आहे. पूर्वी नेता म्हटलं की सामान्य माणसांना खादीचे, स्टार्च केलेले पांढरे शुभ्र कपडे घातलेले नेते अशी प्रतिमा दिसायची. त्यामध्ये धोती,कुर्ता, डोक्यावर कडक गांधी टोपी … Read more

उद्या सकाळी ८ पासून ‘मतमोजणी’ सुरुवात; उमेदवारांसह कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढली

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आता सर्वांना निवडणूक निकालाची उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्रात पुन्हा आघाडीला धोबीपछाड देत युती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.