महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही – देवेंद्र फडणवीस 

वृत्तसंस्था । राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते सातत्याने होत राहतात. आपल्या विरोधकांच्या चुका शोधणे, त्या सातत्याने लोकांसमोर विविध माध्यमातून मांडत राहणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मग कोरोना संकटकाळात तर अशी संधी कोण कशी सोडेल? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना सुरु झाल्यापासून सध्याच्या सरकारच्या चुकांचा पाढाच वाचत आहेत. त्यातच … Read more

चौथ्या लॉकडाउनमध्ये सरकारचे नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारने आतापर्यंत एकूण 4 लॉकडाऊन जाहीर केले आहेत. आता चौथा लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेचे मात्र कंबरडे मोडले आहे. ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारने काही नियम शिथिल केले होते. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने … Read more

औरंगाबादेत शीघ्र कृती दलाची तुकडी दाखल ; गर्दीचे नियमन करण्यास होणार मदत

औरंगाबाद प्रतिनिधी l लॉकडाऊनच्या काळात पोलिसांच्या मदतीला आता शीघ्र कृती दलाला पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे 120 जणांची एक तुकडी शहरात दाखल झाली आहे. त्यामुळे आता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांना चांगलीच चपराक बसणार आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. जिल्हा प्रशासन वारंवार नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना करीत आहेत. मात्र तरी देखील नागरिक ठीक-ठिकाणी … Read more

विदर्भात मान्सून वेळेवरच दाखल होणार ; हवामान खात्याचा अंदाज

अमरावती प्रतिनिधी l बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वाटचालीकरिता पोषक आहे. आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून … Read more

मुंबईत ८ बेस्ट कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मुंबई हे शहर कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या शहरांपैकी एक आहे. येथे कोरोना विषाणूमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच मोठ्या संख्येने लोकांना कोरोना विषाणूची लागणही झालेली आहे. यादरम्यानच, आता मुंबईतील बेस्ट बस सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. खरं तर, कोरोना विषाणूमुळे बेस्टच्या ८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, … Read more

जमिनीवर झोपले होते रुग्ण; भाजपच्या राम कदमांनी शेयर केला व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील किंग एडवर्ड मेमोरियल या हॉस्पिटलचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शुक्रवारी सकाळी काही रुग्ण जमिनीवरच झोपी गेलेले दिसत आहेत. भाजपचे नेते राम कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटद्वारे हा व्हिडिओ शेअर केला आहे. या रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेडच उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यांना जमिनीवरच झोपावे लागले, असा आरोप या भाजप … Read more

राज्यात CRPFच्या २० कंपन्या पाठवा; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मुंबई । राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या २० कंपन्या पाठवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडं केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली. राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जवळपास गेले दोन महिने राज्यातील पोलीस अहोरात्र कार्यरत आहेत. लॉकडाऊनचे नियम कठोरपणे राबवण्याची जबाबदारी सांभाळतानाच पोलिसांना कायदा व सुव्यवस्थेकडंही लक्ष द्यावं लागत आहे. त्यामुळं त्यांच्यावर … Read more

सांगली जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्यानंतर प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली मिरज आणि जत तालुक्यातील अंकलेत मध्ये आणखी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला, सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिला तर अंकले येथील … Read more

क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बामणोली येथील दादासो अण्णा फोंडे यांच्यासह कुटुंबियांना संस्था कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. घर बंद असल्याचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यानी बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोक रक्कम ३३ हजार असा एकूण ६३ … Read more

‘या’ गोष्टींवर मंत्र्यांनी दर्शवली तीव्र नाराजी; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

मुंबई । आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासन बऱ्याच मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रशासनाविरोधात तक्रार केली. ज्या पद्धतीने प्रशासनातील अधिकारीवर्ग परस्पर निर्णय घेत आहे आणि राबवताना घोळ घालत आहे, याबाबत मंत्र्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करताना प्रशासनात नसलेले समनव्य, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्याकडून परस्पर निघत असलेले आदेश आणि निर्णय … Read more