संभाजी भिडे आम्हाला गुरुजी वाटतात, तुम्हाला काय हरकत आहे? फडणवीस विरोधकांवर आक्रमक

Devendra Fadnavis Manohar Bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात देखील उमटताना दिसत आहेत. विरोधकांनी मनोहर भिडे यांच्या अटकेचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात चांगलाच उचलून धरला आहे. यामध्येच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोहर भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा केल्यामुळे विरोधकांनी अधिवेशनात चांगलाच गोंधळ घातला. … Read more

मनोहर भिडेची मिशी कापा आणि 1 लाख रुपये जिंका; कोणी केली घोषणा

sambhaji bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संपादक मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच पेटलेले आहे. मनोहर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात देखील दिसायला सुरुवात झाली आहे. समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी यानंतर मनोहर भिडे यांची मिशी कापणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस … Read more

अखेर संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल; महात्मा गांधींविरोधात वक्तव्य करणे पडले महागात

Sambhaji Bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर अमरावती राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता भिडे यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. संभाजी भिडेंनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांकडून करण्यात आली होती. तसेच ठिकठिकाणी भिडेंविरोधात निदर्शने करण्यात आली … Read more

“महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार..” संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

mahatma gandhi, sambhaji bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान संस्‍थेचे संस्‍थापक संभाजी भिडेंची (Sambhaji Bhide) जीभ पुन्हा घसरली आहे. अमरावतीच्या एका कार्यक्रमात भिडे यांनी थेट महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संभाजी भिडे आता वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्याविरोधात राज्यांतील काही … Read more

महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रपिता महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे कोल्हापुरात आज निधन झाले. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज कोल्हापूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी हे कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र असून 14 एप्रिल 1934 रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म … Read more

महात्मा गांधींना मारण्यासाठी सावरकरांनी गोडसेला बंदूक पुरवली; गांधीजींच्या पणतूचा गंभीर आरोप

Tushar Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. अशात आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांबाबत एक ट्विट केले आहे. “सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली,” असा ट्विटद्वारे गांधी यांनी … Read more

राहुल गांधींनी उपस्थित केला महात्मा गांधींच्या हत्येचा मुद्दा; म्हणाले की..

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । सध्या भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी गांधीजींच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत गांधींची हत्या करणाऱ्या विचारसरणीविरोधात आपला लढा सुरूच आहे असं म्हंटल आहे. तसेच सत्तेत असलेल्यांना महात्मा गांधींचा वारसा बळकावणे सोपे आहे, पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकणे अवघड … Read more

… म्हणूनच गांधीजींसारखा बहुदा दुसरं कोणी होणे नाही; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज 2 ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंती… याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटर वर पोस्ट करत महात्मा गांधींबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. गांधीजींचा प्रभाव असा काही पसरत गेला की, फक्त भारतच नव्हे तर जवळपास तीन खंडातील देशांमध्ये स्वातंत्र्याची आस जागृत झाली आणि ब्रिटिश राजवटीचा सूर्य मावळला. पण जे गांधीजींना … Read more

साबरमती : गांधीनीतीची प्रयोगशाळा…

Mahatma Gandhi

महात्मा गांधी जयंतीविशेष | विनायक होगाडे साबरमती… राजस्थानातून उगम पावून गुजरातमधून अरबी समुद्राच्या कुशीत विलीन होणारी नदी…! गुजरात राज्याची महत्वाची दोन शहरं म्हणजे अहमदाबाद आणि गांधीनगर… याच साबरमती नदी किनारी वसलेलं अनुक्रमे एक व्यापारी शहर तर दुसरं राजकिय…! दोन्ही शहरं म्हणजे गुजरात राज्याची फुप्फुसं…! अहमदाबादमध्ये उतरलो त्याक्षणापासून या शहराचं महत्व पदोपदी जाणवत होतं. कापड उद्योगात … Read more

मजबूती का नाम “गांधी”

गांधी

गांधी जयंती विशेष | आकाश सुलोचना शेंबड्या मुलापासून ते विचारी समजल्या जाणाऱ्या गृहस्थापर्यंत, सर्वांनी गांधीला यथेच्छ शिव्या हासडताना मी पाहिले आहे. मी दलित समाजात साचलेला गांधी बद्दलचा द्वेष पाहीला आहे. मी गांधीवरून तरुणांची टिंगलटवाळकी पाहिली आहे. पण जेव्हा ही सर्व अहंकारी, द्वेषपूर्ण, अतिशयोक्ती पूर्ण व भडक आवरणे काढून मी गांधींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा … Read more