शेतीच्या नुकसान भरपाईसाठी तरुणाचे थेट सलीम अली सरोवरात जलसमाधी आंदोलन

samadhi

औरंगाबाद – औरंगाबाद तसेच परिसरात सप्टेंबर महिन्यात तीनदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालं आहे. मेहनतीने वाढवलेली पिकं हाता-तोंडाशी आली असताना आसमानी संकटानं सारं काही हिरावून नेलं. मात्र सरकरानं अद्याप नुकसान भरपाईसाठी कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाच वातावरण आहे. यातूनच औरंगाबादमधील एका शेतकऱ्याने नुकसान भरपाई मिळावी, यासाठी मंगळवारी जलसमाधी आंदोलन केलं. अतिवृष्टीमुळे शेतीचे … Read more

नगरहून येणाऱ्या नागरिकांची होणार कोरोना चाचणी, जिल्ह्याच्या सीमेवर उभारणार तपासणी केंद्र – जिल्हाधिकारी

Corona Test

  औरंगाबाद – मागील दीड वर्षापासून संपूर्ण जगात कोरोना विषाणूने कहर केला आहे. पहिली व दुसरी लाट ओसरल्यानंतर आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. असे असतानाच शेजारच्या अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढल्याने 61 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. येथील रुग्णांचा संसर्ग औरंगाबाद जिल्ह्यात होऊ नये, यासाठी नगर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची कोरणा तपासणी केली जाणार … Read more

शाळा सुरू परंतु महाविद्यालये अद्यापही बंदच ! पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

School will started

औरंगाबाद – कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून शिक्षणाची मंदिरे शासनाने बंद करून ठेवली आहेत. पहिल्या लाटे नंतर काही दिवस ही मंदिरे उघडण्यात आली होती. परंतु, त्यानंतर दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातल्याने पुन्हा ही मंदिरे लॉकडाउन करण्यात आली होती. परंतु आता राज्यातील स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने बारावी पर्यंतच्या शाळा चार ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. … Read more

शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

karad

औरंगाबाद – अतिवृष्टीने आणि सततच्या पावसाने पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले आहे. शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी राज्य शासनाने तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केली. ते काल अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कन्नड येथील भागाच्या पाहणी दौऱ्यावर गेले होते. यावेळी करडांना कुठे चिखल तुडवावा लागला … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार – राज्यमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवुन देण्यास प्रयत्न करणार असल्याचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतपिकांचे नुकसान, जीवतहानी तसेच देण्यात येणाऱ्या तातडीच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. … Read more

सावधान ! औरंगाबादेत पुढील चार दिवस विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

Aurangabad Rain

औरंगाबाद – परतीच्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्याला मुसळधार पावसाला अजूनही सामोरे जावे लागत आहे . मराठवाड्यातील विविध भागात सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश दिसतो. काही काळ ऊन राहते. पण दुपारनंतर ऊन-पावसाचा खेळ सुरु होतोय. वातावरण पूर्णपणे स्वच्छ असतानाच अचानक झाकोळून येतं आणि ढगांचा प्रचंड गडगडाट ऐकू येतो. क्षणात पावसाला सुरुवात होते. त्या पाठोपाठ वीजांचा कडकडाट सुरु होतो. … Read more

राज्यातील हे सरकार झोपलेलं; सरकारला जगू देणार नाही”; फडणवीसांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भ तसेच मराठवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नद्याना आलेल्या पुरात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीवरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे सक्त आले आहे. आम्ही जोपर्यंत तुम्हाला मदत मिळत नाही तोपर्यंत या सरकारला जगू देणार नाही. हे सरकार … Read more

मुख्यमंत्री ठाकरेंना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ नाही; रावसाहेब दानवेंनी घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भासह मराठवाडा येथे मोठ्या प[र्मानात नुकसान झाले आहे. या ठिकाणी भाजप नेत्यांकडून भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली जात आहे. नुकसान भरपाईबाबत राज्य सरकारकडून मदत देण्यात आली नसल्याने यावरून भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “आज राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांकडे जाण्यासाठी वेळ … Read more

विरोधी पक्षनेते जरा उशीराच जागे झाले; जयंत पाटलांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतीचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नुकसानीची भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून दोन दिवसांपासून पाहणी केली जात आहे. त्यांच्या पाहणी दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला. “विरोधी पक्षनेते जरा उशीराच जागे झाले. महापुरानंतर प्रस्थान … Read more

अन्यथा, शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी येणार आहे. यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी इशारा दिला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत मदत द्यायची असेल तर द्या, पूरग्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा का करताय. चेष्टा कराल तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही, असल्याचा इशारा … Read more