जालना-नांदेड बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांनी लिहिले मोदींना पत्र

bullet train

औरंगाबाद – नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाला जालना-नांदेड समृद्धी महामार्गाने कनेक्ट करण्यात आले आहे. त्याचे भू-संपादन वेगवान पद्धतीने सुरू आहे. आता याच मार्गावर नागपूर- मुंबई बुलेट ट्रेनचा प्रयत्न हाेताे आहे. ताेच पॅटर्न बुलेट ट्रेनसाठी जालना- नांदेड मार्गावरही वापरावा, अशी मागणी आहे. या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना नुकतेच रीतसर पत्र … Read more

मराठवाड्यावर अवकाळी पावसाचे सावट; शेतकरी पुन्हा अडचणीत

Farmer waiting for Rain

औरंगाबाद – मराठवाडा, विदर्भात 19 व 20 फेब्रुवारी रोजी पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे रबी हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारी विभागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. उत्तर केरळपासून मराठवाडा ते विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने ईशान्येकडील वाऱ्यांमुळे वातावरणात बदल झाला आहे. परिणामी, राज्यासह मराठवाडा, विदर्भात … Read more

भरदिवसा कोयत्याने सपासप वार करून विद्यार्थ्याचा खून

लातूर – इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यावर भरदिवसा कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. लातुरातील विशाल नगर भागात असलेलया श्री साई मंदिर लगत भर रस्त्यावर विद्यार्थ्यावर हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, … Read more

माणुसकीला काळीमा ! खुन करून गळ्याला दोरी बांधून मृतदेह नेला फरफटत

बीड – महिलेचा दगडाने ठेचून खून केल्यानंतर गळ्यात दोरी बांधून मृतदेह शंभर फुटांपर्यंत फरपटत नेला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा थरार शुक्रवारी मध्यरात्री जिल्ह्यातील केज तालुक्यातील हंगेवाडी घडला. या खुनातील आरोपी मात्र अद्यापही फरार आहे. सखुबाई बन्सी शिंदे (60, रा. हंगेवाडी, ता. केज) असे मयत महिलेचे नाव आहे. हंगेवाडी शिवारातील गायरानात काही पारधी कुटुंबे वास्तव्यास … Read more

शिक्षकाने स्वतः चा फोटो ग्रुपमध्ये टाकून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिले अन्…

लातूर – जिल्हा परीषद शाळेतील सहशिक्षकाने व्हाॅट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो व भावपूर्ण श्रध्दांजली ची पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची घटना काल जिल्ह्यातील चाकूर येथे घडली आहे. चाकूर येथील जिल्हा परीषद मुलांच्या शाळेत सचिन शिवराज अंबुलगे (40) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते, शहरातील आदर्श काॅलनीतील एका भाड्याच्या खोलीमध्ये ते कुटुंबीयासह राहत होते. त्यांच्या पत्नी व मुलगा हे … Read more

अहो आश्चर्यम् ! नगरपंचायतीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला मिळाले चक्क शून्य मत

औरंगाबाद – काल राज्यात पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये अनेक जण एका मताने निवडून आले, तर अनेक उमेदवारांना एका मताने पराभव पत्करावा लागला. एवढेच काय तर मोठ्या राजकीय नेत्यांच्या पॅनलचे डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याचे आपण पाहिले. आता याहीपेक्षा कहर म्हणजे बीडच्या शिरूर नगरपंचायतमध्ये चक्क काँग्रेसच्या एका उमेदवाराला शून्य मत मिळालं आहे. फकीर शब्बीर बाबू असं या … Read more

औरंगाबादेत ओमिक्रॉनच्या एका रुग्णाची वाढ तर परभणी जिल्ह्यातही झाला शिरकाव

औरंगाबाद – औरंगाबादेत काल एका रुग्णाला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे निदान झाले असून, परभणी जिल्ह्यातली ओमायक्रॉनने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या दोन रुग्णांचे निदान झाले आणि मराठवाड्यातील आणखी एका जिल्ह्याचा ओमायक्रॉनच्या यादीत समावेश झाला आहे. याचबरोबर औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंत आढळलेल्या एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता 20 झाली आहे. तर मराठवाड्यातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 42 झाली … Read more

नगरपंचायत निवडणुक: मराठवाड्यात काठावर फुलले ‘कमळ’ !

BJP Flag

औरंगाबाद – मराठवाड्यातील नगरपंचायत निवडणुकीत काठावर का होईना कमळ फुलल्याचे दिसून आले आहे. 23 पैकी सर्वाधिक 6 नगरपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसकडे 5, शिवसेनाकडे 4, काँग्रेस 3 तर बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एका नगरपंचायत स्थानिक आघाडीने यश मिळवले. उर्वरित ठिकाणी मात्र त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील एकूण 391 पैकी सर्वाधिक … Read more

‘मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरू करा’; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

औरंगाबाद – कोरोनाची भिती घालून फक्त शाळाच बंद केल्या आहेत. बियर बार सुरू, बाजार सुरू, मंदिरे सुरू, सिनेमा गॄह सुरू मग आमच्या शाळाच बंद का ? असा प्रश्न उपस्थित करत अडाणी पिढी तयार होण्यापूर्वीच शाळा सुरू करा आणि आमचे अडाणीपण घालवा अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता देता पोलिसांच्या नाकीनऊ … Read more

बाभळीच्या झाडाला भरधाव कार धडकली; दोन ठार

बीड – परळीकडुन भरधाव वेगात येणाऱ्या कारची बाभळीच्या झाडाला जोरात धडक बसुन आज दुपारी झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यात गाडीचा पूर्ण चक्काचुर होऊन, मृत व जखमींना जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी कारने (एमएच 13 सीके 0441) भोकर येथून तेलगावमार्गे … Read more