बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर मंदिरात अत्याचार : बापलेकावर गुन्हा दाखल

ratnagiri rape

खंडाळा | दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. एका मंदिरातच 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना खंडाळा तालुक्यातील एका गावात घडली होती. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील एका गावातील बारा वर्षांची मुलगी 9 जानेवारी रोजी … Read more

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी

कराड | तालुक्यातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला दुचाकीवरुन शिवारात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी 54 वर्षीय आरोपीला 20 वर्ष सक्तमजुरी आणि 22 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. कराड न्यायालयात जिल्हा व विशेष न्या. के. एस. होरे यांनी गुरूवारी ही शिक्षा सुनावली. संजीव बाबुराव चव्हाण (वय -54) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. … Read more

मतिमंद अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपींची संख्या वाढली

पाटण | पाटण येथील मतीमंद अल्पवयीन मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस गेल्या आठवड्यात उघडकीस आलेली होती. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी … Read more

भयानक : अल्पवयीन, मतिमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी 9 जणांना पोलीस कोठडी

पाटण | पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात … Read more

पाटणला अल्पवयीन मुलीवर 8 जणांकडून वारंवार बलात्कार : गुन्ह्यात महिलेचाही सहभाग

Patan Police Staion

पाटण | पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. या संतापजनक घटनेमुळे पाटण तालुका हादरला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

10 वी च्या मुलीने जुन्या कोयना पुलावरून उडी घेतली; तरूणांनी धाडसाने ‘असे’ वाचविले प्राण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरातील एका 10 वी च्या विद्यार्थिनीने बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जुन्या कोयना पुलावरून उडी घेतल्याची घटना घडली. पुलावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या मुलीला दोन मुलांनी धाडसाने वाचविले आहे. या मुलांच्या धाडसाचे कौतुक नागरिकांच्यातून केले जात आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आज बुधवारी दि.16 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास … Read more

होस्टेलमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी

rape

कराड | तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी रणजित अशोक उर्फ बाळासो देशमुख (रा.सिद्धेश्वर कुरोली, ता. खटाव) याला दोषी धरून कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती होरे यांनी त्याला 10 वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. याबाबत अधिक … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या फरार आरोपीस अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने वेळोवेळी बलात्कार केल्याची घटनेची नोंद झाली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्याने संशयित फरार झाला होता. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि रविंद्र तेलतुमडे आणि टिमने उघडकीस आणल्याने खळबळ उडाली आहे. यातील पळून गेलेल्या आरोपीला … Read more

व्हिडीओ व्हायरल : सुरूर येथे स्मशानभूमीत मांत्रिकाकडून अघोरी पूजा

वाई | सुरूर ता. वाई हे गाव धावजी पाटील या मंदिरामुळे राज्यात प्रसिद्ध असून या मंदिरात काही तांत्रिक मांत्रिक गोष्टी घडत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्याने येथील पूजा-यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र आता चक्क सुरूर येथील स्मशानभूमी या मंदिरापासून काही अंतरावरच आहे. या स्मशानभूमीत मात्र अघोरी प्रकार घडला आहे. या स्मशानभूमीत एका लाल शर्ट घातलेल्या … Read more

आरोपी कोणत्या पक्षाचे असले तरी कठोरात कठोर शिक्षा होईल : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

Untitled deShamburaj Deasi Satarasign - 2021-09-24T163640.869

महाबळेश्वर प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथे घडलेला प्रकार अतिशय निदंनीय आहे. या प्रकरणात जो कोणी आरोपी आहे, त्याच्यावर कठोरात कठोर शिक्षा होईल. आरोपी कोणत्या पक्षाचे किंवा कुठले आहेत, यांच्याशी पोलिसांचे काही काम नाही. गृहविभाग योग्य पध्दतीने काम करेल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महाबळेश्वर येथील अल्पवयीन मुलीने एका बालकाला जन्म दिला आहे. … Read more