PSI : कोळे येथील आकाशी चव्हाणचा राज्यात डंका

कराड | वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून कठोर परिश्रमातून आकाशीने पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाला गवसणी घातली. कोळे येथील आकाशी अरुण चव्हाण हिने मुलींमध्ये राज्यात 12 वा क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा तोंडावर असताना 2019 साली वडिलांचे अपघाती निधन झाले. तरीही आकाशी हिने जिद्द सोडली नाही. वडिलांच्या निधनाचे दुःख विसरून कठोर परिश्रमाच्या बळावर … Read more

MPSC चा पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांचे आंदोलन; आयोग म्हणत पेपर फुटलाच नाही

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात आज MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ पार पडत आहे. मात्र याच परीक्षेचा पेपर फुटला असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. याच घटनेचा निषेध म्हणून नागपूरमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले आहे. मात्र त्यानंतर एमपीएससी आयोगाने मात्र ट्विट करत पेपर फुटलाच नाही असे स्पष्टीकरण दिले. विद्यार्थी काय म्हणतात- एमपीएससी पेपर फुटला असा आरोप … Read more

नोकरीची सुवर्णसंधी !! MPSC मार्फत 547 पदांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 547 पदांसाठी अर्जप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शासनाच्या गृह विभागाच्या आस्थापनेवरील सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गातील 547 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अर्जप्रक्रिया ही ऑनलाइन असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2022 आहे. एकूण पदे – ५४७ पात्रता – कायद्याची पदवी … Read more

सातारा जिल्ह्यात नववर्षात 26 महाविद्यालयात संचारबंदी : जाणून घ्या कारण

सातारा | राज्य सेवा पूर्व परीक्षा- 2021 साठी रविवार 2 जानेवारी 2022 रोजी सातारा, कोरेगाव, कराड या तालुक्यातील 26 विद्यालय, महाविद्यालयांमध्ये होणार आहे. दि. 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी 8 ते सायं. 6 वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या उपकेंद्राच्या परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात अप्पर जिल्हादंडाधिकारी सुनिल थोरवे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड … Read more

MPSC कडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी होणार पूर्व परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात स्पष्ट होणार आहे. तर मुख्य परीक्षा 7 ,8, 9 मे रोजी होणार असून या परीक्षेचा … Read more

MPSC परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी परीक्षा देता आल्या नाही त्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.  अनेक विद्यार्थ्यांची ही मागणी होती, त्यानुसार सरकारने हा … Read more

अभिनंदनीय : MPSC परिक्षेत कराडचा प्रसाद चाैगुले राज्यात पहिला

कराड | राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सन 2019 रोजी झालेल्या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी गावच्या प्रसाद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2019 रोजी 17 फेब्रुवारी 2019 ला मुंबईसह अन्य 37 केंद्रावर घेण्यात आली होती. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या … Read more

एमपीएससीची मुख्य परीक्षा 4 डिसेंबरला; या ‘6’ केंद्रावर होणार परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 4 डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळापत्रक जारी केलं आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावं, असे देखील आयोगाकडून सांगण्यात आलं आहे मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या … Read more

UPSC, MPSC च्या पल्याडही भलं मोठं जग आहे; आयुष्यात करण्यासारखं खूप काही आहे…

पुणे : सध्या स्पर्धा परिक्षा आणि त्यांची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या अनुषंगाने विविध माध्यमांत चर्चा सुरु आहेत. लवकर न निघणारी भरती, वाढत जाणारं वय, पोस्टपोन होणार्‍या परिक्षा, यामुळे येणारा तणाव या विषयांवर आपण अनेक मतमतांतरे ऐकत असतो. मात्र HELLO महाराष्ट्र आणि करिअरनामा घेऊन आलेत स्पर्धापरिक्षेला हलकंफुलकं कसं घ्यावं? यावर हलक्या फुलक्या गप्पांचा विशेष कार्यक्रम. “UPSC, … Read more

सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नीलचा मृत्यू; पडळकरांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज स्वप्नीलच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्नीलचा मृत्यू … Read more