महेंद्रसिंग धोनीला आम्ही आजही मिस करतो, बसमधील त्याच्या जागेवर कुणीच बसत नाही..

महेंद्रसिंग धोनीने आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला त्याला आता सहा महिन्यांतून अधिक काळ लोटला. विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध धोनी आपला शेवटचा सामना खेळला होता. या महिन्यातच महेंद्रसिंग धोनीला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळल्यामुळे धोनी आता निवृत्ती घेणार का? या चर्चांना बराच ऊत आला आहे.

बीसीसीआयने दिले धोनीच्या निवृत्तीचे संकेत; वार्षिक करारातून धोनीचे नाव वगळले

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी जुलै २०१९ पासून भारतीय क्रिकेट संघातून बाहेर आहे. धोनीनं शेवटचा समान विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला. बऱ्याच महिन्यापासून धोनी संघाबाहेर असल्याने त्याच्या निवृत्तीबाबत कयास लावले जात आहे. दरम्यान आज याबाबत एक महत्वाची बातमी समोर आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात झेप घेतली नाही त्याचं अजूनही दुःख, महेंद्रसिंग धोनीचा भावनिक खुलासा..!!

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि खिलाडूवृत्ती अंगी असलेल्या महेंद्रसिंग धोनीसाठी विश्वचषक जिंकणं हे कधीच अंतिम ध्येय नव्हतं. तो शांत डोक्याने खेळत राहिला, निर्णय घेत राहिला आणि खेळाचा आनंद लुटत राहिला. एवढं असलं तरी…त्या २ इंचाची उणीव धोनीला कायम सलत राहील एवढं मात्र खरं..

धोनीला मागे टाकत कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या टी-२० सामन्यात जलद हजार धावा पूर्ण

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या आणखी एका रेकॉर्डला गवसणी घातली आहे. यावेळी विराटने माजी कर्णधार महिंद्रसिंग याला मागे टाकत कर्णधार म्हणून टी-२० सामन्यात सर्वात जलद धावा पूर्ण करत रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे.

झिवाचा गिटार वाजवत गाणं गातांनाचा व्हिडीओ व्हायरल;धोनीच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसा तर सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो. मात्र, त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा धोनी त्याची मुलगी झिवासोबतचा फोटो किंवा व्हिडीओ आठवणीने आपल्या फॅन्ससोबत शेअर करतो. धोनी सध्या मैदानापासून दूर असून आपल्या कुटुंबासोबत मसूरी येथे सुट्टीसाठी गेला आहे. या ठिकाणचाच त्याचा मुलगी झिवासोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

‘गुगल’वर धोनी बद्दल सर्च करा पण जरा जपून!

तुम्ही जर क्रिकेटप्रेमी असाल, किंवा क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जगभरात कोट्यावधी लोक महेंद्र सिंग धोनी उर्फ ‘माही’चे चाहते आहेत. आपला आवडता क्रिकेटपटू धोनी याच्या बद्दलची माहिती मिळवण्यासाठी ते गुगलवर की वर्ड सर्च करत असतात. धोनीची इंत्यभूत माहिती गुगलवर सर्च करून मिळवणं सोप्पं असलं तरी ते आता अनेकांना महागात पडू शकतं. गुगलवर धोनी सर्च करणे त्याच्या चाहत्यांना महागात पडू शकते, असा इशारा एका अहवालातून देण्यात आला आहे. एका अँटीव्हायरस बनविणाऱ्या कंपनीने यासंबंधी एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात याविषयीची माहिती दिली आहे.

रांची कसोटीत पुन्हा गुंजणार ‘धोनी… धोनी’ चा नारा

आपल्या घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यात महेंद्रसिंह धोनीही हजेरी लावणार आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशनने धोनीला सामन्यासाठी हजर राहण्याची विनंती केली होती, ज्याला धोनीने आपला होकार कळवला आहे. ज्यामुळे कसोटी सामन्यात प्रेक्षकांची संख्या अधिक वाढेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

खुशखबर ! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार ‘धोनी’..

भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका विरोधात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. यात पहिल्या सामन्यात विजय मिळवत, दुसरा सामनाही टीम इंडियात खिशात घालण्याच्या तयारीत आहे. दरम्यान तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना रांचीमध्ये होणार आहे. रांची म्हटलं की क्रिकेट चाहत्यांना आठवतो तो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. त्यामुळं या सामन्यात धोनी सहभागी होणार असे अपेक्षा वर्तवली जात आहे.

महेंद्रसिंग धोनी वेस्टइंडीज सोबतच्या मालिकेतून बाहेर; स्वतः केली घोषणा

मुंबई  प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज महेंद्रसिंग धोनीने वेस्टइंडीज सोबत होणाऱ्या मालिकेतून स्वतःहून आपण उपलब्ध नसणार आहोत, असे ‘बीसीसीआई’ला कळविले आहे. सध्या ३८ वर्षीय धोनीच्या क्रिकेट निवृत्ती बद्दल जोरदार चर्चा असतांना व तो वेस्टइंडीज संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत असेल की नाही, या चर्चेवर धोनीने स्वतःहून विराम दिला आहे.   धोनी पुढील दोन महीने भारतीय सैन्याच्या पॅरासैन्य रेजिमेंट मध्ये … Read more