औषधे नसल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 12 लहानबाळांसह एकूण 24 जणांचा मृत्यू; शिंदे फडणवीस सरकारने उत्तर द्यावं

nanded Hospital case

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील एका शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 12 नवजात बालकांचा आणि काही प्रौढ रुग्णाचा समावेश आहे.  योग्य उपचार न झाल्यामुळे या सर्व रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप रुग्णांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुख्य म्हणजे, हे सर्व आरोप रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आले आहे. त्याचबरोबर, … Read more

चिंताजनक! नांदेडमध्ये 512 पशुंना लम्पी आजाराची लागण,शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

lumpy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लम्पी चर्मरोगाच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पावसाचा फटका बसल्यानंतर आता गुरांना लम्पी रोगांची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करूनच शेतकरी हतबल झाले आहेत. मुख्य म्हणजे, आता नांदेड जिल्ह्यात तब्बल 512 पशुंना लम्पी आजार झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त वासरांचे प्रमाण आहे. त्यामुळे, आशा पशुंची, वासरांची … Read more

मोठी बातमी!! महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या पक्षाची Entry

bhartiya rashtra samiti

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारतीय राष्ट्र समिती या पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड येथे चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत पहिली जाहीर रॅली पार पडली. यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांवर टीका केली. या सभेला लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले. भारत राष्ट्र … Read more

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला अशोक चव्हाणांची दांडी; कारणही सांगितलं

Ashok Chavan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी कडून आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सत्ताधारी भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या कारणांमुळे महाविकास आघाडी कडून मोर्चा पुकारण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच दिग्गज नेतेमंडळी या मोर्चात सहभागी होणार आहेत. परंतु काँग्रेस नेते अशोक चव्हाण मात्र या महामोर्चाला उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे … Read more

जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

Dr. Nagnath Kottapalle

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (वय 74) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एक वर्षापूर्वी त्यांना कॅन्सरचे निदान झाले होते. तेव्हापासून पिंपरी- चिंचवडच्या राहत्या घरी सून आणि मुलगा त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु, गेल्या 15 दिवसांपूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना … Read more

तुम्ही नक्की कोणत्या देशाचे भक्त? राहुल गांधी मोदींवर कडाडले

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात द्वेषाचे राजकारण सुरु केलं आहे. भावाभावांमध्ये भांडण लावायचं काम केलं आहे. देशात भावाभावात भांडण लावल्यास देशाचे नुकसानच होणार आहे. मग जर तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणत असाल तर तुम्ही नक्की कोणत्या देशाचे भक्त आहात असा थेट सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींना केला … Read more

काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा आज राज्यात; नांदेडमध्ये 10 नोव्हेंबरला होणार सभा

Congress Bharat Jodo Yatra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीहून सुरू झालेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला आज दोन महिने पूर्ण होत आहेत. ही काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. शेगावमध्ये 10 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सभा घेणार … Read more

शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार

devendra fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास नांदेड आणि लातूरकर फडणवीस यांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कालच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही काँग्रेसचे २२ आमदार फडणवीसांनी तयार ठेवलेत असं … Read more

काँग्रेसमधील नितीमत्ता संपली,दहा पिढ्या बसून खातील इतकं त्यांच्याकडे; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar Congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडमध्ये आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत धम्म मेळावा पार पडला. यावेळी आंबेडकरांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून टीका केली. “काँग्रेसची सध्याची अवस्था पाहिल्यास या पक्षामधील नीतिमत्ता संपली आहे. यांच्याकडे दहा पिढ्या बसून खातील इतकं आहे, असे आंबेडकरांनी म्हंटले. नांदेडमध्ये धम्म मेळाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी … Read more

नांदेडमध्ये भरदिवसा आरोपींनी घातला सशस्त्र दरोडा, Video आला समोर

robbery

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरदिवसा आरोपींनी एका बँकेवर दरोडा (robbery) टाकला आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा होती, अशी माहिती समोर आली आहे. हि संपूर्ण घटना बँकेतील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी आरोपी बँकेत शिरतात आणि नंतर मॅनबंद धारदार तलवार … Read more